गणित सोपे करूया
बहुतांश विद्यार्थ्यांना गणित विषय अवघड वाटतो, त्यांच्या मनात गणित विषयाची भीती असते. वास्तविक गणित हा शालेय विषयातील एकमेव असा विषय आहे की ज्यात विद्यार्थी पैकीच्या पैकी गुण मिळवू शकतो. अर्थात त्यासाठी विद्यार्थ्यांच्या मनातील गणिताची भीती घालवून गणिताविषयी आवड निर्माण होणे महत्त्वाचे आहे. शिक्षकांनी आणि पालकांनी विद्यार्थ्यांना गणित शिकवताना किंवा गणिताचा अभ्यास घेत असताना काही वेगळे मार्ग निवडले, वेगळ्या पद्धती वापरल्या तर गणित विषय विद्यार्थ्यांचा आवडीचा विषय होईल यात शंकाच नाही. चला तर मग! सुरुवात करूया गणिताशी मैत्री करण्याची, गणित सोपे करण्याची!
गणित या विषयातील पाढ्यांचे महत्त्व
गणित हा शास्त्राचा अत्यंत मूलभूत आणि जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत वापरला जाणारा विषय आहे. कोणत्याही वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी गणिताचे ज्ञान आवश्यक असते, कारण ते केवळ शिक्षणापुरते मय्राादित राहत नाही, तर दैनंदिन जीवनातही त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात होतो. अशा या विषयाच्या अभ्यासाची पायाभरणी पाढ्यांपासून सुरू होते. पाढे म्हणजे विशिष्ट संख्यांच्या गुणाकाराचे गुणोत्तरांचे नियमितपणे पाठांतर केलेले रूप. उदाहरणार्थ, २ चा पाढा, ३ चा पाढा, इत्यादी.
पाढ्यांचे स्वरूप आणि मूलभूत गरज
गणित शिकण्याची खरी सुरुवातच पाढ्यांपासून होते. बालवयातच १ पासून २०पर्यंतचे पाढे मनात ठसले, तर नंतरच्या शिक्षणातले अनेक गणिती प्रकार सुटसुटीत व सहजतेने समजायला लागतात. पाढे म्हणजे एका विशिष्ट संख्येची पुनरावृत्ती होणारी बेरीज. उदाहरणार्थ, ५ चा पाढा म्हणजे ५, १०, १५, २०% हे प्रत्येकवेळी आधीच्या संख्येत ५ मिळवले जातात. यामुळे मुलांनागुणाकाराची संकल्पना सहज उमजते.गणिती संकल्पनांमध्ये पाढ्यांचे महत्त्वगुणाकार, भागाकार, अपूर्णांक, प्रमाण, लसावी व मसावी, क्षेत्रफळ, परिमाण,सरासरी, इत्यादी गणितातील अनेक संकल्पनांमध्ये पाढ्यांचे महत्त्वपूर्णस्थान आहे. उदाहरणार्थ, जर एखाद्या विद्यार्थ्याला ८ चा पाढा लक्षातअसेल, तर ८ X ७ = ५६ हे उत्तर तो पटकन सांगू शकतो, ज्यामुळे वेळेची बचतहोते. यामुळे गणिती उदाहरणं जलद सोडविता येतात, आणि परीक्षेत आत्मविश्वास वाढतो.
दैनंदिन जीवनात पाढ्यांची उपयुक्तता
पाढे फक्त शाळेपुरतेच मय्राादित नाहीत. दैनंदिन व्यवहारातदेखील त्यांचाउपयोग होतो. दुकानात खरेदी करताना, उरलेली रक्कम मोजताना, सवलत काढताना,शेअर बाजारातील व्यवहार समजून घेताना, अगदी स्वयंपाक करताना प्रमाणठरवताना पाढ्यांची मदत होते. उदाहरणार्थ, एखादी वस्तू ७ रुपयांना आहे आणि ती वस्तू ६ हवी असेल, तर ७े६ृ ४२ हे तोंडपाठ असल्यास लगेच उत्तर सांगता येते. यासाठी कॅल्क्युलेटरवापरण्याची गरज भासत नाही.
पाढ्यांमुळे आत्मविश्वास व गती
शाळेतील गणिताच्या परीक्षांमध्ये वेळेचे व्यवस्थापन खूप महत्त्वाचे असते.पाढे पाठ असतील, तर मूल जलदगतीने उदाहरणं सोडवू शकतो. यातून आत्मविश्वासवाढतो, आणि गणिताविषयी भीती कमी होते. बऱ्याचदा गणिताची भीती केवळ हिशोबकरण्यात लागणाऱ्या वेळेमुळे आणि चुका होण्याच्या भीतीमुळे असते. पण जरपाढे पक्के असतील, तर मूल अचूकतेने आणि गतीने हिशोब करू शकतो, जेगणितातील यशाचे मुख्य कारण ठरते.
पाढे पाठांतर आणि स्मरणशक्तीचा विकास
पाढ्यांचे पाठांतर केवळ गणितासाठीच नव्हे, तर एकंदर स्मरणशक्तीसुधारण्यासाठी उपयुक्त ठरते. लहान वयात जर मूल पाढे पाठ करत असेल, तरत्याच्या मेंदूच्या स्मरणशक्तीचा भाग सक्रिय राहतो. यामुळे नंतरचे धडेहीलवकर लक्षात राहतात. पाढे हे तोंडपाठ करण्याचा एक प्रकार असल्यानेस्मरणशक्तीचा व्यायाम होतो.
शैक्षणिक घडामोडींसाठी पाढ्यांचे महत्त्व
सरकारी आणि खासगी शाळांमध्ये घेतल्या जाणाऱ्या गणिती स्पर्धा, ऑलिंपियाड,अभ्यासक्रमाच्या चाचण्या, शिष्यवृत्ती परीक्षा या सर्व ठिकाणी वेग आणिअचूकता महत्त्वाची असते. हे दोन्ही घटक पाढ्यांमुळे साध्य होतात. म्हणूनचशिक्षक आणि पालकांनी मुलांना लहानपणापासूनच पाढ्यांचे पाठांतर शिकवणेगरजेचे आहे.
पाढे शिकवण्याचे उपाय
पालक आणि शिक्षकांनी काही सोप्या पद्धतींनी मुलांना पाढे शिकवावेत :
१) गीतांमध्ये पाढे म्हणणे गाण्याच्या चालीत पाढे म्हटल्यास लक्षात ठेवायला सोपे जाते.
२)पलॅशकार्ड्सचा वापर संख्यांचे कार्ड्स तयार करून मजेदार खेळासारखे शिकवणे.
३)स्पर्धा आणि बक्षीस योजना पाढे म्हणण्यात चांगले काम करणाऱ्या मुलांना प्रोत्साहन देणे.
४)दैनंदिन व्यवहारातून शिकवणे खरेदी करताना किंवा स्वयंपाकात मोजणी करताना पाढे उपयोगात आणणे.
पाढे पाठ नसल्यास होणारे परिणाम
जर विद्यार्थ्यांना पाढे चांगले येत नसतील, तर गणितातील पुढची उदाहरणंसोडवताना अडचणी येतात. गुणाकार, भागाकार करताना वेळ लागतो, चुका होतात,आत्मविश्वास ढासळतो आणि कधी कधी गणिताप्रती भीती निर्माण होते. त्यामुळेपाढे हे गणिताचा पाया आहेत असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही.
गणित हा विचारशक्ती वाढवणारा आणि जीवनात अत्यंत उपयुक्त ठरणारा विषय आहे.त्याची सुरुवात पाढ्यांपासून होते. पाढे हे गणितातील इमारतीचा पाया आहेत.जोपर्यंत पाढे पाठ नाहीत, तोपर्यंत गणितातील इतर संकल्पनांचा अभ्यास सोपाहोत नाही. म्हणूनच प्रत्येक विद्यार्थ्याने १ ते २० पर्यंतचे पाढे पाठकरावेत आणि पालक-शिक्षकांनीही त्यांना प्रोत्साहन द्यावे. पाढे येणं म्हणजे केवळ गुणाकार लक्षात ठेवणे नव्हे, तर गणिताशी मैत्री करण्याचापहिला टप्पा आहे. - शेखर शांताराम जगताप