भारतीय मुस्लिमांनी कर्नल सोफिया कुरेशींचा आदर्श घ्यावा
पहलगाम हत्याकांडानंतर प्रथमच आपल्या देशातील जनता जातपात धर्म विसरून सर्व एकजुटीने पाकिस्तानचे लचके तोडा, पाकिस्तानला कायमचा उध्वस्त करा अशा प्रतिक्रिया उमटतानाच कधी नव्हे ते धर्मांध मुस्लिम नेत्यांनीसुद्धा पाकिस्तानला धडा शिकवावाच लागेल अशी गर्जना केली. केंद्र सरकारने तिन्ही दलाला पूर्ण सूट देताना कर्नल सोफिया कुरेशी ह्या जाँबाज मुस्लिम अधिकाऱ्यावर विश्वास दाखवला. कर्नल सोफिया ह्यांचे संपूर्ण कुटुंबियच भारतीय लष्करात विविध पदांवर आहेय; पण त्यांनी कधी मुस्लिम म्हणून आपल्या कर्तव्याशी प्रतारणा केली नाही.
जगात सर्वात संवेदनशील देश कोणता असेल तर तो आपला भारत देश आहे. आपली संस्कृती ही जगातील सर्वात श्रेष्ठ संस्कृती आहे. म्हणून परदेशातील नागरिक आधुनिक कपडे, नशेत धूत, विकृत मनोवृत्तीचे असे होते तेच आता भगवी वस्त्रे, सतत तोंडात हरे रामा हरे क्रिष्णा चा जप, विनम्रता हा सगळा आमूलाग्र बदल भारताच्या आपुलकीच्या संवेदनशीलतेचा परिणाम आहे. जगात कुठेही मानवाच्या बाबतीत काही वेदनादायक घटना घडली की, भारतीय जनतेच्या डोळ्यात पहिले पाणी येते. तेव्हा तो त्या देशाशी आपल्याला काय करायचे आहे असे म्हणून निष्ठुरपणे वागत नाही, बोलत नाही. जगात मुस्लिम हा एकच धर्म, जमात असा आहे ज्याला धर्माच्या, अल्लाच्या नावाने काही धर्मवेडे दिशाभूल करून माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य करून घेतात. मुस्लिमांवर जगातील कोणताही देश विश्वास ठेवत नाही; इतकेच नव्हे, तर मुस्लिमही एकमेकांवर विश्वास ठेवत नाही इतके ते पराकोटीचे अंतर्बाह्य विक्षिप्त मनोवृत्तीचे आहेत. त्यांच्यातील अनेकजण हे स्वार्थी, संशयी, कृतघ्न व खुनशी स्वभावाचे असतात. म्हणून काही मुस्लिम राष्ट्र एकमेकांचे देश उध्वस्त करताना जगाला दिसते.
आपला भारत देशाला सतत ह्या मुस्लिम राष्ट्राएवजी आपल्याच देशाचा एक तुकडा व काही कोटी देऊन ”दिल्या घरी सुखी रहा असा भारतीयांनी पाकड्याना प्रेमाचा संदेश दिला. स्वतःहून अट्टाहासाने विभक्त झालेला पाकिस्तान मात्र भारताला सतत छळण्याचे उपदव्याप गेली सत्तर वर्षे करत आहे. भारताने नेहमी त्याची जागा दाखवून त्याला सावध केले आहे. भारताने मनात आणले असते तर पाकिस्तानची खुमखुमी केव्हाच कायमची काढून टाकली असती; परंतु भारताचा संवेदनशील स्वभाव व विचारामुळे पाकिस्तानला माज आला. आपण किती? आपली कुवत किती? शत्रूराष्ट्रांच्या कुबड्यावर राष्ट्र चालत नसते ह्याची अक्कल नसल्यामुळे भारताच्या विरोधात सतत कुटील कारस्थान करताना यंदा मात्र त्यांनी अतिरेक केला. पहलगाम येथे सुट्टीनिमित्त गेलेल्या पर्यटकांवर जाती धर्माचे लेबल लावून नाहक निघृण हत्या केली. कुटुंबे उध्वस्त केली. जगभरात पाकिस्तानी कृत्याचे वाभाडे काढून निषेध करण्यात आला.
पहलगाम हत्याकांडानंतर प्रथमच आपल्या देशातील जनता जातपात धर्म विसरून सर्व एकजुटीने पाकिस्तानचे लचके तोडा, पाकिस्तानला कायमचा उध्वस्त करा अशीच प्रतिक्रिया जोमाने उमटू लागली. सर्व राजकीय पक्ष केंद्र सरकारच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले. कधी नव्हे ते धर्मांध मुस्लिम नेत्यांनीसुद्धा पाकिस्तानला धडा शिकवावाच लागेल अशी गर्जना केली. केंद्र सरकारने तिन्ही दलाला पूर्ण सूट देताना कर्नल सोफिया कुरेशी ह्या जाँबाज मुस्लिम अधिकाऱ्यावर आक्रमणाची सूत्रे दिली. त्याचा सदुपयोग करीत कर्नल सोफिया व विंग कमांडर व्योमीका सिंग ह्यांनी शत्रूची चहुबाजूनी कोंडी करीत जेरीस आणले. कर्नल सोफिया ह्यांचे संपूर्ण कुटुंबच भारतीय लष्करात विविध उच्च पदावर काम केले आहे; पण त्यांनी कधी मुस्लिम आहे म्हणून आपल्या कर्तव्याशी प्रतारणा केली नाही. हा भारताने दाखवलेला विश्वास कर्नल सोफिया ह्यांनी आपल्या कर्तृत्वाने सिद्ध केला. तेच काही मुस्लिम आपल्या देशाचे खाऊन पाकिस्तानची हुजेरगिरी करतात.
नुकताच मुंबईमध्ये विले पार्ले येथे एक मुस्लिम महिला जमिनीवर चिटकवलेला पाकिस्तानचा झेंडाचित्र हाताने खरवडून काढताना स्वतःचा माजलेला उन्माद दाखवत होती. ह्याचा अर्थ देशात अजूनही पाकिस्तानधार्जिण्या विचारांचे लोक वास्तव्य करीत आहेत. बांगलादेशी रोहिंग्ये, विनापासपोर्ट पाकिस्तानी जे असतील त्यांना हुडकून काढून तुरुंगात टाकणे किंवा त्यांना सीमापार हाकलून देणे ह्याकामासाठी देशभक्त मुस्लिमांनीसुद्धा स्वतःहून पुढाकार घेऊन आपण देशभक्त आहोत ह्याचे प्रमाणपत्र द्यावे. कर्नल सोफिया ह्यांनी मुस्लिम असूनसुद्धा आपले कर्तव्य बजावले तसेच आपणही मागे नाही ही प्रेरणा घेऊन सगळ्या देशवासीयांसमवेत हातात हात घालून भारताची प्रगती करावी. - यशवंत चव्हाण