चित्रदुर्गच्या आसपासच्या परिसरातील स्थळे
अदुमल्लेश्वर : हे एक प्रसिद्ध मंदिर असून, ते किल्ल्यापासून पाच किलोमीटर अंतरावर आहे. येथे एक शिवमंदिर आहे. नंदीच्या मुखातून चालणारे बारमाही प्रवाहदेखील आहे जवळच एक तळे आहे. त्यात दुर्मीळ मासे आहेत.
बागुरु : होसदुर्गापासून १० किलोमीटरवर असलेले हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे. येथे श्री प्रसन्ना चन्नकेशव स्वामी नावाचे एक प्राचीन मंदिर (चोळकालीन) आहे. तेथे सुंदर रथ आहे आणि विविध प्राचीन मूर्ती आहेत. येथील परिसरात १०१ मंदिरे व विहिरी आहेत.
सिद्धपूर : हे एक महत्त्वाचे पुरातन स्थळ आहे, जिथे सम्राट अशोकाचे शिलालेख सापडले. जवळच रामगिरी नावाची एक उंच टेकडी आहे. रामायणाच्या कथेशी या टेकडीचा संबंध सांगितला जातो. इ. स. ९००मधील रामेश्वर मंदिरही येथे आहे.
चिकजाजूर : येथे एक किल्ला आहे, या शहराचे मुख्य आकर्षण म्हणजे ५०० वर्षांपूर्वीचे मारुतीचे मंदिर. अडणूर भीमप्पा शानभाग यांनी याचा जीर्णोद्धार केला.
- सौ.संध्या यादवाडकर