सावधान : आपली सहनशीलता संपत चाललीय का?

आपल्याला एखाद्या गोष्टीविषयी, कोणी काही अपशब्द बोलल्यावर, आपल्या सोबत एखादी अप्रिय घटना घडल्यावर, आपल्याला राग आल्यावर, एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध घडली तर आपण कोणावर रागावतो का, कीएखादी अप्रिय घटना करून बसतो, की सहन करून त्याकडे दुर्लक्ष करून ते सोडून देतो. यावर खूप मोठेकाही अवलंबून असते. अनेकदा यामुळे आपल्या अस्थित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊन बसते. प्रसंगी अस्तित्व संपूही शकते.

   आपण अनेकदा वर्तमान पत्रातून अशा प्रकारच्या घडलेल्या अनेक घटना वाचत असतो किंवा टीव्ही वर बघत असतो, की क्षुल्लक कारणावरून एकाने दुसऱ्याचा जीव घेतला किंवा रस्त्यावरून जाता जाता एखाद्याचा धक्का लागला अन्‌ तेथे त्याची सहनशीलता संपली आणि तेथेचएकमेकाची तुफान हाणामारी झाली. मग दवाखाना, पोलीस, वकील, कोर्ट या सर्व गोष्टी ओघाने आल्याच,या फेऱ्यात अडकून त्यात ते दोघेही किती पिळून, होरपळून निघणार आहेत हे त्यांना पुढील काहीदिवसात, महिन्यात त्याचा प्रत्यय येतो. मग ते पश्चाताप करत बसतात. अरे यार, आपण थोडी सहनशीलतादाखवली असती तर ? पण तो पर्यंत पोलीसाने, वकीलाने त्याचे काम करून झालेले असते. त्यानंतर पोलीस ठाण्याच्या, कोर्टाच्या फेऱ्या सुरु होतात. कित्येक महिने, वर्ष यातून सुटका होत नाही. असे प्रकार समाजातअनेकासोबत कळत नकळत घडलेले आहेत, घडत असतात, अनेकाना अशा प्रसंगातून जावे लागते. पणप्रत्येकाने, ज्याने त्याने ठरवायचे आहे की असा प्रसंग जर तुमच्या समोर कधी उद्‌भवला तर ते सहन करूनत्याकडे दूर्लक्ष करून पुढे चालायचे. का सहन न करता आरे ला कारे करीत मनस्ताप करीत बसायचे ?यातून तुमच्या थोड्याशा सहनशिलतेने तुम्ही एखादी अप्रिय घटना, मनस्ताप टाळू शकतात, तसेच तुम्हीत्या पासून होणाऱ्या दुष्परिणामापासून स्वतःला, समोरच्याला वाचवूही शकता. हे वास्तव आहे.

   असे म्हणतात कि कुत्रा आपल्याला चावला तर माणूस कुत्र्याला चावत नाही. तद्वतच एखाद्या क्षुल्लक गोष्टीकडे दुर्लक्ष केलेलेच बरे. समोरची व्यक्ती भांडण्याचा पावित्र्यामध्ये असेल तर आपण गांधीगिरी केलेली केव्हाहीचांगलीच. आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकजण परेशान आहे, समस्याग्रस्त आहे. त्यामुळे त्यांचीसहनशीलता संपत चालली असून अशी लोकं शीघ्रकोपी होत चालली आहेत. त्यामुळे अशा क्षुल्लक, क्षुल्लकघटनाही त्यांना सहन होत नाहीत. त्यातच काही लोकं आपला सयंम सोडून थोड्या थोड्या, अतिशयक्षुल्लक कारणावरून रागाच्या भरात काही तरी उलट सुलट करुन बसतात. त्यामुळे कधी कधी त्यातूनसमस्या निर्माण होऊन, त्यांचे अस्तित्व धोक्यात येऊन त्याचे विपरीत परिणाम त्यांच्या जीवनात निर्माणहोऊन ते अडचणीत येतात. येऊ शकतात. अशा कित्येक घटना आपल्या आसपास घडत असतात. यानेकित्येकाचे आयुष्य उध्वस्त झालेले आहे. काही दिवसापुर्वीचीच घटना आहे. घटना औरंगाबादमधील आहे. एका कुटुंबातील एका दिवशी पती काही कारणामुळे कामावर गेला नव्हता. त्याची पत्नी सहज त्यालाम्हणाली आज कामावर का गेला नाहीत. एवढे विचारणेही त्याला सहन झाले नाही, एवढ्या क्षुल्लककारणावरून पतिने आपल्या पत्नीला विष पाजले. तीला जिवंत मारण्याचा प्रयत्न केला. आज तीदवाखान्यात उपचार घेत आहे तर पती जेलमध्ये आहे. त्या वेळी पतीने थोडी सहनशीलता दाखवलीअसती तर आज दोघांची जी वाताहत, होरपळ झाली आहे ती झाली नसती. पोलीस, कोर्ट या कचाट्यात पती अडकला असून तो त्यात भरडून जात आहे.

 अशीच नुकतीच एक घटना धाराशिव जिल्यात मध्येघडलीय ती अशी, एका क्षुल्लक कारणावरून मुलाने आई वडिलाच्या पोटात चाकू भोसकला. त्यात वडीलाचा जीव गेला तर आई दवाखान्यात उपचार घेत आहे. वडील जीवानिशी गेले तर मुलगा जेलमध्येआहे. अशा अनेक वेग वेगळ्या प्रकारच्या अतिशय क्षुल्लक कारणावरून मोठ्या घटना घडत असतात.घडत आहेत. थोड्या थोड्या शुल्लक शुल्लक कारणा वरून अनेकांचे संसार उध्वस्त झालेले आहेत. अशा प्रकारच्या बातम्या आपल्याला वर्तमानपत्रातून वाचनात येतात. टीव्हीवर पहायला मिळतात. आपल्या आजूबाजूला घडत असतात. यावरून माणसाची सहनशीलता खरोखरच संपत चाललीय का याचा विचार आल्यावाचून राहत नाही. आजकाल प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला आहे. एका सेकंदात माहीतीची, फोटोची, व्हिडीओची देवाणघेवाण होत असते. यात ट्रोलिंग नाचाचा प्रकार उदयास येत आहे, आला आहे.सोशल मिडीयावर एखादी पोस्ट टाकली तर बघणारांचे, वाचणाराचे त्यात उलट सुलट कमंट येत राहतात. तर काही पोस्टला बघणारे, वाचणारे लोक अतिशय वाईट रिप्लाय देत रहातात. अशाच प्रकारची ट्रोलिंग सहन न झाल्याने काही आत्महत्या होत आहेत. हे ट्रोलिंग करणारे लोक अदृश्य असतात. तरी पण काही लोकांना हे सहन होत नाही. ते आपला शेवट करून घेतात. तर कधी कधी यावरून दंगली होतात. लोक असे का वागत असतात, कशा मुळे त्यांची सहनशीलता संपत चाललीय ? हे त्यांचे त्यांनाच माहित.

भावकीतील अशाच क्षुल्लक कारणावरून होत असलेल्या भांडणाचाही उल्लेख येथेकरावा लागेल. भाव-भावकीतील भांडणे तर आपण सर्व जण आपल्या आजू बाजूला बघतच असतो. ऐकत असतो. फुट दोन फुट शेताच्या बांधामुळे सख्खे भाऊ तसेच, भावा भावाचे कुटुंब समोरासमोर येऊन तुला बघून घेतो म्हणत ते एकमेकांना संपवायची भाषा करतात किंवा अनेकदा शेजारी शेजारीही एखाद्या क्षुल्लक कारणावरून एकमेकाच्या जीवावर उठतात. एकमेकांना संपवायची भाषा करतात. कधी कधी ते सत्यातही आणतात. यातून अनेक कुटुंबे उध्वस्त झालेली आहेत. अशा अनेक घटना आपल्या आसपास घडत आहेत. घडल्याही आहेत. अशीच एक घटना मला येथे नमूद करावीशी वाटते. एका गावात दोन सख्या भावा मध्ये शेताच्या फुट/दोन बांधासाठी भांडण होऊन आधी बाचाबाची झाली आणि  नंतर त्याचे परिणाम तुफान हाणामारीत झाले. हे प्रकरण, भांडण एवढे विकोपाला गेले होते की त्यातील एका भावाच्या कुटुंबातील सगळ्यांनी मिळून आपल्या दुसऱ्या भावाच्या कुटुंबातील सर्व जणांची हत्या केली, त्यातील सर्वाची हत्या केली . त्यांचे पूर्ण अस्तित्वच संपवून टाकले. त्या कुटुंबात भावासह पाच जण होते. ते तर सर्व जीवानिशी गेले. तर इकडे ज्या भावाने व त्याच्या कुटुंबाने त्यांची हत्या केली, या कुटुंबातील सर्व पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा झाली. अक्षरशः ती फुट दोन फुट जमीन तर जागेवरच राहिली पण यात दोन कुटुंबाचे अस्तित्वच संपले. खरोखरच याला सहनशीलता संपल्याचे लक्षण म्हणावे नाही तर अजून काय म्हणावे ? अशा कित्येक घटना सांगता येतील. समाजात घडनाऱ्या अशा घटनेमुळे आपण स्थब्ध होऊन जातो. अरे त्याने थोडी सहनशीलता दाखवली असती तर ?

 आज त्याच्यावर हा वाईट प्रसंग, वेळ आली नसती. असे आपल्या मनात आल्यावाचून रहात नाही. पण म्हणतात ना होणाऱ्या गोष्टी टळत नसतात. पण थोडा समंजसपणा दाखवला तर अशा क्षुल्लक कारणावरून उद्‌भवणाऱ्या अप्रिय घटनेपासून आपण सावरू शकतो. असाच अजून एक सहनशीलता नसलेल्या भांडणाचा प्रकार म्हणजे, गावागावातील शेतकरीआपली जमीन शेजाऱ्याकडे थोडी जास्त गेलेली आहे किंवा त्याने बांध कोरलेला आहे. अशा प्रकारच्या भांडणा नंतर त्यातील एक (पिडीत) शेतकरी ती जमीन मोजून घ्यायचा निर्णय घेतो. तालुक्याला एक सरकारी भूमिअभिलेख नावाचे कार्यालय असते. शेतकऱ्याला आपली जमीन मोजून घेण्यासाठी तेथे काही रक्कम भरून जमीन मोजणीसाठी अर्ज करावा लागतो. रीतसर तेथे अर्ज केल्या नंतर त्या कार्यालयातील कर्मचारी (मोजीनदार) दोन ते चार महिन्याचा कालावधी दरम्यात येऊन जमीन मोजून देतात. सरकारी कागद पत्रानुसार (सातबारा /८ अ) ते त्या जागेवर खुणा करून, हद्द ठरवून देतात. पण हे भांडण एवढयावर मिटत नाही. ज्याच्याकडे जमीन जास्त गेलेली आहे, किंवा ज्याने बांध कोरलेला असतो तो शेतकरी ती जमीन सोडत नाही, मोजीनदाराने केलेल्या खुणा, दाखवलेली हद्द तो मान्य करीत नाही. एवढेच काय तो ती मोजणीच मान्य करीतनाही. मग दोघेही इरेला पेटतात. ज्या शेतकऱ्याने काही रक्कम भरून मोजणीसाठी अर्ज केलेला असतो तो हे सहन न झाल्याने दोघात, दोघांच्या कुटुंबात एकमेकात बाचाबाची होऊन हाणामाऱ्या होऊन, एकमेकाचा खून करन्यापर्यंत प्रकरण जाते. मग पोलिसात, कोर्टात जाते. ते कोर्टात गेल्यावर कित्येक वर्ष चालत राहते. गेलेला पैसा, कधी कधी गेलेली व्यक्ती, झालेला मनस्ताप या शिवाय हाती काहीच लागत नाही. मनात नक्कीच विचार येऊन जातो की उगीचच या मार्गाला गेलोत. थोडी सहनशीलता दाखवली असती तर ? पण तो पर्यंत खूप सारे भोगलेले असते. या सर्वापासून दूर राहायचे असेल तर क्षुल्लक क्षुल्लक गोष्टीकडे दुर्लक्ष करणे, तसेच आपली सहनशीलता  वाढवण्याशिवाय प्रर्याय नाही. सहनशीलता आणि हास्य हे यशस्वी व्यक्तिचे दोन महत्वाचे गुण आहेत. कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही तर सहनशीलता प्रश्न निर्माणच करत नाहीत. बघा.. आपल्याला काय वाटते, विचार करा. पटतेय का बघा. आपल्याला काय वाटते ? - व्ही.एम. देशमुख 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

जर्मनी : युरोपचे हृदय