सणासुदीला खाद्यतेल तसेच दूध, मिठाई व दुग्धजन्य पदार्थात भेसळीचे प्रमाणात वाढ

नवी मुंबई -:नवी मुंबई परिसरात  सणासुदीला वाढती मागणी लक्षात घेता खाद्य तेलविक्रेते व्यवसायिकांकडून खाद्यतेल तसेच दूध, मिठाई व दुग्धजन्य पदार्थात भेसळीचे प्रमाण वाढत असते. त्यामुळे अशा व्यवसायाच्या ठिकाणी तात्काळ संयुक्त पाहणी करून दोषींवर  कारवाईची  करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेना उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी अन्न व औषध प्रशासन  सहा.आयुक्त सुरेश देशमुख यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.

           नवी मुंबई परिसरात साधारण पंधरा लक्ष लोक संख्या असून येथे नागरिकांना मोठ्या प्रमाणात खाद्य तेलाची गरज असून सणांना मागणीत आणखी वाढ होत असते.  परंतु शुद्ध खाद्यतेलांची रोजची वाढती मागणी व अपुरा  पुरवठा या बाबी लक्षात घेता नवी मुंबईत असणाऱ्या बहुतेक खाद्यतेल विक्रेते  हे भेसळ युक्त  तेल वापरत असल्याचे निदर्शनास येत असून यात मोठ्या प्रमाणात हलके दर्जाचे तेल तसेच त्यांना वास येण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची रसायन वापरली जात आहेत.या प्रकारामुळे नवी मुंबईतील नागरीकांनचे आरोग्य धोक्यात येत आहे. 

 तसेच दूध,मिठाई व दुग्धजन्य पदार्थ यात सुद्धा मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याचे निदर्शनास येत आहे.  त्यामुळे अशा व्यवसायाच्या ठिकाणी तात्काळ संयुक्त पाहणी करून दोषींवर  कारवाईची  करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेना उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी अन्न व औषध प्रशासन  सहा.आयुक्त सुरेश देशमुख यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची नवी मुंबईतील गणेशोत्सव मंडळाला सदिच्छा भेट