कम्फर्ट झोन
सध्याच्या काळात पालक आपल्या मुलांना कम्फर्ट झोनमध्येच बांधून ठेवणे योग्य मानतात. कारण त्यांच्या मते आपल्याला ज्या समस्यांचा, संकटांचा सामना करावा लागला तो आपल्या मुलांना होऊ नये अशी त्यांची धारणा असते. ज्या गोष्टी आपल्याला मिळत नव्हत्या त्या गोष्टी आपल्या मुलांना सहज रित्या मिळवून देण्यात त्यांना स्वतःचे यश वाटते. त्यामुळे बऱ्याच वेळेला त्या मुलांचा बोन्साय झालेला दिसून येतो. संकट प्रसंगी काय करावे? हे त्यांना कळत नाही. अशा वेळेस ते गोंधळतात. निर्णय घेऊ शकत नाहीत. अपयशाने लवकर खचतात.
कम्फर्ट झोन ही स्वतःला सुरक्षित वाटणारी.. पण एक अतिशय धोकादायक संकल्पना आहे. नियमितपणे आपण स्वतःला कम्फर्ट झोनमध्ये ठेवून विकसित करू शकत नाही. यशस्वी होण्यासाठी कम्फर्ट झोनच्या बाहेर पडणं, चॅलेंज स्वीकारणं, स्पर्धा किंवा आव्हान स्वीकारणे आवश्यक असते. भित्या पाठी ब्रह्मराक्षस' अशा पद्धतीने काम करणारी माणसे जीवनात यशस्वी होण्याची शक्यता फार कमी असते.
एका गावात तेथील स्थानिक शासन संस्थेतर्फे वाहनांमुळे होणाऱ्या दुर्घटना कमी करण्यासाठी दरवर्षी एकही दुर्घटना न करणाऱ्या वाहनचालकाचा ते सत्कार करत असत. गेल्या पाच वर्षापासून हा पुरस्कार एक व्यक्ती मिळवत असते. अशावेळी अनेक वार्ताहर त्याची मुलाखत घेऊ इच्छितात. मुलाखतीत जेव्हा त्याच्या वाहन चालवण्याच्या कौशल्याबद्दल विचारणा केली जाते तेव्हा तो जे उत्तर देतो ते फार चमत्कारिक असते. तो म्हणतो मी गाडी घेतल्यापासून आजपर्यंत कधीही रस्त्यावर चालवलेली नाही. त्यामुळे माझ्या वाहनामुळे कधीही दुर्घटना होण्याची शक्यताच नाही. या त्याच्या उत्तराने वार्ताहर आणि ते बक्षीस देणारेसुद्धा अचंबित होतात आणि आपण काहीतरी चुकीचे केले ही भावना त्यांच्या मनात निर्माण होते. आपण संकटांना घाबरून अशाप्रकारे घरातच बसून राहिलो तर कधीही प्रगती करू शकणार नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावरसुद्धा अनेक मोठमोठी संकटे आली. त्यांनी प्रत्येक संकटांचा अत्यंत सावधपणे प्रतिकार केला. पण ते कधीही संकटाला घाबरून मागे फिरले नाहीत. त्यांच्या एकूण जीवन चरित्राचा अभ्यास केला तर आपल्या सहज लक्षात येते की संकटेच माणसाला ताकद देतात, ऊर्जा देतात, बळ देतात, सामर्थ देतात. सध्याच्या काळात पालक आपल्या मुलांना कम्फर्ट झोनमध्येच बांधून ठेवणे योग्य मानतात. कारण त्यांच्या मते आपल्याला ज्या समस्यांचा, संकटांचा सामना करावा लागला तो आपल्या मुलांना होऊ नये अशी त्यांची धारणा असते. ज्या गोष्टी आपल्याला मिळत नव्हत्या त्या गोष्टी आपल्या मुलांना सहज रित्या मिळवून देण्यात त्यांना स्वतःचे यश वाटते. त्यामुळे बऱ्याच वेळेला त्या मुलांचा बोन्साय झालेला दिसून येतो. संकट प्रसंगी काय करावे? हे त्यांना कळत नाही. अशा वेळेस ते गोंधळतात. निर्णय घेऊ शकत नाहीत. अपयशाने लवकर खचतात. बऱ्याच वेळेला ही मुले आव्हानांचा किंवा चॅलेंजचा स्वीकार करत नाही. कारण त्यांना त्यांच्या जीवनात अनेक गोष्टी या सहजगत्या मिळालेल्या असतात. स्वतःच्या क्षमता, मर्यादांची जाणीव न होताच जीवन जगत असतात. परिणामी ही मुले अनेक प्रलोभनांना बळी पडतात. सर्व काही सहज रित्या मिळत असल्याने संघर्ष करून, कष्ट करून मिळवणे माहीतच नसते. स्वतःच्या क्षमताच माहीत नसल्याने त्यांचा पुरेपूर वापर करीत यश मिळवणे हेही माहीत नसते. पाश्चात्य संस्कृतीच्या अंधाणूकरणामुळे स्वतःच्या संस्कृती विषयी कमीपणाची भावना वाढीस लागलेली असते. एकमेकांच्या सहकाऱ्यांने सांघिक यश मिळवण्याकडे ही या वर्गाचा उत्साह नसतो. तेव्हा आपण स्वतःला व त्या माध्यमातून देशाला खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर बनवायचे असेल तर आपण कम्फर्ट झोनच्या बाहेर पडून आलेल्या संकटांचा सामना करत यश मिळवणे गरजेचे असते. - प्रशांत पुंडलिक शिरुडे