नवी मुंबई महापालिकेत आरपीआयचे जास्त नगरसेवक महापालिकेत पाठविण्याचा निर्धार - सिद्राम ओहोळ
नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पदी सिद्राम ओहोळ यांची बिनविरोध निवड
नवी मुंबई : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशानुसार मंगळवारी ऐरोली येथील नालंदा बुद्धीविहारातील सभागृहात पार पडलेल्या बैठकीत सिद्राम ओहोळ यांची आरपीआयचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष म्हणून एकमताने बिनविरोध फेरनिवड करण्यात आली. तसेच सरचिटणीस पदी परमेश्वर गायकवाड, एल.आर.गायकवाड, कार्याध्यक्ष म्हणून युवराज मोरे, उपाध्यक्ष रमेश बोदडे, खजिनदार सुरेश कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली.
रिपब्लिकन पक्षाची महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्हा कार्यकारणी बरखास्त झाल्यानंतर रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार मंगळवारी ऐरोली येथील नालंदा बुद्धीविहारातील सभागृहात विशेष बैठक पार पडली. रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय सचिव सुरेश बारशिंगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत सिद्राम ओहोळ यांची नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष म्हणून एकमताने फेरनिवड करण्यात आली. यापुढे रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा नवी मुंबई महापालिकेत फडकण्याचा व रिपब्लिकन पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक महापालिकेत पाठविण्याचा निर्धार यावेळी नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष सिद्राम ओहोळ यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना केला.
तर पक्षाच्या विविध आघाडÎा व पदाधिकाऱयांची निवड लवकरच करण्यात येणार असल्याचे सुरेश बारशिंगे यांनी सांगितले. यावेळी रिपाई नेते बाळासाहेब मिरजे, महाराष्ट्रचे नेते चंद्रकांत जगताप, युवा नेते यशपाल ओहोळ, विजय कांबळे, शशिकला जाधव, नागेश कांबळे, नंदा गायकवाड, मारुती सावंत, टिळक जाधव, संतोष ढेपे, रामराव बोदडे, प्रतीक जाधव, अभिमान जगताप, फयाज शेख, कविता भंडारे व अन्य पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.