रविवारी नामदार रवींद्र चव्हाण यांचा सत्कार सोहळा
पनवेल : फडणवीस सरकार असताना रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारीने काम करणारे तसेच आत्ताच्या शिंदे-फडणवीस सरकारमधील राज्याचे सार्वजनिक बांधकाम, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रविंद्र चव्हाण यांचा सत्कार समारंभ तसेच विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा रविवार दिनांक २८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता उरण मधील जेएनपीटी मल्टीपर्पज हॉल येथे होणार आहे.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, खालापूर तालुकाध्यक्ष रामदास ठोंबरे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती असणार आहे. प्रथम राष्ट्र, नंतर संघटन आणि त्यानंतर स्वतः, अशी देशहिताची विचारसरणी असलेल्या भारतीय जनता पक्षात विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा ओढा दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच अनुषंगाने विविध पक्षातील कार्यकर्ते भाजपत जाहीर प्रवेश करणार आहेत.