‘आम आदमी पार्टी'च्या युवा आघाडीची घोषणा
नवी मुंबई ः पुणे येथे झालेल्या ‘आम आदमी पार्टी'च्या कार्यकर्ता मेळाव्याच्या यशस्वी आयोजननंतर आप महाराष्ट्र युवा आघाडी तर्फे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात नवीन युवा समित्या जाहीर करण्यात आल्या.
या जिल्हास्तरीय समित्यांमध्ये ‘आप'चे नवी मुंबईतील सक्रिय कार्यकर्ते संतोष केदारे (दिघा) यांची आप नवी मुंबई-युवा आघाडी अध्यक्ष तसेच सुनील जाधव (तुर्भे) यांची संघटक आणि अभिषेक पांडे (कोपरखैरणे) यांची सहसंघटक आप-महाराष्ट्र म्हणून तर चिन्मय गोडे (नेरुळ) यांची ठाणे जिल्हा संघटक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. याशिवाय ‘आप'च्या नवी मुंबई युवा टीम मध्ये अजुनही काही सक्रिय कार्यकर्त्यांचा समावेश करण्याची विनंती ‘आप'चे नवी मुंबई कार्यकारी अध्यक्ष श्यामभाऊ कदम यांनी संघटक ताहीर पटेल यांना केली आहे.
दिघा येथील समाजसेवक संतोष केदारे यांच्या युवा आघाडी अध्यक्ष पदाच्या नेतृत्वाखाली टीम आप-नवी मुंबई, युवकांपर्यंत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून ‘आम आदमी पार्टी'ची धेय-धोरणे यांंचा प्रसार करील. तसेच जास्तीत जास्त युवकांचा टीम आप नवी मुंबई मध्ये समावेश करण्याचा प्रयत्न राहिल,असे श्यामभाऊ कदम आणि ‘आम आदमी पार्टी'चे मुख्य ट्रेड युनियन संघटक तथा निवृत्त कामगार आयुवत देवराम सुर्यवंशी यांनी सांगितले.
दरम्यान, मला ‘आम आदमी पार्टी'तर्फे नवी मुंबई युवा आघाडीच्या दिलेल्या नवीन जबाबदारी बद्दल समस्त दिघा टीमच्या वतीने मी वरिष्ठ नेत्यांचे आभार मानताे. नवी मुंबईमध्ये सर्व वरिष्ठ आणि युवा टीम यांना सोबत घेऊनच आणि सर्वांच्या विचाराने पक्ष वाढीसाठी काम करुन ‘आम आदमी पार्टी'ला नवी मुंबईत नंबर वर करुन दाखवू, अशी ग्वाही नवनियुवत युवा आघाडी अध्यक्ष संतोष केदारे यांनी यावेळी दिली.