मी आणि माझं घर
भिंत होऊन, छप्पर होऊन,
गुप्तता राखी, छिद्रं झाकली;
पणती, वात, तेल होऊन
कोनेकोपरे उजळून टाकले.
सून झाले, बायको झाले,
आई झाले, सासू झाले,
माझी मला हरवून बसले.
आता सोंगे पुरे झाली;
सारी ओझी जड झाली.
उतरून ठेवून आता तरी
माझी मला शोधू दे;
तुकडे तुकडे जावू दे.
विशाल काही पुजू दे.
मोकळा श्वास घेऊ दे.
श्वास दिला, त्याचा ध्यास
घेत घेत जाऊ दे!
-इंदिरा संत
माझं घर हे खूप गोड संकल्पना असते मी आणि माझं घर या दोनच गोष्टीत पूर्ण विश्वदेखील सामावलं जाऊ शकते.
खूप दमल्यावर विश्रांती घेण्यासाठी निदान उगीचच वेळ काढण्यासाठी आउट घटकेचं निवासस्थान हवं असतं. ते मिळावं म्हणून माणूस जीवाचा आटापिटा अनेक वर्ष करतो. चोखंदळपणे अनेक घरं बघतो. अनेक व्रतं करतो. फुलपाखरू ज्याप्रमाणे अनेक मुलांना नाक मुरडत मुरडत हुंगीत जातो, तशी ही माणसाची घर बघण्याची चळवळ कायम असते. स्वतःचं घर हवं ही एक आदिम प्रेरणा आहे. पक्षी झाडांवर घरटी बांधतात जनावर कानाकपारीत गुहेमध्ये कुठेतरी आपलं गृह स्वप्न पूर्ण करतात. घर म्हणजे फक्त एक चार भिंतींची निवारा ठेवण्याची जागा नसते. त्याच्यात माणसाची आपुलकी बांधलेली असते. त्यामुळे नवीन घर खरेदी हे माणसाचं नेहमीच स्वप्न असतं.
सहज खेळकरपणे घर घेणं शक्य नसतं. खूप मेहनतच करावी लागते. उन्हाळ्यात उन्हाने घाबराघुबरा होणारा जीव सुगंधाने सुखावतो. तसं खूप त्रास झालेल्या माणसाला जसं सुगंधी झुळूक शांतता देते, तसं घरी आल्यावर बरं वाटतं. त्या घराबाबत एक दुसरे वैशिष्ट्य असं असतं की सोबत म्हणून माणूस हवा असतो. निर्विकार वात्सल्य नसतं. घरासाठी केलेल्या कष्टांनी, घराच्या भेटी तात्पुरत्या उडत्या अल्पकाळाच्यासुद्धा फुलून आलेल्या असतात. त्या त्या वास्तूचा गुण असतो सहज भेटलेली वास्तूसुद्धा कधी कधी आयुष्यभर आठवत राहते. घर खरेदीचा विडा उचलला की घर खरेदी करणे हा डोंगर चढताना सोपा वाटतो. उतरताना अवघड वाटतं. निळे हिरवे सुंदर दिसणारे डोंगर सर्व छटा त्याच्यात मिसळलेल्या असतात. पण पैसे भरताना आणि हप्ते फिटताना मात्र त्रास होतो. निळ्या रंगाच सौम्य आवरण घेतलेला पर्वत उतरावादेखील लागतो. काही कारणाने स्वप्न पूर्ण होत नाही. काही कारणांनी घर वास्तू जागा सोडून जायची वेळ आली ना, तरी तो गृह वसा विकणेसुद्धा अवघड असतं. घर पहावं बांधून, तस घर पहावं विकून, असंदेखील असतं.
काही दिवस राहिल्यावर हे एकेकाळी स्वप्नवत असलेले घरदेखील माणसाला अडगळ वाटू लागतं. कारण त्याच्या नवेपण रहात नाही. ते घर आधुनिक राहत नाही. काही घरांमध्ये सर्वच काही सौम्य असतं. तर काही घरी ते दुभंग असतं. म्हणजे दोन टोकाचं असू शकते. तो पण वास्तुदोष असू शकतो. शांत अशांत याचा मिलाफ असू शकतो.
हे घर घेतल्यावरसुद्धा ते घर सगळ्यांचं असतं; पण ते घर गृहिणीचा अधिक प्रमाणात असतं. गृहिणीची स्वप्नं त्या घरात असतात. महिला संवेदनशील असल्यामुळे घराशी जास्ती बांधीलकी त्यांची असते. तुकडे तुकडे जमून तिने तो संसार मांडलेला असतो. ते घर बनवलेलं असतं. चार भिंती विकत मिळतात. पण त्याला घर बनवते. गृहिणी गृहखरेदीत मोठा वाटा महिलांचा असतो आणि काही कारणाने घर सोडून जावं लागलं तर जखमी होणारीदेखील महिलाच असते. तिने घराचा कानाकोपरा उजळून टाकलेला असता.े त्या घरातील मी स्वतःला हरवून नवं काही घडवलेलं असतं. नवीन घर घेताना महिला विचार करते मी मज हरपून बसले रे!
मी आणि माझं स्वतः स्वतंत्र आणि सुंदर सोयीस्कर घर असावं, हे स्वप्न माणसाचं नेहमीच असतं. सणवाराला, पाडव्याला, अक्षय तृतीयेला अथवा एरवीही नवीन खरेदी करायचा सुमुहूर्त समोर असतो.
चला तर वाट कसली बघताय? मी आणि माझं घर असं स्वप्न पूर्ण करू या! - शुभांगी पासेबंद