सुखी राहणे आपल्या हातात

डॉक्टरांच्या व्हाट्‌सअप ग्रुप आमचे मित्र डॉ. सचिन खोडदे यांनी बदलत्या जीवनशैलीमुळे, विशिष्ट अनुवंशिक व्याधींमुळे कदाचित निरोगी राहणे आपल्या हातात नाही, परंतु सुखी राहणे आपल्या हातात आहे. सुखी जीवना करिता जीवनशैलीत काय बदल करावा ? असा एक प्रश्न पोस्ट केला.  यावर डॉ. मीनल गोडसे, डॉ. मीनाक्षी कुऱ्हे यांनी आपले मौलिक विचार मांडले. त्याचा सारांश...

१) आपल्यापैकी प्रत्येक जण आकाराने, वजनाने, दिसण्याने, आचार, विचार, वागणे याने वेगळा आहे. तरीही प्रत्येकजण सुंदर आणि अद्वितीय आहे. आपण जसे आहात तसे आपणास स्वीकार. दुसऱ्यांच्या तुलनेच्या भानगडीत पडू नका. स्वतःवर प्रेम करायला शिका.

२) मत मतांतर असणे, नुकसान होणे, भांडण होणे, अपमान होणे, अपेक्षा पूर्ती न होणे हे नॉर्मल आहे यांनी आपले मानसिक संतुलन बिघडून देऊ नका.  Imperfection is perfection.

३) काम करणाऱ्याच व्यक्तीकडूनच चुका होतात. चूक झाली तर स्वतःलाही माफ करा. अपराधी भावना फार काळ मनात जागृत ठेवू नका.

४) जे तुम्हाला उत्तम येते तुम्ही अधिक चांगलं करा. त्यात पारंगत व्हा. उत्तमोत्तम होण्याचा प्रयत्न करा; पण त्यासाठी हव्यास करू नका.  

५) जे जमत नाही, ते सुधारण्याचा प्रयत्न करा. प्रयत्न करूनपण सुद्धा जमत नसेल तर विसरून जा.

६) दररोज किमान एकतरी चांगलं काम करा.

७) भविष्याची तयारी, चिंता करताना. आजचा आनंद विसरु नका. वर्तमान काळात जगा. भूतकाळ चघळत बसू नका. आपल्या आयुष्यात अनेक चांगल्या गोष्टी घडत असतात, त्या विसरू नका.

ठरवा कस  जगायचं?
कण्हत कण्हत की गाणं म्हणत...

८) स्वतःच्या विचारांशी प्रामाणिक रहा.  

९) व्यक्त व्हा. आजुबाजूच्या लोकांशी संवाद साधा. एकमेकांशी संबंध टिकून राहण्यासाठी भावना अगदी नकारात्मक असल्या तरी, दुसऱ्यांचा आदर राखून व्यक्त करा. त्या भावना मनात दडपून ठेवू नका.

१०) नाही म्हणायला शिका. प्रामुख्याने हे महिलांसाठी लागू आहे. त्या आपल्या लोकांसाठी (नवरा, मुले बाळे, नातवंडे इ.) यांसाठी त्यांच्या शक्तीच्या पलीकडे जाऊन काम करत राहतात.  Don't Stretch yourself beyond your limit

११) स्वतःसाठी वेळ राखून ठेवा. मग तुम्ही त्यात तुमच्या आवडीनिवडी, छंद जोपासा. आपला आनंद आपण शोधा, त्याकरिता इतरांवर अवलंबून राहू नका.  

१२) तुमच्या पैशाचा तुम्ही उपभोग घ्या.

१३) बाकी तुम्हाला माहितीच आहे, संतुलित आहार घ्या, पुरेशी झोप घ्या. निरोगी रहा. आहारात कंजूशी करा, पण व्यायामात नको.

ज्यामुळे कृतीमुळे शरीरात dopamine, serotonin, endorphins, and oxytocin  या संप्रेरकाचे चे प्रमाण वाढते, थोडक्यात ज्यामुळे आपल्याला चांगल वाटत ते नक्की करा.

मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं ?

(संकलित)
-डॉ.अरुण कुऱ्हे, ज्येष्ठ फॅमिली फिजिशियन 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मनोरुग्णतेच्या दिशेने