बांगला देशात आणखी किती हिंदूंचा बळी जाणार?
बांगला देशातून पळून भारतात आलेल्या शेख हसीना यांच्या सुरक्षेत सरकार कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. त्यांच्या पारपत्राची मुदत संपल्यानंतरही सरकारने त्यांच्या व्हिसाची मुदत वाढवली आहे, दुसरीकडे बांगला देशात प्रतिदिन होणाऱ्या हिंदूंच्या दमनासाठी देशाचे सरकार काहीच पावले उचलताना दिसत नाही. देशाची अंतर्गत सुरक्षा व्यवस्था धोक्यात आणणाऱ्या बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांबाबत सरकार कोणतेही विशेष धोरण आखताना दिसत नाही.
गतवर्षी ५ ऑगस्टला बांगला देशात हसीना शेख यांचे सरकार पडल्यानंतर देशभरात हिंसाचाराची लाट पसरली. सुरुवातीला आपापसांतील वाटणारा हा वाद हळूहळू तेथील हिंदूंच्या दिशेने वळला. स्थानिक हिंदूंना जाणीवपूर्वक लक्ष केले जाऊ लागले, हिंदूंना घरात घुसून मारहाण होऊ लागली, त्यांची घरे, दुकाने लुटून ती जाळण्यात येऊ लागली, त्यांच्या जमिनी हडपण्यात आल्या, त्यांना त्यांच्याच घरातून हाकलले जाऊ लागले. हिंदूंच्या मंदिरांवर हल्ले होऊ लागले, देवतांच्या मूर्तींची तोडफोड होऊ लागली, हिंदू स्त्रियांवर, बालकांवर अत्याचार होऊ लागले. ऑगस्ट महिन्यात देशभरात पसरलेले हे हिंदुविरोधी लोण आजही कायम आहे.
सुदेव हलदर नावाच्या एका २८ वर्षीय तरुणाचा गळा चिरलेला मृतदेह नुकताच बांगला देशातील रामपूर जोरापोल परिसरात आढळून आला. मोबाईलचे दुकान चालवणारा सुदेव रात्री दुकान बंद करून घरी परतत असताना अज्ञातांनी त्याची गळा चिरून हत्या केली. सुदेव याचे कुणाशीच वैर नव्हते. त्यामुळे तो हिंदू असल्यानेच त्याची हत्या झाली असल्याचे म्हटले जात आहे. असे शेकडो सुदेव मागील ५ महिन्यात बांगलादेशमधील हिंसाचाराला बळी पडले आहेत. शेकडो हिंदू माता-भगिनींवर बलात्कार झाले आहेत, हिंदूंची मंदिरे फोडली गेली आहेत. हिंदूंनी आपले घरदार सोडून बांगला देशातून चालते व्हावे यासाठीच हा हिंसाचार चालू आहे. बांगला देशातील हिंदूंची स्थिती अत्यंत दयनीय आहे.
१९४७ साली पूर्व पाकिस्तानमध्ये म्हणजे आताच्या बांगला देशमध्ये एक तृतीयांश हिंदू होते. २०२२ मध्ये जेव्हा देशात जनगणना झाली तेव्हा तेथे ७.९६ टक्के हिंदू शिल्लक राहिल्याची अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. फाळणीनंतर तेथील हिंदूंची संख्या कमी होत गेली तर मुस्लिमांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत गेली.
फाळणीपासूनच स्थानिक अल्पसंख्य हिंदूंना लक्ष केले जात आहे, स्थानिकांच्या छळाला कंटाळून दरवर्षी लाखो हिंदू देशातून पलायन करतात. हे प्रमाण गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. बांगला देशातील हिंदूंना दिली जाणारी अन्याय्य वागणूक हा जुना विषय असला तरी गेल्या पाच महिन्यांत तेथील हिंदूंची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे, हे असेच चालत राहिले तर पुढील काही महिन्यांत बांगलादेशात नावालाही हिंदू शिल्लक राहणार नाही. या उपरांत बांगला देशातील गरिबीला कंटाळून बांगलादेशी मुसलमानांचे लोंढेच्या लोंढे भारतात येत आहेत. आजमितीला ही संख्या १० कोटीहून अधिक झाली आहे भारतातील विकसनशील शहरी भागात बांगलादेशी नागरिकांच्या वस्त्या तयार झाल्या आहेत. येथील स्थानिक झोपडपट्टी दादा पैशांच्या मोबदल्यात या बांगलादेशी घुसखोरांच्या निवाऱ्याची, नोकरी व्यवसायाची आणि कागदपत्रांची व्यवस्था करून देतात. आजमितीला अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये आणि अनधिकृत कामांमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा सहभाग असल्याचे सिद्ध झाले आहे.
घुसखोरांना त्यांच्या देशात हाकलण्याचा कायदाही अस्तित्वात आहे; मात्र त्याची कठोरपणे अंमलबजावणीच केली जात नाही. एकीकडे बांगलादेशातील हिंदू नामशेष होऊ लागला आहे; तर दुसरीकडे भारतात आलेले बांगलादेशी घुसखोर भारताची अंतर्गत कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणू लागले आहेत. देशात राहून देशाशी बेईमानी करणारे काही देशद्रोही नागरिक या बांगलादेशीच्या खाण्याची आणि राहण्याची व्यवस्था करत आहेत, त्यामुळे त्यांना शोधून देशातून हाकलून लावणे पोलिसांनाही जिकरीचे होऊ लागले आहे. मध्यंतरी काही भागांत नागरिकांनीच पुढाकार घेऊन परिसरातील बांगला देशी नागरिकांना शोधण्याची मोहीम सुरु केली होती; मात्र तीही आता थंडावली आहे. बांगला देशातून पळून भारतात आलेल्या शेख हसीना यांच्या सुरक्षेत सरकार कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. त्यांच्या पारपत्राची मुदत संपल्यानंतरही सरकारने त्यांच्या व्हिसाची मुदत वाढवली आहे, दुसरीकडे बांगला देशात प्रतिदिन होणाऱ्या हिंदूंच्या दमनासाठी देशाचे सरकार काहीच पावले उचलताना दिसत नाही. देशाची अंतर्गत सुरक्षा व्यवस्था धोक्यात आणणाऱ्या बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांबाबत सरकार कोणतेही विशेष धोरण आखताना दिसत नाही. त्यामुळे भविष्यात भारतातून घुसखोरांना हाकलण्यासाठी सामान्य जनतेनेच पुढाकार घेतल्यास आश्चर्य वाटायला नको ! - जगन घाणेकर