शिवसेना उपनेते विजय नाहटा यांचे गणेश दर्शना निमित्त विविध गणपती उत्सव मंडळांना भेट

नवी मुंबई :  सध्या नवी मुंबई मधील विविध भागात गणेश उत्सव मंडळांच्या माध्यमातून मोठ्या थाटा माटात गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. नुकतेच गणपतीबाप्पाच्या दर्शनाच्या निमित्ताने शिवसेना उपनेते, विजय नाहटा  (पर्यावरण समाघात प्राधिकरण महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा सभापती -  मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ (म्हाडा) (राज्यमंत्री दर्जा ) यांनी नवी मुंबईतील कोपरखैरणे, वाशी, तुर्भेस्टोर, तुर्भे नाका,  कोपरिगाव, इंदिरानगर,चुनभट्टी येथील विविध मंडळांना भेटी दिल्या व बाप्पांचे आशीर्वाद घेतले. यावेळी  विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी विजय नाहटा यांचे ढोल ताशांच्या गजरात शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. अनेक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी गणपती उत्सव दरम्यान येणाऱ्या अडचणी सोडवण्यासंदर्भात नाहटा साहेबांशी चर्चा केली. यावेळी विजय नाहटा यांच्या समवेत माजी नगरसेवक रामाशेठ वाघमारे, शिवसेना उत्तरभारतीय सेलचे जिल्हा संघटक कमलेश वर्मा, विभाग प्रमुख तय्यब पटेल, राजेश पाटील, शाखा प्रमुख दिलीप आमले, युवा सेना पदाधिकारी सिद्धाराम शिलवंत, प्रवीण कांबळे, कोपरखैरणे विभाग प्रमुख सचिन कांबळे, उत्तरभारतीय उपजिल्हा संघटक प्रल्हाद महाशेठ, शाखा संघटक शिराजखान, आरिफ खान, विभाग संघटक गिरीधारीलाल आणि कामगार नेते तथा उपशहर प्रमुख प्रदीप बी. वाघमारे इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

सणासुदीला खाद्यतेल तसेच दूध, मिठाई व दुग्धजन्य पदार्थात भेसळीचे प्रमाणात वाढ