पुस्तक परिक्षण
आयुष्यमान दयानंद सिरसाठे साहित्यिक क्षेत्रातील नावाजलेले लेखक, कवी, कथाकार, इतिहास संशोधक म्हणून परिचित आहेत. त्यांच्या इतिहास संशोधनपर लेखमालिकेतील संशोधन लेखांचा संग्रह म्हणजे नवीन पुस्तक बुद्धदर्शन भाग १. सर इतिहास संशोधनाची वाट खूप वर्षापासून चालत असून लातूर, धाराशिव, नांदेड, हिंगोली, परभणी असा सर्व मराठवाडा पिंजून लेण्या, बुद्ध मूर्ती विहार मंदिरे यांचा सखोल अभ्यास करून त्यांनी इतिहास संशोधनात भर घातली आहे.
इतिहास हा भूतकाळाचा जरी मागोवा घेत असला तरी वर्तमानाशी त्याच नाते कधी ही संपत नाही. प्राचीन काळापासून हा देश बुध्दांचा देश म्हणून ओळखला जातो. मौर्य कालखंड हा बुद्ध धर्मिय कालखंड होता. तथागत बुद्धांनी बौध्द धम्माची स्थापना केली होती त्यानंतर कित्येक राजे यांनी त्यांच्या विचारांना केंद्र मानून बौद्ध धम्म स्वीकारला. लेखक दयानंद सिरसाठे सर उकृष्ट स्तूप मंदिर मूर्ति स्थापत्य लेण्या यांचे अभ्यासक असून प्रत्यक्ष स्थळांना भेट देऊन त्यांनी योग्य अशा संदर्भासह बुद्धदर्शन हे पुस्तक लिहिले आहे. यांत एकूण ५१ लेख असून फारच सुंदर भाषा लालित्याने हे पुस्तक सजले आहे. लेखक दयानंद सिरसाठे यांनी पुढील विचार यात मांडले आहेत.
१) परळीचा प्राचीन बौध्द विहार : या संशोधनपर लेखात परळी वैजनाथ जि. बीड या तालुक्याची १९९२ मध्ये निमित्ती झाली. हा सगळा परिसर हा डोंगराळ असून उरलेला भाग गोदावरी नदी परिसर आहे. परळी शहर महत्वाचे धार्मिक क्षेत्र आहे. बारा ज्योतिलिंगापैकी ते आहे. आज जरी परळी वैद्यनाथाचे मंदिर हे महादेवाचे जरी असले तरी एका काळी ते बौध्दविहार होते याची साक्ष मंदिराच्या शिखरावरील बुद्धमूर्त्या देतात. या शहरावर चालुक्य राजांचे राज्य होते.
२ ) बौध्द धम्माचा इतिहास : या संशोधन लेखात बौध्द धम्माअगोदर वैदिक धर्म होता काय? बरेच इतिहासकार असे मान्य करतात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात वैदिक ऋषीचा उल्लेख केला आहे. बुद्धाचे उपदेश त्रिपिटकात पाली भाषेत आहेत. त्या काळात चार बौध्द धम्म परिषदा भरल्या होत्या भिक्षूंनी त्रिपिटक कंठस्थ केले. विद्यापीठ व लेण्यां यांचे अवशेष पहावचास मिळतात.
३ ) तक्षशिला बुध्द विद्यापीठ : तक्षशिला ही गांधार देशाची राजधानी ख्रिस्तपूर्व शतकातील शिक्षणाचे महान केंद्र होते उत्तपथचे ते एक प्रसिद्ध व समृद्ध नगर होते. तक्षशिला हे नगरावरून या केंद्रांस तक्षशिला नाव पडले. नागवंशियांची राजधानी होती तक्षशिला निवासी विद्यापीठ होते.
४ ) तेरच्या प्राचीन बुद्धमूर्ति : तेर मराठवाड्यातील धाराशिवपासून १८ किमी अंतरावर असून तेरणा नदीच्या दक्षिण काठावर आहे. तेरमध्ये महत्वाचे म्हणजे रामलिंग अप्पा लामतुरे वस्तूसंग्रहालय असून स्थापना १९६५ ला झाली होती तेरचा व्यापार इटालीतील रोम शहरांशी होत असे. कारण येथील वस्तूसारख्यांच वस्तू तेथल्या वस्तूसंग्रहालयात मिळाल्या. दयानंद सिरसाठे फिरस्ती असून ते प्रत्यक्ष फिरून लेखन करण्याचा त्यांचा स्वभाव आहे. लेखक म्हणून त्यांनी फार सुरेख पुस्तकात भाषा रेखीव वर्णनात्मक ठेवलेली दिसून येते.
५ ) कान्हेरी व सोपारा येथील बुद्ध मूर्ती : प्रामुख्याने कोकणात वज्रयान १० व्या १२ व्या शतकात प्रचलित होता याचा पुरावा मिळाला आहे मुंबई जवळ देवणार येथे एक अवलोकीतेश्वरांची मूर्ती मिळाली. एका शतकापूर्वी डॉ भगवानलाल इंद्रजी - यांनी सोपाऱ्याजवळ एका स्तूपाचे उत्खनन केले. त्यात त्यांना आठ लहान कांस्य मूर्ती सापडल्या आहेत.
६ ) बुद्ध लेणी : महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बुद्धलेण्या आढळून येतात. लातूरहून २२ किमी अंतरावर औसा तालुक्यातील हासेगाववाडी ही टेंभी ५०० फुट उंच आहे सुंदर रमणीय डोंगरात वसली आहे. फणीधारी दक्षिणमुखी असलेली नाग लेणी पर्यटकांचे लक्ष वेधून घेते. लेण्या या प्रत्यक्षात संशोधनाचा फार मोठा भाग आहेत किमान १०० फूट आत लांब आकाराची ही लेणी आहे. संशोधक इतिहास प्रेमींना साद या लेण्या घालतात.
७ ) बौद्ध धम्मप्रसाराची कारणे : या लेखांत बौध्द धर्म कुण्या कारणामुळे जगभर विस्तारला त्याबद्दलचे वर्णन आहे. १ ) आदर्श नेता २ ) साधी शिकवण ३ ) लोकभाषेचा स्वीकार ४ ) समानतेची वागणूक ५) वैदिक धर्माच गहनता ६ ) संघ ७ ) राजाश्रय
८ ) परिस्थितीनुसार बदल : कार्ले भाजे लेणी : या लेखात लेण्यांची माहिती दिली असून सम्राट अशोकाने सर्वप्रथम लेण्यांची निर्मिती केली. लेणी निर्मिती करताना प्रामुख्याने डोंगरावरील दगडाचा विचार केलेला दिसतो. लेणी निर्माण करण्याचा हेतू म्हणजे बौध्द धम्माचा प्रचार प्रसार होय. कार्ले भाजे लेण्या पुण्यापासून काही अंतरावर आहेत कार्ल्याच्या लेण्या आणि एकवीरा देवीचे मंदिर उंच डोंगरावर आहे या लेण्या प्रामुख्याने बौध्दधर्मिय आहेत. तरी आज भारतीय पुरातत्व खात्याचे दुर्लक्ष दिसून येते हा वारसा जोपासण्याची गरज आहे.
१० ) नालंदा विद्यापीठ : नालंदा विद्यापीठ बौध्द धम्माच्या अभ्यासाचे केंद्र होते. इस ८व्या शतकात भारतात आलेल्या इत्सिंग या चीनी प्रवाशाच्या प्रवासवर्णनावरून दिसून येते. नालंदा विद्यापीठ प्राचीन भारतीय शिक्षणाची परंपरा होती. नालंदा विद्यापीठात १०, ००० विद्यार्थी शिकत होते. परदेशी विद्यार्थी नालंदा विद्यापीठात शिकण्याकरिता येत असत. बखत्यार खिलजीच्या काळात या विद्यापीठाचा ऱ्हास झाला. सर्वच बौध्द विहारातील भिक्षूंची कत्तल केली आणि हा वारसा काळाच्या पडद्याआड गेला.
११ ) भोकर येथील बुद्ध मूर्ती : या संशोधन लेखात दयानंद सिरसाठे यांनी भोकर परिसरातील बुद्ध मूर्ती अवशेष धुंडाळलेली असतील भोकर हे शहर नांदेड पासून ४५ किमी अंतरावर डोंगराचा कुशीत वसले आहे. भोकर शहरातील जुन्या बौद्ध वाड्यात एक बुद्धविहार बांधले आहे.
१२ ) प्राचीन बौद्ध साहित्य : १) मिलिंद पन्हो - मिनॅडर २ ) बुद्धघोष : विशुध्दीमग्न ३ ) बुद्धदत्त ः ४ ) आनंद ५ ) धम्मपाल ६ ) उपसेन ७ ) दीपवंश ८) महावंश
१३ ) तथागत बुद्ध : महान मार्गदर्शक : बौध्द धम्माला जीवन देणारे आणि कोट्यवधी दलितांचे तसेच भारतीयांचे प्रेरणास्थान डॉ बाबासाहेब आंबेडकर हे होत. त्यांचे वडिल सुभेदार होते. महामानव बुद्ध हा जगप्रसिध्द आहे. त्यामुळे गौतम बुध्द या पहा अनुभूती घ्या आणि मर्ग माझा धम्म स्वीकारा.
१४ ) जयंती नगरी अंबेजोगाई : दयानंद सिरसाठे सरांचा मूळ पिंड हा इतिहास संशोधकाचा असून आजही ते वेग वेगळ्या ठिकाणी बुद्ध धम्माच्या शिल्प स्थापत्य लेण्यांच्या शोधात भटकतात. जयंती नगरीला - अंबेजोगाई असे प्राचीन नाव होते. सातवाहन कालीन नाणी येथे सापडलेली आहेत, या शहरावर सातवाहनांचे राज्य होते.
१५ ) लातूरची भूमी बुद्ध भूमी : या संशोधन लेखांत दयानंद सिरसाठे व्यक्त होतात दशावतारातील बुद्धमूर्तिला विष्णूचा नववा अवतार म्हटले आहे. १) खरोसा बुद्ध लेणी २) हत्तीबेट लेणी १९ लेण्यां ३ ) हिनयान - हासेगावची लेणी ४ ) कळमगाव लेणी - शिरूर अनंतपाळ - दक्षिणेस
१६ ) स्तूप ,प्रकार महत्व : बुद्धांच्या अस्थीअवशेषांवर जे स्मारक बांधले जाते त्यास स्तूप संबोधतात १ ) राजग्रह स्तूप २) वैशाली ३ ) कपिलवस्तू ४ ) अलाकप्पा ५ ) रामग्रामा स्तूप ६ ) पावा स्तूप ७ ) कुशीनगर स्तूप ८ ) पिप्रहदा स्तूप
अशा पद्धतीने संशोधन लेखसंग्रहाचे बुध्ददर्शन भाग - १ हे अभ्यासकांना उपयुक्त ठरणार आहे. आयुषमान दयानंद सिरसाठे यांना शुभेच्छा देऊन लवकरच त्यांनी बुद्धदर्शन भाग २ छापावे त्यांना पुढील लेखनाकरिता शुभेच्छा देऊन या ठिकाणी मी माझ्या लेखणीस पूर्णाविराम देतो !
बुद्धदर्शन भाग १ लेखक - दयानंद सिरसाठे (सहशिक्षक ) जिल्हा परिषद शाळा आशिव ता औसा जिल्हा लातूर
प्रकाशन : प्रभाकर पब्लिकेशन्स, लातूर प्रथम आवृत्ती : १ जानेवारी २०२५
पृष्ठसंख्या : १६० मुखपृष्ठ : विरभद्र गुळवे किंमत : २५०
शब्दांकन : प्रा पी एस बनसोडे