पनवेलकरांची चौपाटी - वडाळे तलाव

नेहमीच्या व्यस्त असलेल्या आपल्या दैनदिन जीवनातून अल्पकाळ का होईना दिलासा/आराम मिळावा म्हणुन प्रत्येक जण काहीतरी मार्ग शोधीतच असतो. मग अन्य पर्यटन/सागरकिनारे/गिरीभ्रमण ई. काहीही असेल. मुंबईतील सागरकिनारे म्हणजेच चौपाट्या मुंबईकरांना प्रिय आहेतच. ह्या दिलास्यातुनच तो त्याचा उर्वरीत वेळ ताज्या दमाने व्यतीत करू शकतो हे निर्विवादच.

मुंबईपासून जेमतेम ३६ कि.मी. वर असलेले अत्यंत सर्वंकष महत्वाचे ठरलेले नवी मुंबईतील पनवेल हे विकसित होणारे शहर आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ. भारताशी सर्वत्र जोडणारे रेल्वे स्थानक, मोठे बस स्थानक, औद्योगिक कारखाने व वसाहती इत्यादीनी पनवेल आपले स्वत;चे वेगळेच स्थान निर्माण करीत आहे हे निर्विवाद. दिवसाचा गडबडीचा दिवस मनोरंजन, व्यायाम, नैसर्गिक सहवास ई. नी परिपूर्ण असलेले पनवेल आणखीन वेगळ्या गोष्टीसाठी खचितच प्रसिद्ध.वडाळे तलावासभोवतालची मनसोक्त, सुरक्षितपणे पनवेलकरांची असलेली भटकंती. जणू ती पनवेलकरांची चौपाटीच. सर्वाना प्रिय असलेली व पनवेलकरांनी कधीही न चुकविली जाणारी.

वडाळे तलाव स्वरूप - पनवेलात पूर्वीपासून लहान-मोठ्या स्वरूपातील गोड्या पाण्याचे बरेच तलाव आहेत उदा. ०१़.  वडाळे, ०२. कृष्णाळे, ०३. देवळे, ०४. इसराइल. हे सर्व मानवनिर्मित तलाव आहेत व हे सारे पनवेलच्या वस्तीच्या जवळपास विसावलेले तलाव आहेत. त्यापैकी वडाळे तलावाचे नागरिकांना विशेष आकर्षण आहे. असे म्हटले तरी आजिबात वावगे ठरणार नाही. जुन्या पनवेलच्या जवळपास असलेल्या बल्लाळेश्वर व रामेश्वर महादेव देवळाच्या जवळ असलेले सुमारे २८ एकराच्या परिसरातील असे महाकाय गोडया पाण्याचे मानवनिर्मित हे सरोवर आहे त्याला वडाळे तलाव असे म्हटले जाते. बल्लाळेश्वर मंदिराजवळ लहान तलाव असूनतो विसर्जनासाठी वापरला जातो. मराठे सरदार चिमाजी आप्पाच्या कारकिर्दीतील म्हणजे सुमारे ४०० वर्षांपूर्वीचे असल्याचे समजते. त्या गोलाकार तलावाच्या काठा-काठानी दगडी भवकम बांधणीचा घाट, पदपथ बांधला आहे. गोलाकार पदपथसुमारे १३ फुट रुंदीचा असून ३.५ कि.मी.लांबीचा आहे. ह्या पदपथात अधूनमधून पूर्वीची न कापलेली झाडे आहेत. हा सारा गोलाकार पद पथ कोणत्याही वाहनांच्या अडथळयाविना असल्याने पादचारी पूर्ण सुरक्षिततेने बिनधोकपणे चालू शकतात. पनवेलकरांचे फार मोठे आकर्षण ठरते.

ह्या पदपथावर अल्पविश्रांतीसाठी दगडी बैठकांची सोय केली आहे. ह्या सरोवराच्या पूर्वेस पर्यटकांसाठी वाहनतळ, मनोरंजन सुशोभित, स्थळ करण्यात आले आहे. मुंबई -पुणे जुना महामार्ग अगदी ह्या तलावाला खेटूनच आहे. मुंबई-गोवामार्ग व नवा मुंबंई-पुणे या दोन्ही महामार्गांच्या थोड्या अंतरावर असलेले हे ठिकाण आहे. पदपथावर ठिकठिकाणी किल्ल्यातील बुरुजाप्रमाणे दगडी बांधकाम असून तेथेही आरामाची सोय आहे. पदपथाच्या दोन्ही बाजूस संरक्षक दगडी कठडे केले आहेत. तलावाच्या उत्तरेकडे जुन्या मुंबई-पुणे महामार्गाला लागुनच वाहनतळ व मुलांना खेळण्यासाठी भरपूर जागा आहे. पदपथावर अंतरावर विद्युत रोषणीचे आकर्षक खांब आहेत .पदपथावर ठीकठिकाणी विदयुत खांब ठेवले आहेत. तलावातील पाण्यात पोहणारी काळी-पांढरी बदके सा-यांचे आकर्षण ठरते. तलावातील मोठाली पाण्याची कारंजी सर्वांचे लक्ष ओढून घेतात. येथे दररोज सुमारे संध्याकाळी साडेपाच वाजल्यापासून ते अगदी मध्यरात्रीपर्यंत सर्व वयातील लोक आपापल्या सोयीने मस्तपैकी फिरण्यासाठी येतात. शुद्ध, मोकळी प्रदूषणरहित वातावरण, निसर्गाने रमणीय असा परिसर सा-यांनाच अगदी प्रसन्न करीत असतो.

तलावाला संपूर्ण फेरी संथपणे मारण्यास सर्व साधारणपणे ३५ मिनिटे लागतात. तलावाचा बाहेरचा सारा परिसर कमालीचा स्वच्छ ठेवला जातो. डागडुजी, देखभाल आदी गोष्टी पनवेल महानगरपालिकेतर्फे पाहिल्या जातात. मात्र तलावातील पाण्याच्या साफ सफाईबाबत हेळसांड झाल्याचे प्रकर्षाने जाणवत असते. तिथे वाढणारी वनस्पती वेळच्यावेळी काढली जात नसल्याने आणि भरपूर शेवाळ वाढल्याने नाही म्हणले तरी मन थोडंसं निराश होतं. पण ते वेळेवर केले जात नाही हीपण खरी गोष्ट आहे. ते जर वेळेवर केलं तर या तलावाच्या सुशीभिततेला आणखीनच बहार येईल. तलावातील पाणी पूर्णत्वाने दिसेल, जेसध्या न साफ केलेल्या वनस्पतीनी झाकोळले जात आहे़  पनवेलमधील पर्यटक आकर्षक वडाळे तलावाची शान खरोखरीच अविस्मरणीयच ठरावी.  - रामकृष्ण विनायक अभ्यंकर 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

 मेवाडचे राजा क्रांतीसूर्य महाराणा प्रतापसिंह ९ मे - महाराणा प्रताप जयंती