मार्ग शांततेचा, आधार जीवनाचा!

अष्टांगिक मार्गात योग्य दृष्टीकोन, योग्य संकल्प, योग्य भाषण, योग्य आचरण, योग्य उपजिविका, योग्य प्रयत्न, योग्य सजगता आणि योग्य एकाग्रता यांचा समावेश आहे. हा आत्म-विकास आणि आत्मसाक्षाकारांचा मार्ग आहे. जो दुःखावर मात करेल त्याला ज्ञानप्राप्ती होण्यास मदत होईल. अष्टांगिक मार्ग या तत्वावर आधारीत आहे. सर्व मानव स्वतःचे रुपांतर करण्यास आणि अंतिम शांती आणि आनंदाची स्थिती प्राप्त करण्यास सक्षम आहे.

भारत हा असा देश आहे, ज्यात विविध जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने रहात होते व आहेत, त्याच्याच जोडीने, विविध भाषिक व विविध प्रांतीय ‘हम सब एक हैं।' चा नारा देतात;  पण गत काही वर्षापासून खास करुन २०१४ पासून याच देशात, प्रांता-प्रांतात, भाषा-भाषीकांत व धर्मा-धर्मात वैमनस्यता पसरु लागली आहे. एक दुसऱ्यांत तेढ निर्माण होऊन अराजकता निर्माण होण्याची शवयताही निर्माण झाली आहे.

आज जग विविध सुविधांच्या पाठी पळत आहे. पण त्या सुविधा मिळवण्यासाठी व मनाला शांतता मिळवण्याच्या नादात आपली नितीमुल्ये विसरत चालला आहे. पुरातन काळातही मनःशांती मिळविण्यासाठी व देवाच्या प्राप्तीसाठी जप-तप, उपवास व ध्यान धारणेचा अवलंब केला जायचा पण, कधी कोणाला सुखशांती व आजीवन समाधान मिळाले नाही. मानवाच्या दिनचर्येत फरक पडला नाही व कदाचित तो पडणारही नाही. कारण विविध धर्माचे काही स्वतःचे निती नियम आहेत, जे पाळणे सर्वसाधारण लोकांना कठीण आहे. तशातच एका महात्म्याचा उदय झाला, ज्याने जगाला ज्ञानाचा व आत्मशांततेचा पाठ पढविला त्याचे नाव आहे, गौतम बुध्द. राजकुमार सिध्दार्थ गौतम यांचा जन्म एका राजघरात झाला. ज्याने पुढे जाऊन बौध्द धर्माची स्थापना केली.

गौतम बुध्दाचा जन्म सिध्दार्थ गौतम म्हणून राजा शुध्दोदराच्या पोटी झाला. त्याचे संगोपन मोठ्या विलासी वातावरणात झाले. त्याच्या जन्माच्या वेळीच भाकीत करण्यात आले होते की, राजकुमार पुढे एक महान सम्राट बनेल, त्यामुळे त्यांना बाहेरील जगापासून वेगळे ठेवण्यात आले. जेणेकरुन ते धार्मिक जीवनाकडे आकर्षित होऊ नयेत. तथापी वयाच्या २९व्या वर्षी राजकुमाराने जग अधिक पाहण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या रथातून राजवाड्याच्या बाहेर प्रवास करण्यास सुरुवात केली. त्यांच्या प्रवासात, त्याला एक वृद्ध माणूस, एक आजारी माणूस आणि एक प्रेत दिसले. सिध्दार्थ गौतमाला वृद्धाचं आजारपण आणि मृत्यूच्या दुःखापासून संरक्षण मिळाले होते. त्यामुळे त्याच्या सारथीला ते काय आहेत ते स्पष्ट करावे लागले.

प्रवासाच्या शेवटी, त्याला एक भिक्षू दिसला आणि त्या माणसाच्या शांत वर्तनाने तो प्रभावित झाला. म्हणूनच त्याने जगात जाण्याचा निर्णय घेतला की, तो माणूस त्याच्या सभोवताली इतके दुःख असूनही इतका शांत कसा असू शकतो. तो राजवाडा सोडून भटकणारा तपस्वी बनला. त्याने अलार कलाम आणि उदक रामपुत्र यांच्याकडून औषधोपचाराचा अभ्यास केला आणि लवकरच त्यांच्या प्रणालीमध्ये प्रभुत्व मिळवले. तो गुढ साक्षात्काराच्या उच्च पातळीवर पोहचला. पण तो समाधानी नसल्याने, तो निर्वाणाच्या शोधात निघाला जो ज्ञानाचा सर्वोच्च स्तर आहे. तो एका वडाच्या झाडाखाली बसला आणि ज्ञानप्राप्तीचा प्रयत्न केला. एकदा त्याला ज्ञानप्राप्ती झाली की, तो त्याबद्दल प्रचार करत राहिला आणि बौध्द धर्माची स्थापना केली.

बौध्द धर्माचे संरक्षक राजा अशोक यांच्या कारकिर्दीत बौध्द धर्म प्रसार सुरु झाला आणि धर्म संपूर्ण आशिया खंडामध्ये पसरला. गौतम बुध्दाचा जन्म जरी नेपाळमधील लुंबिनी येथे झाला असला तरी मृत्यू मात्र सारनाथ येथे झाला. गौतम बुध्दाच्या शिकवणी व नियमावली सर्वसाधारण लोकांना समजणाऱ्या व पाळायला सोप्या आणि सुटसुटीत होत्या व आहेत. म्हणून लोक त्याकडे जास्त आकर्षित होतात व बौध्द धर्माचा प्रचार आणि प्रसार करतात म्हणून जगात अनेक देशात बौध्द धर्मिय लोक आढळतात व आपल्या धर्माचे दायित्व पाळतात.

विविध धर्मात जाती, पोटजाती आहेत, त्यानुसार त्यांना वागणूक दिली जाते, त्यांच्यात भेदभाव केला जातो, कट्टरवाद निर्माण केला जातो. उच्च-निच्च भेद केला जातो. मात्र बौध्द धर्मात हा भेदभाव आढळत नाही, सर्वांना समानतेने पाहिले जाते व वागवले जाते. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपला धर्म बदलतांना सर्व धर्माचा सखोल अभ्यास करुनच शेवटी बौध्द धर्म आत्मसात केला (स्विकारला).

मानवाच्या जीवनातील स्थिती वारंवार बदलत राहते त्यानुसार माणूस आपापले कर्मकांड करत असतो. त्याचे फळ काय असेल ते कोणालाच माहित नसते. खरंतर चांगल्या कर्माची फळे चांगलीच असतात, तर वाईट कर्माची फळे वाईटच असतात. त्यानुसार प्रत्येकाला चांगले वाईट अनुभव येतात. चांगल्या कर्मवाल्यांना सुखाची अनुभूती होते, तर वाईट कृत्ये करणाऱ्यांना दुःखाचा सामना करावा लागतो, हा एक निसर्गाचा नियम आहे. माणूस सर्वांना सर्व काळ ठकवू शकत नाही, किंवा सदा सर्वकाळ सुखीही ठेवू शकत नाही, जे काम देवी-देवतांना करता आले नाही, ते काम माणूस कसा करु शकेल?

प्रत्येक धर्माने आपापल्या रितीरिवाजानुसार काही सण ठरवून दिले आहेत, ते साजरे करण्याच्या पद्धतीही ठरवून दिलेल्या आहेत. जसे मुस्लीम धर्मात सर्वात मोठा सण म्हणून ‘रमजान ईद' साजरा केला जातो; तर ख्रिश्चन धर्मात नाताळ हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्याचप्रमाणे हिंदुस्थानात ‘दीपावली' हा सण फार मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा केला जातो. त्यानुसारच बौध्द धर्मात बौध्द पौर्णिमा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी बौध्द लोक बौध्द मुर्तीची पूजा करतात व प्रार्थना सभा घेतात. भाविक बौध्द मंदिरांना भेटी देतात. घरात तांदूळ आणि दुधापासून बनवलेली ‘खीर' बनवली जाते व खाल्ली जाते, खाऊ घातली जाते. अनेक ठिकाणी बौध्द मंदिरे फुले आणि दिव्यांनी सजवले जातात व तेथे बौध्द मुर्तीसमोर धूप, मेणबत्या आणि कंदिल पेटवून बुध्द पौर्णिमा साजरी करतात. तेथे बौध्द धर्मग्रंथाचे पारायण करुन पारंपारिक नृत्य सादर केले जाते.

काही बौध्द लोक शुध्दीकरण आणि आत्मशिस्तीसाठी उपवासही करतात. या दिवशी बरीच मंडळी मांसाहार टाळतात. खरंतर बौध्दाच्या शिकवणीनुसार मांसाहार व मदिरा वर्ज्य आहे. पण, सर्वांनाच शाकाहार परवडत नाही, हा सवयीचा गुण आहे. मराठीत एक म्हण आहे. ‘ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वाण नाही पण गुण लागला' चांगले गुण बहुतेकांना आवडत नाहीत, पण वाईट गुण अंगीकारायला बरीच मंडळी एका पायावर तयार असतात. या जगात चार अर्धसत्ये आहेत. ते म्हणजे जग हे दुःखाने भरलेले आहे. इच्छा दुःख निर्माण करते. इच्छा दूर केल्याने दुःख दूर होईल आणि अष्टांगिक मार्ग इच्छा जिंकण्यास मदत करेल. अष्टांगिक मार्गात योग्य दृष्टीकोन, योग्य संकल्प, योग्य भाषण, योग्य आचरण, योग्य उपजिविका, योग्य प्रयत्न, योग्य सजगता आणि योग्य एकाग्रता यांचा समावेश आहे. हा आत्म-विकास आणि आत्मसाक्षाकारांचा मार्ग आहे. जो दुःखावर मात करेल त्याला ज्ञानप्राप्ती होण्यास मदत होईल. अष्टांगिक मार्ग या तत्वावर आधारीत आहे. सर्व मानव स्वतःचे रुपांतर करण्यास आणि अंतिम शांती आणि आनंदाची स्थिती प्राप्त करण्यास सक्षम आहे. बुध्दाचा असाही विश्वास होता की मानवाच्या जीवनातील स्थिती त्यांच्या स्वतःच्या कर्मावर अवलंबून असते. म्हणूनच ते कर्माच्या नियमाचे संवर्धन करतात. एक तत्व आहे की या जीवनातील कृती त्यांचे भविष्यातील जीवन ठरवतात. कर्माचा नियम व्यवितंना जबाबदार आणि नैतिक पध्दतीने वागण्यास प्रोत्साहित करतो.

बुध्दांनी व्यावसायिक नीतीमत्तेच्या संहितेवर आणि सामाजिक समानतेच्या तत्वावर खूप भर दिला. त्यांनी शिकवले की सर्वजण समान आहेत आणि त्यांच्या जाती, लिंग किंवा इतर कोणत्याही घटकांवर आधारित कोणाशीही भेदभाव केला जाऊ नये. त्यांच्या शिकवणींनी सर्व सजीवांप्रती दया, करुणा आणि सहानुभूती वाढवली. थोडवयात, बुध्दाच्या शिकवणी आत्म-विकास, नैतिक आचरण, सामाजिक समानता आणि सर्व सजीवांप्रती करुणा याभोवती फिरतात.त्यांचा हाच दृष्टीकोन सर्वांना भावला आणि बहुतेकांनी त्याला स्विकारले. पुढे सम्राट अशोकांनी हाच दृष्टीकोन स्विकारुन त्याचे पालन करत त्याचा प्रचार आणि प्रसार केला. परिणामस्वरुप तत्कालाच साम्राज्यवादाला खीळ बसली. पुढे कालांतराने या विचारांवर मात करत साम्राज्यवाद्यांनी आपल्या मुळ स्वभावानुसार, शांततेच्या मार्गाऐवजी, क्रूरतेचा मार्ग अवलंबून स्वार्थासाठी व न मिळणाऱ्या आनंदासाठी, इतरांना आपले मांडलीक वा गुलाम बनवण्याचा प्रकार सुरु केला.

परिणाम आपण पहात आहोत. केवळ काही दांभिक लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आपापसात हेव्या-दाव्याचे वातावरण तयार करुन, स्वतःच स्वतःचे नुकसान करुन  घेत आहोत. दुटप्पीपणाने  वागत आहेत; व इतरांना सौजन्याचे धडे शिकवत आहोत.

आजचे बहुतेक राजकारणी, तथाकथित साधू-संत आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, पदे मिळवून इतरांवर राज्य करण्यासाठी, अंधभवतांना चिथावणी देऊन बुध्दाच्या विचारांना तिलांजली देत आहेत. ही बाब मानवजातीसाठी व समाजासाठी मोठी घातक आहे.

जग सध्या दारुच्या ढिगाऱ्यावर बसलेले आहे. केव्हा दारुचा स्फोट होईल व जग नष्ट होईल हे सांगता येत नाही. तेव्हा स्वतःला सावरा! - भिमराव गांधले 

 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

भारतीय मुस्लिमांनी कर्नल सोफिया कुरेशींचा आदर्श घ्यावा