सगळे एकत्र आले तरी शिवसेनाच जिंकणार - आदित्य ठाकरे

नवी मुंबई  -: सगळे एकत्र आले तरी मुंबई महापालिकेत शिवसेनाच जिंकणार कारण लोक गद्दारांना क्षमा करणार नाही असे मत माजी मंत्री आणि युवसेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी.व्यक्त केले आहे. नवी मुंबईतील कार्यकर्त्यांच्या घरी गणपती दर्शनासाठी ठाकरे मंगळवारी आले होते तेव्हा ते बोलत होते.

सध्याच्या राजकारणात जे काही चालले आहे ते योग्य नाही. आता सर्वांचे छुपे हात समोर येत असून शिवसेना विरोधात सर्वजण एकवटले आहेत.

अमित शहांबद्दल आदर दाखवणाऱ्या ४०.गद्दारांनी अमित शहांच्या वक्तव्याला उत्तर द्यावे, असे म्हटले आहे. खरे तर मुंबई दौऱ्यावर असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले होते की, उद्धव ठाकरेंना बीएमसी निवडणुकीत त्यांची जमीन दाखवावी. त्याला उत्तर देताना माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, जनता या सर्वांना उत्तर देईल. महापालिका निवडणुका असोत किंवा त्या ४० गद्दारांच्या जागांवर होणार्‍या निवडणुका असोत शिवसेना सर्व निवडणुकांसाठी सज्ज आहे. आम्ही राज्य सरकारला निवडणुका घेण्याचे आवाहन करत आहोत, पण ते निवडणूक घेण्यास घाबरत आहेत, त्यामुळे निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली जात आहे. असा निशाणा देखील शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर लावला

तर शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवरच होईल असा विश्वास देखील यावेळी त्यांनी व्यक्त केला.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

माजी विरोधी पक्षनेते नामदेव भगत यांची ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी'च्या नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पदी नियुवती