मैत्रीचं नातं हे फार वेगळंच!

  प्रेम आपुलकी आस्था यांचं संम्मिलन म्हणजे स्नेहसंमेलन. त्याप्रमाणे स्नेहसंमेलनात आम्ही सर्व पुन्हा मैत्रीणी भेटलो.कर्जत ते बदलापूरपर्यंत एकत्रित बरीच वर्षे आमच्या ग्रुपने मजेत प्रवास केला आहे. प्रवासात येणाऱ्या अडीअडचणी एकत्रित सामोरे गेलेलो आहोत.  भुता परस्परे जडो मैत्र जीवांचे..। आम्ही अशा एकाच गाडीने रेल्वे प्रवास करणाऱ्या मैत्रीणी फार वर्षांनी स्नेह संमेलनानिमित्र भेटल्यामुळे खुप आनंद झाला व समाधान वाटले व एक वेगळी उर्जा मिळाली.

कर्जत ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत नोकरी करीता प्रवास करणाऱ्या साधारण २० ते २५ वर्षे पर्यंत १८-१९ महीलांचा ग्रुप होता. प्रत्येक जण आपापले स्थानक आले की उतरुन जायच्या. पुन्हा संध्याकाळी कार्यालय सुटले की परतीचा प्रवास असायचा.

      मंत्रालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महानगरपालिका, एम.एस.ई.बी.बँक, शिक्षीका, कोर्ट, ऑर्डनन्स फॅक्टरी, सेल टॅक्स अशा विविध ठिकाणी नोकरी करणाऱ्या महिलांचा ग्रुप तयार झाला होता. प्रवासात आम्ही सर्व सण उत्सव साजरे करायचो उदा. गुढीपाडवा व दसरा आला की आदल्या दिवशी आम्ही ट्रेनमध्ये ज्या ठिकाणी बसायचो तो परिसर हार फुले व पताकांनी सुशोभित करायचो, तसेच नवरात्रोत्सवात नऊ दिवस सुट्टीचे दिवस वगळून भोंडला व भोंडल्याची गाणी म्हणायचो. अशा प्रकारे नोकरीच्या प्रवासात आपल्या संस्कृतीच जतन केले.

     तसेच प्रवासात आम्ही परमार्थासाठी देखील वेळ दिला, त्यात सकाळी मारुती स्तोत्र, रामरक्षा, घोरकष्टोधारण स्तोत्र, भजन, भक्तीगीते म्हणायचो, कर्जत ते बदलापूर पर्यंत आमचा परमार्थ चालायचा. अशा प्रकारे आमच्या ग्रुपने मजेत प्रवास केला आहे. प्रवासात येणाऱ्या अडीअडचणी एकत्रित सामोरे गेलेलो आहेत.  सदर ग्रुप मधील ब-याच महीला आता वयोमानपरत्वे सेवानिवृत्त झालेल्या आहेत, त्यामुळे भेटी गाठी होणे बंद झाले आहे. फक्त मोबाईलवर बोलण होतं; पण प्रत्यक्षात भेट होत नाही. आता तांत्रिक युग आहे. what's app वर शाळेचा ग्रुप, कॉलेजचा ग्रुप, कार्यालयाचा ग्रुप  विविध ग्रुप पहावयास मिळतात. त्यामुळे आम्ही सर्व मैत्रीणीनी एक गाडीच्या मैत्रीणीचा ग्रुप करायचे ठरविले व रथसप्तमी च्या शुभ मुहूर्तावर दि ४ फेब्रुवारी २०२५ रोजी आमचा गाडीच्या मैत्रीणींचा ग्रुप एक what's app  ग्रुप तयार झाला आहे.

     ग्रुप तयार झाल्यावर what's app वरच भेटायचं चॅटींग करायचे का? आपण प्रत्यक्ष भेटण्यासाठी एक दिवसीय स्नेहसंमेलन करु या असं सर्वानुमते ठरले. त्यानुसार दि १९ फेब्रुवारी २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९९ व्या जयंतीच्या दिवशी आमच स्नेहसंमेलन आयुष फार्म, मोठे वेणगांव ता. कर्जत येथे आयोजित केले.

    प्रेम आपुलकी आस्था यांचं संम्मिलन म्हणजे स्नेहसंमेलन. त्याप्रमाणे स्नेहसंमेलनात आम्ही सर्व मैत्रीणी भेटलो, आमच्या ग्रुप मध्ये आमच्यापेक्षा वयाने खूप मोठ्या असलेल्या व एका मैत्रिणीला पर्यावरण संतुलन संदर्भात दिल्ली संसदभवनात मा. मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या हस्ते गौरविण्यात आले होते. अशा तीन मैत्रीणींना शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार केला व उर्वरीत सर्व मैत्रीणींचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले त्या सत्कार मुर्ती होत्या.. श्रीमती कण्हेरीकर (शिक्षीका वय वर्षे ८५)  श्रीमती कोतवाल (शिक्षीका वय वर्षे ८३) ३) व सौ.सुचीता वांजळे पाटील ( शिक्षीका वय वर्षे ६६).

स्नेहसंमेलनात सौ. शोभा देशपांडे पुणे येथून, सौ. योजना पाटील कल्याण येथून, सौ. सिमा गायकर, सौ.आशा गडकरी, सौ. अपर्णा गानु सर्व कर्जत येथुन स्नेहसंमेलनास उपस्थित राहील्या होत्या.

        सत्कार व स्वागत झाल्यानंतर आम्ही मैत्रिणींनी खुप गप्पा मारत हीतगुज साधलं, जुन्या आठवणी जाग्या झाल्या. एकत्र भोजन केले. मौज-मजा, मस्ती, गाणी, जोक्स वैगरे बरेच खेळ खेळलो. मैत्रीचं नातं हे फार वेगळं असतं. ज्ञानदेवांच्या पसायदानात आहे... । भुता परस्परे जडो मैत्र जीवांचे..। फार वर्षांनी एकत्र आल्यामुळे खुप आनंद झाला व समाधान वाटले व एक वेगळी उर्जा मिळाली. चहा, बिस्किटे घेऊन स्नेहसंमेलनाची सांगता केली. - योजना पाटील 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

कोणत्या अँगलने पाहता?