आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन शिवसेनेतील निष्ठावंत कार्यकर्त्यांना आता बढती

वाशी -: शिवसेनेतून एकनाथ शिंदे गट बाहेर पडल्यानंतर नवी मुंबईत ही शिवसेनेला खिंडार पडले होते. त्यामुळे ही पोकळी भरून काढण्यासाठी आणि आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन शिवसेनेतील निष्ठावंत कार्यकर्त्यांना आता बढती दिली जात आहे. त्यामुळे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व खासदार राजन विचारे यांच्या आदेशाने महेश कोटीवाले, प्रकाश चीकणे आणि  विनोद मुके यांची नवी मुंबई शिवसेना उपशहर प्रमुख पदी नेमणूक करण्यात आली आहे. सदर नेमणूक पत्र जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांच्या हस्ते सोमवारी मध्यवर्ती कार्यालयात  देण्यात आले.

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

पावसाळी अधिवेशनादरम्यान नामकरणाचा ठराव विधानसभा आणि विधान परिषदेत नुकताच मंजूर