माजी विरोधी पक्षनेते नामदेव भगत यांची ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी'च्या नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पदी नियुवती

नवी मुंबई ः ‘सिडको'चे माजी संचालक तथा नवी मुंबई महापालिकोचे माजी विरोधी पक्षनेते नामदेव भगत यांची ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी'च्या नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पदी नियुवती करण्यात आली आहे.


दरम्यान, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी'च्या नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पदावर कार्यरत असणारे माजी उपमहापौर अशोक गावडे आपल्या समर्स्थकांसोबत कोणत्याही क्षणी ‘राष्ट्रवादी'ला रामराम करुन मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या सुचनेवरुन ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी'चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ५ सप्टेंबर रोजी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी'च्या नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पदी प्रदेश उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असणारे नामदेव भगत यांची नियुवती केली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकटीसाठी आणि मजबूत करण्यासाठी तसेच पक्षाची ध्येय-धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यरत रहावे, असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सदर नियुवतीपत्राद्वारे नामदेव भगत यांना सूचित केले आहे. 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

भाजपतर्फे 'सेवा पंधरवडा' चे आयोजन