वीर नारायण मंदिराची आणखी काही वैशिष्ट्ये
बाह्य प्रवेशद्वार..
मंदिराचा सर्वात बाहेरचा दरवाजा होयसाळ वास्तुकलेचे अनोखं प्रदर्शन आहे आणि प्रत्यक्षात कर्नाटक आणि केरळच्या किनारपट्टीवरील तुलुनाडू प्रदेशातील तिरकस छताच्या रचनेसारखा आहे. मंदिराचे प्रवेशद्वार भव्य आहे आणि प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दोन कोरीव हत्ती आहेत. या दरवाज्यातून प्रवेश करून प्रत्यक्ष मंदिराच्या प्रवेशद्वारावर आल्यावर वर वर्णन केलेल्या दोन पाश्वार्ीय देवस्थानांच्या विमानांनी अभ्यागतांचे स्वागत केले जाते.
महामंडपाच्या प्रवेशद्वारावर दोन हत्ती आहेत. पुजारी असा दावा करतात की हत्ती प्रत्यक्षात इंद्राचे दैवी वाहन ऐरावताचे रूप आहेत, कारण त्यांना दुभंगलेली शिंगे आहेत. ते ऐरावत रथ पुढे नेत आहेत. सात चक्रांशी संबंधित सात दरवाजे आहेत. मंदिराची सुरुवात गरुडस्तंभापासून होते, जी बाहेरच्या दरवाजाच्या आत आहे.
मंदिरातील सजावट...
मंदिराचा आतील भागही तितकाच नयनरम्य आहे. छत विविध आकृतिबंधांनी सजवलेले आहे, त्यापैकी सर्वात सामान्य म्हणजे छताला लटकलेले वरचे कमळ. भुवनेश्वरी किंवा बंद मंडपात, अष्टदिकापालांसह विष्णूचे दशावतार देखील चित्रित केले आहेत. यात अष्टदिक्पाल, सर्व दिशांचे पालक देवता देखील आहेत. सभा मंडपममधील मुख्य शिल्पे किंवा लहान खुल्या मंडपम मधील शिल्पेही रेखीव आहेत.
अष्टदिकपालस होयसला मोटिफ, होयसला राजा सिंहाला मारतो, समुद्र मंथन अशी अनेक दिलखेचक शिल्प आपलं मन मोहवून टाकतात.
बाकी मंदिरातही अनेक सुंदर शिल्पे आहेत. काही महत्त्वाची शिल्प म्हणजे कोदंड रामा, दशावतार चतुर्विमशती विष्णु, कालिया मर्दन, गोवर्धन चमारा, सखी, द्वारपालक याली - हत्ती, सिंह, डुक्कर, मोर हमसा फुलांचा आकृतिबंध, अंजनेया, गरूड, भोगा नरसिंह (उभे) ध्यान मुद्रा कृष्ण, नाट्यविष्णू, दर्पण सुंदरी मदनिकास हमसा आणि अशी अनेक एकाहून एक सरस....
असं हे आगळेवेगळे वीर नारायण मंदिर होयसाळ शिल्पशैलीचा विलोभनीय आविष्कार... -सौ.संध्या यादवाडकर