टेढा हैं पर मेरा है
जगातल्या चांगल्या चविष्ट गोष्टी, या वेड्यावाकडे असतात. उदाहरणार्थ तिखट झणझणीत चकली, दुसरं गोड रसमय जिलेबी, तिसरं तर शेवया, नूडल्स. फळांमध्ये पण काय वाकडी फळ कमी नसतात. तोंड वाकडं असलेला तोतापुरी, चोच आलेला आंबा, केळ आठवा. शेवयांचा हारा, शेव, कुरडई, कलकलं आवडतात. वाकडे पदार्थ आपल्याला आवडतात ना, त्यामुळे आपण यापुढे लक्षात ठेवायचं टेढा हैं पर मेरा है.
एका जाहिरातीत, एक प्रसिद्ध हिंदी नटी, "टेढा हैं पर मेरा हैं" म्हणून एका स्नॅक ची जाहिरात करते.
वाकडी लोक पण आपली असली की गॉड म्हणून ठीक मानून घ्यावी लागतात. आपला तो बाब्या दुसऱ्याचा तो कार्टा असा भेदभाव माणूस करत असतो. तरी राग आल्यावर आपण आपल्या माणसावरपण चिडतो. भांडण वाद करतो. हो ना माझ्या नशिबी आला असं देखील म्हणतो. बाकीच्यांची कुटुंब बघा कसं सुरळीत असतं आणि आमच्याकडे बघा असं इतरांशी तुलना करत नेहमी म्हटलं जातं.
टेढापण, कटुता, सोसणे, ते वाक्य नातेसंबंधांमध्येपण असतात. आपले परिचित ओळखीचे मित्र सहचर टेढे असले तरी सांभाळून घ्यावे लागतात. तोडायला काय एक मिनिट लागतो, वर्षानुवर्षाचा संबंध, नाती, एका शब्दाने, एका वाक्याने, एखाद्या अनुल्लेखाने, एखाद्या कारणाने सहज तुटतात. तोडायला एक मिनिट पुरतो. पण अशा कटू क्षणी वाद न घालता पडता घेतलं, तर ते नातं वरवर तरी, औपचारिक तरी चालू राहू शकतं. कारण तुटलं तर आपले नुकसान होऊ शकतं. शिवाय ज्या लोकांना आपण तोडतो, ते आपली बदनामी करत, आपल्याबद्दल वाईट सांगत जातात. बद दुवा देतात.
इंग्रजीत क्रुकेड फेलो शब्दावरून, टेढे शब्द आला असावा. टेढे त्रास देतात हे मी जाणते. हे जाणते की सांगणं सोपं आहे. प्रत्यक्षात संताप आला की माणसाचं नातं तुटत असतं. चार जण जमले की दोन जण उरलेल्या दोन जणांबद्दल भलतं भारंभार बोलतात. तिखट मीठ मसाला लावून तिसऱ्याच्या नावाने इकडे तिकडे फिरवत जातात. वाद होतात. कधी एखादा छोटासा शब्द खटकतो. असं म्हणतात बहात्तर हजार नाड्यांपैकी, एक नाडी माणसाची अशी असते, जी अतिशय दुखरी असते. ती दुखती नाडी शोधून टोमणे हाणणारे लोक असतात. ती दुखरी नाडी कधी उघड असते. पण कधी छुपी असू शकते. कुणीतरी जाणत्या आणि आपल्या जवळच्याच व्यक्तीने ती दुखरी नाडीची बात, बाहेर सांगितली असावी, असं वाटून, भलतंच नातं तुटत असतं.
मग राग येतो, असं वाटतं या व्यक्तीचं तोंड बघू नये. पण लक्षात ठेवा, "दोष तर आपल्यात सुद्धा असतात.”
नुसता चहा कॉफी दूध नको. बुडवायला काहीतरी हवं. बिस्किट, टोस्ट, ब्रेड, शंकरपाळी, खारी, कडकडे, नाहीतर चपाती हवी. असा वाद मी घालायचे. आईने ते सामान नेहमीच आणून ठेवायचे हे ठरलेलं असे. जर नसलं तर मी आणायला हरकत नव्हती, पण त्या वयात मैत्रिणींचा ओढा असतो. काही काम करायला मी कुरकुर केली की आईला वाईट वाटे. पण आई नेहमी म्हणायची, "गुणांसह दोषासह तू माझी आहेस. माझ्यावर रागाव, मी हक्काची आहे ऐकून घेईल. पण तू बाहेर गेल्यावर न मागता शांत वाग.ठ
दोन-तीन वाक्यं आणि नेहमी लक्षात ठेवायला सांगितली एक तर कोणालाही तोडू नये. तोडायला एक मिनिट पुरतेे दुसरं तर अडला नारायण गाढवाचे पाय धरी. आणि तिसरं होणारे न चुके जरी येई ब्रह्मा तया आडवा.
इतनाही उपकार समज कोई जितना साथ निभाये कोई न संगम अरे.
या चार वाक्यांमध्ये मी आता हे पाच व ॲड केलं ते आहे पर मेरा है.
टेढा है वाले अधिक टेढे झाले तर नाते तूटते. सकारात्मक म्हणून, वरचे वाक्य असले तरी सोसेना झाल्यावर, दुर होणे पण बरे! चालू शकते. स्वतःची अपत्ये त्रास देतात, नवरा मनाविरुद्ध वागतो, सासरची माणसं काहीतरी बोलतात, परिचित बोलतात, शेजारी वाद होतात, मोलकरणी त्रास देतात. समाजात बऱ्याचदा टीका होते. वयोमानाने ऊर्जा कमी होते. मित्र-मैत्रिणींमध्येसुद्धा काही कारणाने आपण एखाद्या वेळी जाऊ शकत नाही. रोज राग धरून त्या व्यक्तीसुद्धा दुखावल्या जातात.
जगातल्या चांगल्या चविष्ट गोष्टी, या वेड्यावाकडे असतात. उदाहरणार्थ तिखट झणझणीत चकली, दुसरं गोड रसमय जिलेबी, तिसरं तर शेवया, नूडल्स. फळांमध्ये पण काय वाकडी फळ कमी नसतात. तोंड वाकडं असलेला तोतापुरी, चोच आलेला आंबा, केळ आठवा. शेवयांचा हारा, शेव, कुरडई, कलकलं आवडतात. वाकडे पदार्थ आपल्याला आवडतात ना, त्यामुळे आपण यापुढे लक्षात ठेवायचं टेढा हैं पर मेरा है.
वाचकहो लक्षात ठेवा, लेखिकेचा विचार, टेढा हैं पर मेरा है.
- शुभांगी पासेबंद