जुईनगरमधील प्राणी रुग्णालय लवकरच कार्यान्वित करा

नवी मुंबई ः जुईनगर मध्ये महापालिका बनवित असलेल्या प्राणी रुग्णालयाचे (व्हॅनिटी हॉस्पिटल) काम लवकरात लवकर करुन ते जनतेसाठी कार्यान्वित करण्याची मागणी ‘नवी मुंबई जिल्हा काँग्रेस'च्या सचिव विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून जुईनगरमध्ये चिंचोली तलावाशेजारी, स्मशानभूमीसमोरील भागात प्राणी रुग्णालय (व्हॅनिटी हॉस्पिटल) बनविण्याचे बांधकाम सुरु आहे. काम जवळपास पूर्ण झालेले आहे. परंतु, गेल्या काही काळापासून या प्राणी रुग्णालयाचे काम पूर्णपणे मंदावले आहे. रहिवाशांचे पाळीव प्राणी, सोसायटी आवारातील प्राणी, भटके आणि मोकाट जनावरांच्या उपचारासाठी सदर प्राणी रुग्णालयाचे काम लवकरात लवकर पूर्ण होणे आवश्यक आहे. महत्वाचे म्हणजे या रुग्णालयाचे काम संथगतीने का सुरु आहे? याची
चौकशी करावी. तसेच संबंधित रुग्णालयाचे काम लवकरात लवकर पूर्ण करुन रुग्णालय जनसेवेसाठी कार्यान्वित करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्याची मागणी विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्ताकडे सदर निवेदनाद्वारे केली आहे.

 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

नवी मुंबई महापालिकेत आरपीआयचे जास्त नगरसेवक महापालिकेत पाठविण्याचा निर्धार - सिद्राम ओहोळ