निसर्ग... मनाचा सखा

उन्हाळ्याच्या काही अपरिहार्य कारणामुळे या वेळेस आम्ही गड-किल्ल्यांवर जाऊ शकलो नव्हतो! शेतात, फार्महाऊसवर निसर्ग सानिध्याचा पुरेपूर आनंद त कोंडलेल्या, डांबलेल्या मनास मनसोक्त उधळतं राहिलो! अजूनही जीवनाचा खरा अर्थ खरचं कळला नाही हो आम्हाला! चांगल्या माणसांच्या सानिध्यात काही घटका आनंदून घालवण्यासारखा सुख नाही! याच्यासारखी आलेली सुवर्ण संधी नाही! आपल्यातील चांगले, सुंदर जे आहे वाटून मोकळं व्हावं! जगणं सत्कारणी लावावं!

 तो२१ मार्च २०२५चा दिवस उगवला होता! एक एक दिवस आतुरतेने वाट पाहत होतो! आम्ही सर्वच त्या क्षणांची वाट पाहात होतो! दिवस उगवायला, पुढे सरकायला सूर्य देव जरा काचकूच करीत होता! सूर्यदेव तसा नियमाला पक्का आहे! त्याच्याजवळ प्रलोभन, भ्रष्टाचार अजिबात चालत नाही! सूर्यदेव नियमाचे पक्के आहेत! ते नियम काटेकोरपणे पाळतात! अहो सूर्यदेव तरी कसा बदलणार नियम ? त्यांची वेळ,काळ सेकंदावर ठरलेली असतें! पृथ्वी स्वतःभोंवती फिरतांना सूर्याभोवती फिरण्यात दंग असतें! पृथ्वी ही तिच्या अस्तित्वापासून फिरतेचं आहे! आजपर्यंत कधीही खंड पडला नाही! तिची परोपकारी, निर्मळ सेवा अखंड सुरूच आहे!

माणसाची गोष्टच वेगळी असतें! वेळ न पाळणे हिचं माणसाची खरी ओळख आहे! तेच त्याचं आळशी शस्त्र आहे! ‘सगळं द्यावे मज खाटल्यावरी,' असे अवगुण घेऊन हिंडणारा माणूस आळशी असूनही स्वतःच ओरबाडण्यासाठी अतिशय उतावीळ असतो! सृष्टी निर्माता विधात्याने माणसाला अति शहाणपणाची बुद्धी दिलेंली आहे! माणूस बुद्धीच्या जीवावर काहीही करू शकतो! पुढे गेलेल्यांना मागे ओढू शकतो! मागे राहिलेल्यांना पुढे ओढू शकतो! धडश्या मारीत पुढे जाऊ शकतो! सत्शीलता विकून स्वस्वार्थ पाहणारा माणूस काहीही करू शकतो बरं! पण येथे साक्षात सूर्यदेवाशी पंगा घ्यायचा होता! बुद्धीचे तारे कितीही तोडले तरी वेळ बदलणारी नव्हती! मानूस हतबल झाला की बुद्धीला झापडं बसते! मती गुंग होते! छातीवर दगड ठेवून आतुरतेला आवर घालावा लागतो! बुद्धी पंगू होते! हातपाय बांधून ठेवावे लागतात! आम्ही वाट पाहात होतो २१मार्चची!
रात्रंदिवस मिनिट, सेकंद मोजून काढावे लागलेत आम्हाला! चुळबुळ, उत्साह, आतुरता, हुरहूर करीत दिवस मागे रेटीत होतो! कितीही उड्या मारल्या तरी माणूस आपली हतबलता प्रकट करीत असतो! सृष्टीचां सुंदर पसारा नित्य आहे! निर्मिती विलयाचा खेळ सत्य आहे! मानूस खेळणं आहे! बाहुले आहे, पराधीन आहे तरीही माणूस नावाच्या खेळण्याला २१ मार्चचं पहिलं सूर्यदर्शन झालं होतं!

  सांगितलेल्या ठिकाणी निघण्याची वेळ झाली होती! नेहमीपेक्षा हटके दिवस उगवला होता!'चला जाऊ या गड किल्ल्यांवर' या सेवाभावी संस्थेचे संस्थापक श्री. वसंतराव बागूल सर, त्यांचे उजवे डावे हात श्री. बाळासाहेब चौधरी सर, श्री.चंद्रशेखर जोशी सर तसेंच त्यांचे दुसरे सहकारी श्री. चंद्रशेखर राशीनकर सर अन मी स्वतः त्या मोहिमेचे सहयोगी होतो! उन्हाची तीव्रता वाढली होती; पण ठिकाण निवडलं होतं! प्रत्येकजण आपापल्या गाडीने गूगल मॅप लावून निघाला होता! पुण्यातल्या वाघोली जवळ असणारे आव्हाळवाडी गाव आहे! ऊसाच्या शेतात एकांत ठिकाणी, निर्मनुष्य ठिकाणी ते लोकेशन सांगत होतं! आम्ही सर्वजन बाळासाहेब चौधरी सरांचे मित्र मुरकुटे सरांच्या फार्महाऊसवर जाऊन धडकलो होतो! त्यांचे मित्र आमचे जिवलग मित्र झाले होते!

 जिकडे पाहावा तिकडे हिरवागार ऊस उभा दिसत होता! निर्मनुष्य ठिकाण होतं! उन्हाची तीव्रता वाढली होती! फार्महाऊसला आंब्याच्या झाडांनी, अमराईनें सुंदर सजविले होते! कमरे एवढ्या झाडांवर अनंत आंबे झोका खेळत होते! मागील बाजूस कांद्याचं पीक उभं दिसत होते! कांद्याचं हिरवगार पीक बोअरचं पाणी पीत होतं! फार्म हाउसही नटून, थटून, सजून आमच्या स्वागतास उभं होतं जणू! माणूस एकांत स्थळाचां भुकेला असतो! दगदग, कटकट, अशांत अशा माणसाळलेल्या गर्दीतून, वर्दळीतून शांत, एकांत ठिकाण जाऊन मनाला फुलविण्यासाठी एकांती औषध शोधित असतो! मन एकांती जाऊन हृदयात दबलेलं सर्व बरळून बाहेर काढीत असतो! ओझे हलकं करीत असतो! सच्च्या निसर्ग मित्रांच्या कुशीत झोकून देत असतो!

  आम्ही तप्त उन्हाच्या साक्षीने, हिरवळीच्या सानिध्यात, फार्महाऊसवर जाऊन एकमेकांचं हृदय आतून बाहेरून, उलटे पालटे करून एकांती मनसोक्त गप्पा मारत निसर्ग कुशीत नैसर्गिक आनंद घेत राहिलो! मनात खच्चून भरलेला प्रदूषित कचरा दूर फेकून देत नैसर्गिक प्राणवायू घेत राहिलो! निसर्ग सानिध्यात एकरूप होत राहिलो! चला जाऊ या गडकिल्ल्यांची मोहीम स्मरण करीत राहिलो! गप्पांची मैफिल सजवत राहिलो! नवं सगळं अंतरी उतरवत राहिलो! श्री. मुरकुटे सरांच्या फार्महाऊसवर त्यांच्या हातांनी केलेलं स्वादिष्ट जेवण, वरण, भात, पनीरभाजी अन चपातीचा आस्वाद घेत राहिलो! त्यांच्या आग्रहपूर्वक आमंत्रणाचा आनंद घेत होतो! त्यांच्याचं मळ्यातील कैरी, कांदे सॅलड म्हणून नैसर्गिक आस्वाद द्विगुणित होत राहिला!

उन्हाळ्याच्या काही अपरिहार्य कारणामुळे या वेळेस आम्ही गड-किल्ल्यांवर जाऊ शकलो नव्हतो! शेतात, फार्महाऊसवर निसर्ग सानिध्याचा पुरेपूर आनंद घेत कोंडलेल्या, डांबलेल्या मनास मनसोक्त उधळतं राहिलो! अजूनही जीवनाचा खरा अर्थ खरचं कळला नाही हो आम्हाला! चांगल्या माणसांच्या सानिध्यात काही घटका आनंदून घालवण्यासारखा सुख नाही! याच्यासारखी आलेली सुवर्ण संधी नाही! आपल्यातील चांगले, सुंदर जे आहे वाटून मोकळं व्हावं! जगणं सत्कारणी लावावं! ही संधी साधून आमच्यातीलचं सतपुरुष श्री.मुरकुटे सरांचां प्रेमळ आग्रह, जेवणाची मेजवानी आयोजन सदाचार शिकवून गेला! मन तृप्त होत राहिलं! आम्ही दुपारी १२ वाजता फार्महाऊसवर आलो होतो! निघतांना संध्याकाळी ५-३५ झाले होते! समृद्ध अनुभव, आनंद क्षण अनुभवत पून्हा दररोजच्या रहाटगाडग्यास बांधण्यास निघालो होतो! - नाना माळी 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

हरवलेलं गारीगार..!