जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली आझादी गौरव पदयात्रेला उरण मधून सुरूवात

हुतात्म्यांच्या स्मारकाजवळ या पदयात्रेचा समारोप

              उरण : अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीने दिलेल्या निर्देशानुसार रायगड जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष मा. महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली आझादी गौरव पदयात्रेला दिनांक ९ ऑगस्ट रोजी जासई येथून सुरूवात करण्यात आली. जासई येथील हुतात्मा स्मारकास मानवंदना व स्वर्गीय लोकनेते दि. बा. पाटील साहेब यांना अभिवादन करून जासई, चिर्ले, गावठाण, वेश्वी, दिघोडे, विंधणे, भोम ते चिरनेर येथे सन १९३० मधील हुतात्म्यांच्या स्मारकाजवळ या पदयात्रेचा समारोप करण्यात आला. जवळ जवळ २० ते २२ किलोमीटरच्या पदयात्रेमध्ये महिला व तरुणांनी उस्फुर्त सहभाग घेतला. या पदयात्रेचे नेतृत्व रायगड जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष श्री. महेंद्र घरत यांनी केले.

                  या पदयात्रेवेळी रायगड जिल्हा कॉंग्रेसचे पदाधिकारी चंद्रकांत पाटील , राजाभाऊ ठाकूर, मिलिंद पाडगांवकर, सौ. श्रद्धा ठाकूर, विनोद म्हात्रे, डॉ. मनिष पाटील, अखलाक शिलोत्री, किरीट पाटील, मार्तंड नाखवा, संजय ठाकूर, महेंद्र ठाकूर, सौ. रेखा घरत यांच्या सह शेकडोंच्या संख्येने कॉंग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

सामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस उभी - अशोकशेठ  गावडे