पनवेल -उरण मध्ये खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे कोर्सेस सुरू

स्वयंरोजगार प्रशिक्षण भविष्यातील उद्योग वाढीसाठी युवकांना नक्कीच फायदेशीर - प्रितम  म्हात्रे

पनवेल : पनवेल मध्ये प्रथमच एका छत्राखाली केंद्र सरकारचे विविध कोर्सेस ची माहिती देण्यासाठी संबंधित विभागातील अधिकारी वर्गाला जे.एम .म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या पुढाकाराने शिबिर आयोजित करून मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित केले होते. या शिबिरात युवक, महिला आणि तृतीय पंथी अशा प्रत्येक स्तरातील नागरिकांनी सहभाग नोंदवला होता. या शिबिरामध्ये मार्गदर्शन करण्यात आलेले विविध प्रकारचे कोर्सेस संस्थेचे अध्यक्ष प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी पनवेल ,खांदा कॉलनी, उरण, वेश्वी आणि खालापूर या ठिकाणी आपल्या जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या पुढाकाराने पनवेल आणि उरण मधील नागरिकांसाठी सुरू केले आहेत.

          सध्याच्या काळात नागरिकांमध्ये स्कीन आणि हेअर  ट्रीटमेंट संदर्भात जागृतता  झाली आहे.सध्या या क्षेत्रात बरीच रोजगाराची संधी आहे. त्यासाठी त्याला अनुसरून जे विविध प्रकारचे कोर्सेस आहेत ते सवलतीच्या दरात  जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था आणि तंत्राज  हेल्थ अँड ब्युटी वेलनेस क्लिनिक च्या डॉ.पल्लवी संदीप शिंदे मार्गदर्शनखाली सुरू करण्यात आले आहे जेणेकरून हे कोर्सेस केल्यावर आपल्या परिसरातच रोजगार आणि स्वयंरोजगाराची संधी तरुणांना उपलब्ध होईल असे त्यांनी सांगितले. स्कीन आणि हेअर ट्रीटमेंट संदर्भातील इतर कोर्सेस हे 60 ते 80 % सवलतीच्या दरात जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या सहकार्यामुळे करता येणार आहेत. या संदर्भात अधिक माहितीसाठी ( 098190 98685 ) या क्रमांकावर संपर्क साधावा असे *(तंत्राज  हेल्थ अँड ब्युटी वेलनेस क्लिनिक) च्या डॉ.पल्लवी संदीप शिंदे* यांनी सांगितले.

          स्वयंरोजगाराच्या दृष्टीने या विविध कोर्सेस संदर्भात माहिती घेऊन आपल्या आवडीनुसार कोर्सेस करावे. ज्यामध्ये शासनाचे जे अधिकृत शुल्क आहे त्यामध्येच नागरिकांना कोर्सेस उपलब्ध होणार आहेत असे *(लक्ष्यपूर्ती वेलफेअर फेडरेशनच्या) सौ.मंजुषा परब* यांनी सांगितले. (KVIC) खादी आणि ग्रामोद्योग आयोग अंतर्गत कोर्सेस संदर्भात अधिक माहितीसाठी 9773590982 / 9757472380 यावर संपर्क साधावा.

     *भविष्यात रायगड, नवी मुंबई मध्ये जे नवीन उद्योगधंदे येणार आहेत त्यामध्ये निर्माण होणाऱ्या नोकरीच्या ज्या संधी आहेत त्यावेळी सदर शासनमान्य केलेले कोर्सेस चे प्रमाणपत्र तरुणांना उपयोगात येणार आहे. तसेच नवीन उद्योग सुरू करण्यासाठी सुद्धा सदर घेतलेले प्रशिक्षण त्यांच्या भविष्यातील उद्योग वाढीसाठी युवकांना नक्कीच फायदेशीर ठरेल:- .प्रितम म्हात्रे

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

शंभूराज देसाईंना पुन्हा विधानसभेत पाठविणार नाही