प्रजासत्ताकाची पंच्याहत्तर वर्षे : एक दृष्टिक्षेप

२६ जानेवारी १९५१ रोजी भारताने प्रथमच प्रजासत्ताक  दिन  साजरा झाला होता. २६ जानेवारी २०२५ रोजी, बरोबर भारताला संविधान स्वीकारले त्याला  ७५ वर्षे पूर्ण झाले. २६ जानेवारी १९४९ लाभारताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निर्माण केलेले भारतीय संविधान स्विकारले. हे संविधान २६ जानेवारी १९५० ला लागू झाले व आपण पहिला प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी १९५१ ला साजरा केला होता. हा ७५ वर्षाचा अमृतमहोत्सवी काळ कमी शब्दात लिहिणे ही कठीण बाब आहे.

 १५ऑगस्ट स्वातंत्र्य दिन व २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन हे दोन दिवस लहान मुलांपासून ते वृद्धापर्यंत लक्षात आहेत. या दोन्ही दिवसाला राष्ट्रीय सणांचा दर्जा आहे. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी १५० वर्षांहून अधिक काळ पाश्चात्य राज्यकर्त्यांनी आपल्या भारतावर राज्य केले. १९ व्या शतकात आपल्या देशभक्तांनी स्वातंत्र्य मिळावे म्हणून शर्थीचे प्रयत्न केले. याचे फळ म्हणजे १५ ऑगस्ट १९४७ साली भारताला स्वातंत्र्य बहाल केले. जेव्हा भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा आपले देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) २७०० बिलियन होते; पण आज आपण यु एस ट्रिलियनमध्ये आहोत. दरडोई उत्पन्न ५०० पटीने वाढले आहे. १९५० मध्ये ते २६५ रुपये होते व आत्ता ते आणि १२८८२९ रूपये पर्यंत वाढले आहे. पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून आपण पुढे पुढे जात राहिलो आहेत. पण पुढे जाण्याच्यागरजेतून उद्योग व्यवसायांमध्ये क्रांती झाली. टाटा, बिर्ला सारखी भारतावर प्रेम करणारी लोक मिळाली. यामुळे उद्योग वाढले. आज सव्रााधिक श्रीमंत लोकांच्या यादीत आपले व्यावसायिक आहेत.

भारतात श्वेतक्रांती मुळे देशाला दुधाची कमतरता असलेल्या राष्ट्रातून दुग्ध उत्पादनात जागतिक आघाडीवर आणण्यात यशस्वी ठरली. या उपक्रमापूर्वी, २०२१ मध्ये २१० दशलक्ष टनांच्या तुलनेत १९५०-५१ मध्ये दुधाचे उत्पादन फक्त १७ मिलियन टन होते, ज्यामुळे भारत दुधाचा सर्वात मोठा उत्पादक बनला आहे. या श्वेत क्रांतीमुळे शेतकर्यांचे उत्पन्नात भर पडली.१९६५ आणि १९६६ सालात भारताने सलग दोन दुष्काळ अनुभवले. अन्न उत्पादन व लोकसंख्यावाढीचा ताळमेळ बसत नव्हता म्हणून आपण हरित क्रांती आणली. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून अन्नधान्य उत्पादनात वाढ केली. आज आपण अन्नधान्य निर्यात करू लागलो आहोत. भारताने निळी क्रांती आणत मासेमारी व्यवसाय वाढवला. १९४७ साली स्वातंत्र्याच्या वेळी, विज निर्मितीक्षमता फक्त १३६२ मेगावॅट होती. आज ती ४ लाख मेगावॅट पर्यंत पोहचवली आहे. आज भारतीय औषधांच्या व्यवसायात भरपूर वाढ झाली आहे. आज जागतिक दृष्टीकोनातून भारत हे जेनेरिक औषधांचा जगातील सर्वात मोठा निर्माता आहे आणि जगातील फार्मसी म्हणून ओळखले जाते. भारतीय फार्मा उद्योग जागतिक जेनेरिक बाजारपेठेत प्रमाणानुसार २० टक्क्यांहून अधिक योगदान देतो आणि लसींच्या जागतिक मागणीच्या६२ टक्के भाग पूर्ण करतो. कोविड-१९ च्या कालावधीने भारतीय औषधी उद्योगाला आर्थिक वाढीचे इंजिन म्हणून अधिक प्रकाशझोत टाकण्यास मदत केली. भारतीय शिक्षणाचा विकास प्रामुख्याने स्वातंत्र्योत्तर काळात अतिशय वेगाने झाला. प्राथमिक शिक्षण सक्तीचे केल्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळात उच्च आणि सर्वसाधारण शिक्षणातही प्रचंड वाढ झाली. भारतातील आय. आय. टी., आय. आय. एम. सारख्या संस्थेद्वारे उच्च शिक्षण दिले जात आहे. सैनिकी शाळांमधून लष्करी अधिकारी बनण्याचे शिक्षण तरूणांना दिले जात आहे. वैद्यकीय क्षेत्रात आपण प्रगती साधली आहे. भारतीयांचे राहाणीमान चांगले वाढले आहे. रेल्वेचे भारतातील जाळे हे जगासमोर आदर्श मानावे असेच आहे.

या नेत्रदीपक प्रगती बरोबरच काही उणिवा आहेत. जसे की, बेरोजगारी वाढत चालली आहे. गरीब हा अतिशय गरीब होत चालला आहे. एकीकडे आपण धर्मनिरपेक्ष देशाचे डांगोरे पिटत आहोत, बुद्धाचा देश म्हणून आपली जगाला ओळख सांगतो आहोत, पण तेतेवढे सत्य नाही. खरे तर, जाती संस्थांना खतपाणी घातले जात आहे. धर्माच्या नावाखाली पुन्हा मनु डोके वर काढू पाहत आहे. अठरा पगड जातीपासून हे स्वातंत्र्य खूप दूर आहे. त्यांची भटकंती थांबलेली नाही. शासन स्तरावर होत असलेला भ्रष्टाचार व त्यातून होत असलेले देशाचे आर्थिक नुकसान ह्या बाबींवर विचारही व्हायला पाहिजे. - डॉ. श्रीकृष्ण दि. तुपारे 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

पुस्तक परिक्षण