केश कर्तनालय ते पार्लर

घरोघरी दूरदर्शन पोहोचल्यानंतर पुरूषांच्याही केशरचनेत नव्या आणि सातत्यपूर्ण बदलांना सुरूवात झाली. ग्रामीण भागातील तरूणांची आर्थिक परिस्थिती सुधारत असताना केसांवरती खर्च होऊ लागला. या तरूणाईला अंगणात किंवा साध्या लाकडी खुर्चीवर केस कापणे कमीपणाचे वाटू लागले. अशातच मोठे मोठे आरसे असलेले, काचांचे दरवाजे असलेले ‘हेअर कटिंग सलून' गावात दाखल झाले. ‘जेन्टस्‌पार्लर', ‘हेअर ड्रेसर', ‘मेन्स सलून' पासून ते ‘केशकर्तनालय' अशा विविध नावांखाली, चकचकीत काचांआड केस कापले जातात.

  ‘सीजर पार्लर'! थोडं गंमतीदार नाव. अलिकडच्या काळात अशा पाट्या आणि त्याखालील गाळ्यांकडे थोडं कुतूहलाने पाहील्यास आणखी नवे प्रकार दिसू लागतात. ‘जेन्टस्‌पार्लर', ‘हेअर ड्रेसर', ‘मेन्स सलून' पासून ते ‘केशकर्तनालय' अशा विविध नावांखाली, चकचकीत काचांआड केस कापले जातात. झाडाखाली मोडक्या लाकडी खुर्चीत तुटपुंज्या साहित्यासह मांडलेल्या लहानशा दुकानापासून ते तारांकीत इमारतीच्या सुखयोयीयुक्त स्पा पर्यंतचे वैविध्य या केशकर्तनाच्या व्यवसायात आहे. पुरूषांच्या दुनियेला शहरीकरणामुळे प्राप्त झालेला हा झगमगाट गावांपर्यंतही कधीचाच पोहोचलाय. सध्याच्या काळी हा व्यवसाय स्थिर जागेवर असला तरी याच परिसरात एकेकाळी हा व्यवसाय फिरता असायचा.

      पूर्वीच्या काळात, ग्रामीण भागात राहीलेल्यांच्या केस कापण्याविषयक अनेक आठवणी असतील. घरातील लहानग्यांना ‘मोठे मानल्या जाणाऱ्या सर्वच व्यक्तींची आज्ञा पाळणे परम कर्तव्य असायचे. केस कापण्यासारख्या वैयक्तिक बाबीतही वडीलधारी मंडळी सांगतील तोच आदेश पाळणे बंधनकारक होते. या आदेशान्वये फिरता व्यवसाय असणाऱ्या एखाद्या कर्तनकारांची निवड व्हायची. आसपासच्या गावांतून येणारे हे केशकर्तनकार आपले दुकान एका तंगूसच्या पिशवीत बसवू शकायचे. कधी कधी तर एखादी टोक मोडलेली कात्री, काही दात शाबूत असलेला कंगवा, वाटी, वस्तरा आणि अर्धी मुठ नसलेला दाढी करण्याचा ब्रश अशा अर्ध्यामुर्ध्या आयुधांसह काम चालू शकायचे.

 बऱ्याचदा हे कर्तनकार गावात आले की निसर्गनियमाने घरातील सर्वांचे केस एकाच वेळेस कापण्यालायक व्हायचे. अंगणात एका पायरीला टेकून पथारी पसरून हा ‘सीजर पार्लर सुरू व्हायचा. त्यांचे ग्राहक केस कापण्याच्या पूर्वतयारीने म्हणजे उघड्या अंगाने त्याच्या समोर जाऊन बसायचे. जबरदस्तीने माना वळवत, कधी प्रेमाने तर कधी अंगावर खेकसत ते आपली हत्यारे चालवायचे. काही वेळेस त्यांच्या लढाईच्या खुणा ग्राहकांच्या मानेवर, कानाच्या वरच्या भागात उमटायच्या. या सर्व व्यवसायिकांची घरातल्यांशी चांगली ओळख असल्याने आपले काम करता करता त्यांचं बोलणेही चालू असायचे. त्यांचं हे मार्मिक बोलणं ऐकून ते ‘कर्तनकार' कमी आणि ‘किर्तनकार'च जास्त वाटायचे. ज्या कर्तनकाराचे स्वतःचे स्थिर दुकान होते, तिथेही थोड्याफार फरकाने असाच प्रकार व्हायचा. या कौशल्यपूर्ण कामातून मिळणारा मोबदला मात्र तितकासा चांगला नव्हता. ओळखीपाळखीचे ग्राहक असल्याने ‘एकूण ग्राहक गुणीले केस कापण्याचा दर' अशी पुस्तकातील मांडणी नसायची. ग्राहकांकडून हातात हक्काच्या कामाचे पैसे टेकवताना मानधनाला कात्री लावली जायची. या कारणांमुळे या व्यावसायिकांचे कात्रीचे तुटलेले टोक तसेच राहीले.

        घरोघरी दूरदर्शन पोहोचल्यानंतर पुरूषांच्याही केशरचनेत नव्या आणि सातत्यपूर्ण बदलांना सुरूवात झाली. ग्रामीण भागातील तरूणांची आर्थिक परिस्थिती सुधारत असताना केसांवरती खर्च होऊ लागला. या तरूणाईला अंगणात किंवा साध्या लाकडी खुर्चीवर केस कापणे कमीपणाचे वाटू लागले. अशातच मोठे मोठे आरसे असलेले, काचांचे दरवाजे असलेले ‘हेअर कटिंग सलून' गावात दाखल झाले. या नव्या बदलांशी जुळवू न शकलेले कर्तनकार आपल्या जुन्या साहित्यासह जुन्याच ग्राहकांपुरतेच मय्राादित राहीले. आता तर या केस कर्तनालयाचे रुपांतर ‘पारिलर' मध्येच झाले आहे. त्यातही परप्रांतीय कर्तनकारांचाच वरचष्मा पहायला मिळतो. अतिशय सामान्य वाटणाऱ्या पण आपल्या दर्शनी व्यक्तीमत्वावर परिणाम करणाऱ्या केस कापण्यासारख्या व्यवसायातला हा चकचकीत बदल. ज्या जुन्या पिढीने हा व्यवसाय पाहीलाय त्यांच्या डोक्यावरील केसांप्रमाणेच या व्यवसायाचे जुने रुप विरळ झाले आहे.. - तुषार म्हात्रे 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

प्रकाशक