कळी उमलता उमलता
गुपचूपपणे अनेक मुलींचे लग्न अल्पवयामध्येच केले जाण्याचे प्रमाण आजही भारताच्या प्रत्येक राज्याच्या ग्रामीण भागामध्ये होतात. जास्त अपत्य़े, आईवडिलांचे दारिद्रय ही मुख्य कारणे या लग्नामागे असतात. तसेच तरूण मुलींना जास्त दिवस सांभाळावे लागू नये म्हणूनही तिचे लग्न करून दिले जाते. हे लग्न आजही कोणीही अडवू शकत नाही किंवा कोणी समाजसेवक या लग्नामध्ये अडसर ठरत नाही. कधीच अल्पवयीन आहे म्हणून लग्न लांबविल्याचे ऐकलेले नाही.
बालविवाह कायदा अस्तित्वात येऊनही समाजात बालविवाहाचे प्रमाण पूर्णतः बंद झाले नाही. आजही ग्रामीण भागामध्ये बालविवाहाचे प्रमाण खूप आहे. भारताला ज्या प्रमाणे सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे़ त्याचप्रमाणे काही जुन्या अनिष्ट प्रथाही आपली पाठ सोडायला तयार नाहीत.
प्रवास करताना मला आलेला अनुभव फार बोलका आहे हा प्रसंग जरी कमी संवादाचा असला तरी तुम्हा-आम्हाला समाजाला राज्यकत्यार्ंंना विचार करायला लावणारा आहे. मी माझ्या गावाहून म्हणजे वारोळा-माजलगाव़ जि- बीड येथून ९ जून रोजी माजलगाव ते मुंबई या एस.टी.बसमधून प्रवास करतांना आलेला अनुभव येथे विषद करीत आहे. मी वारोळा फाटयावरून मुंबइला निघालो होतो. अचानक गावी आल्यामुळे मी आरक्षण न करताच परतीचा प्रवास करणार होतो़ एस.टी.आली आणि मी आत शिरलो. गर्दी खूप असल्यामुळे मला बसण्यासाठी गेवराईपर्यंत वाट पाहावी लागणार होती. गाडी जेव्हा गेवराई जि. बीड या एस.टी. बस स्थानकात उभी राहिली; तेव्हा बसमधील काही प्रवासी उतरले व काही आत पुढील प्रवासासाठी चढले. गर्दीचा हंगाम असल्यामुळे मला वारोळा ते गेवराई हे ४० किमीचे अंतर उभ्यानेच काटावे लागल्यामुळे मी गेवराईमध्ये रिकाम्या झालेल्या सिटवर बसलो. काही क्षणातच माझ्या शेजारीच रिकाम्या सिटवर अकरा-बारा वर्ष वयाची एक चुणचुणीत गोड मुलगी येऊन बसली. थोडी थकलेली व भुकेलेली असल्यामुळे सोबत आणलेले खारे फुटाणे एक एक तोडांत टाकत पाय हालवित स्वतःमध्ये तल्लीन होवून खात होती. या मुलीकडे बघून मला फार प्रसन्न वाटले. किती निरागस असते हे बाळपण असे मनोमन वाटून गेले.
एस.टी.बस स्थानकातून बाहेल पडली आणि मुंबईच्या दिशेने वेगाने धावायला लागली. मी सहज चौकशी करावी म्हणून त्या मुलीकडे पाहिले व कोठे जायचे ते विचारले. तिने भोवगावला उतरून पुढे कोठे तरी जाण्याचे सांगितले. मुळात शिक्षक असल्यामुळे मी तिला या वषार्ी कोणत्या इयत्तेमध्ये गेली म्हणून विचारले़ तेव्हा तिने चौथी पास होऊन पाचवीच्या वर्गात गेल्याचे सांगितले. एवढेच सांगून न थांबता तिने दोन वर्षेेे शिक्षण बुडाल्याचे सांगितले. मी तिला परत प्रतिप्रश्न केला की़ तुझे शिक्षण कशामुळे बुडाले? तेव्हा तिने दिलेले उत्तर खरोखर फार बोलके होते. तीने मोठया बाहिणीच्या बाळाला सांभाळण्यासाठी दोन वर्ष शाळा बुडविली होती. म्हणजे तिच्या शिक्षणाला पालकांनी एकदम दुय्यम दर्जा दिल्याचे कळले. त्यावेळेला मीही भूतकाळात डोकावून पाहू लागलो. आपल्या पाठच्या बहिणीचे शिक्षण न होण्यालाही हेच तर कारण होते. मी शिकलो; परंतू पाठची बहिण शाळेची पायरीही चढली नाही. झालेल्या चुका दुरूस्त करता येत नाहीत अशी मनाची समजूत घालत मी भानावर आलो. मनाला धीर देत परत त्या मुलीला समजावून सांगण्याच्या सुरात तिला पर्ुसजये शिकण्याचा सल्ला दिला. चांगली दहावी-बारावीपर्यंत शिक्षण घे असे तिला म्हटले तेव्हा तिनेमी पुढचे शिक्षण घेणार नाही असे सांगितले. यावर मी तिला प्रतिप्रश्न केला का? तेव्हा तिने मात्र आइर्चे नाव न घेता सासूचे नाव घेत म्हटले की मला सासू पुढचे शिकू नको म्हणाली. ‘सासू'या तिच्या शब्दानेच मी खूप अस्वस्थ झालो. कारण एवढा वेळ मी ज्या निरागस मूलीसोबत बोलत होतो ती विवाहीत आहे हे मी मानायलाच तयार नव्हतो. खरोखर त्या क्षणी माझा कंठ दाटून आला. पुढचे मी तिच्याशी काहीही बोलू शकलो नाही; परंतू शेेवटी आणखी एक प्रश्न मनामध्ये सतत घोळू लागल्यामुळे मी मन मोकळे करण्याच्या उद्देशाने तिला प्रश्न विचारला की़ तू कुठे जात आहेस म्हणजे तुझ्या सासरी की आई-वडिलांकडे माहेरी? तेव्हा तिने सासरी म्हणजे सासूसोबत नवऱ्याच्या गावी जात असल्याचे सांगितले. तेव्हा मला आश्चर्य वाटले की हे सांगतांनापण ती खूष वाटत होती.
तु तुझ्या सासूसोबत सासरी जाताना खूष दिसतेस? हया प्रश्नावर मात्र तिने मला नकारार्थी उत्तर दिले. या तिच्या नकाराच्या उत्तराने मी समजून गेलो की़ हे तिचे लग्न आर्ईं-वडिलांनी फक्त जबाबदारीतून मुक्त होण्याच्या उद्देशाने केलेले होते. तिच्या वयाचा़, मनाचा येथे कोठेही विचार केलेला मला दिसत नव्हता. यासारखे गुपचूपपणे अनेक मुलींचे लग्न अल्पवयामध्येच केले जाण्याचे प्रमाण आजही भारताच्या प्रत्येक राज्याच्या ग्रामीण भागामध्ये होतात. जास्त अपत्य़े, आईवडिलांचे दारिद्रय ही मुख्य कारणे या लग्नामागे असतात. तसेच तरूण मुलींना जास्त दिवस सांभाळावे लागू नये म्हणूनही तिचे लग्न करून दिले जाते. हे लग्न आजही कोणीही अडवू शकत नाही किंवा कोणी समाजसेवक या लग्नामध्ये अडसर ठरत नाही. कधीच अल्पवयीन आहे म्हणून लग्न लांबविल्याचे ऐकलेले नाही. शासनाचे नियम पाळले जातात ते फक्त सुशिक्षित समाजात किंवा शिक्षण घेॉतलेल्या मुलींच्या बाबतीत ग्रामिण भागात एकच पाहिले जाते ते म्हणजे मुलीचा मासिक धर्म आणि त्यावरून तिचे लग्नाचे वय ठरविले जाते म्हणजेच हे वय तेरा ते पंधराच्या आसपास असते हे वास्तव आपण टाळू शकत नाही.
जोपर्यंत शिक्षणाचे प्रमाण वाढत नाही़, द्रारिदय कमी होत नाही तोपर्यंत आपण या घटना थांबवू शकणार नाही. आज सामाजिक संस्था काम करतात त्या शहरामध्ये! कारण शवटी संस्था चालविण्यासाठीही फंड उभारावा लागतो. तो फंड ग्रामिण भागात काम करून थोडाच उभा राहणार आहे? त्यामुळे अशी लग्नं होत राहतील त्यामुळे कमी वयातील बाळंतपण, कुपोषण हे चक्र कोणी बदलू भाकणार नाही. लोकसंख्या वृध्दीवर नियंत्रण तसेच रोजगारांच्या संधी वाढल्या तरच राहणीमानाचा दर्जा सुधारेल आणि शिक्षणाचे प्रमाण वाढेल व मग प्रत्येक मुलगी अठराव्या किंवा अठरा वर्षानंतरच बोहल्यावर चढण्याची शक्यता वाढेल. हे संगणकीय युगातही काही कळ्या उमलण्याअगोदरच कुस्करल्या जात आहेत. काय असेल अशा मुलींचे भविष्य या विचाराने मी केव्हा झोपी गेलो हे कळलेच नाही. - प्रा. डॉ. श्रीकृष्ण तुपारे