सामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस उभी - अशोकशेठ  गावडे 

नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकर्त्यांच्या जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न

नेरुळ  :-  सत्ताधारी पक्षाच्या नाकर्तेपणाच्या विरोधात रस्त्यावरचा संघर्ष असो वा प्रशासकीय पातळीवरची न्याय हक्काची लढाई  असो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी  सामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीशी समर्थपणे  उभी आहे. आपल्या  कार्यकर्त्यांनी जनतेत मिसळून त्यांच्या प्रत्येक प्रश्न -समस्यांच्या सोडवणुकीसाठी  सदैव तत्पर  रहावे असा सल्ला नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी उपमहापौर अशोक गावडे यांनी कार्यकर्त्यांच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत बोलताना  दिला. पक्षांची ध्येय धोरणे पालन न करता केवळ जागा अडवणाऱ्या  पदाधिकाऱ्यांची  पद यापुढे काढून घेतली जातील असा इशाराही गावडे यांनी यावेळी बोलताना  दिला . 

              नवी मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेसची  जिल्हास्तरीय आढावा बैठक नेरुळमधील  राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवी मुंबई  मध्यवर्ती कार्यालयात रविवारी संपन्न झाली. यावेळी अध्यक्षस्थानावरून जिल्हाध्यक्ष अशोक गावडे बोलत होते. यावेळी  व्यासपीठावर राष्ट्रवादी वाहतूक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस विलासराव हुले- पाटील, नवी मुंबई युवक काँग्रेस निरीक्षक नारायण गर्जे, युवा नेते महादेव पवार, महिला कार्याध्यक्ष  सुनिता देशमुख , सहकार सेल नवी मुंबई अध्यक्ष भोजमल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते . 

        यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शनपर बोलताना अशोकशेठ गावडे पुढे म्हणाले की, आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून केलेली धोरणात्मक विकास काम जनतेपर्यंत पोहचवा.  सामान्य जनतेच्या अडीअडचणी कार्यकर्त्यांनी  समजून घ्याव्या , त्यांच्या घेतलेल्या लेखी स्वरूपातील   समस्या -निवेदन  जिल्हा कार्यालयात मार्फत सोडवू अशी ग्वाही अशोक गावडे यांनी दिली. एकीची ताकत मोठी असते त्यामुळे कार्यकर्त्यांनी  एकत्रित जनतेच्या प्रश्नासाठी   संघर्ष करू, आगामी होऊ घातलेल्या  नवी मुंबई महापालिका निवडणुकीत विरोधकापुढे आपण  सक्षम पर्याय उभा करू असे गावडे यांनी बोलताना सांगितले . यावेळी व्यासपीठावरील विविध मान्यवरांनी बैठकीत आपली मतं मांडत कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधला. बैठकीत नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस मधील विविध सेलचे प्रमुख पदाधिकारी , सर्व तालुका अध्यक्ष आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते . 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

घरोघरी तिरंगा, दारोदारी व्हॅक्सिनेशन आणि आरोग्य सेवा