१७४ फिर्यादींना ५.४१ कोटींचा मुद्देमाल परत

गत वर्षभरात नवी मुंबईत विविध गुन्ह्यांतील हस्तगत मुद्देमाल फिर्यादींकडे सुपूर्द

नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांनी विविध गुन्ह्यांचा छडा लावून परत मिळविलेला सुमारे ५ कोटी ४१ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल १४ ऑगस्ट रोजी वाशी येथील सिडको एविझबिशन सेंटर मधील ऑडीटोरियममध्ये आयोजित विशेष कार्यक्रमात १७४ फिर्यादींना परत करण्यात आला. याप्रसंगी ‘ऐरोली'चे आमदार गणेश नाईक, ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, ‘पनवेल'चे आमदार प्रशांत ठावूÀर, ‘उरण'चे आमदार महेश बालदी, पोलीस आयुक्त मिलींद भारंबे, अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे, पालीस उपायुक्त विवेक पानसरे (परिमंडळ-१), पंकज डहाणे (परिमंडळ-२), अमित काळे (गुन्हे शाखा), संजयकुमार पाटील (मुख्यालय), तिरुपती काकडे (वाहतूक शाखा) तसेच सर्व सहाय्यक पोलीस आयुवत, सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी आणि इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते. यावेळी चोरीस गेलेला ऐवज परत मिळालेल्या नागरिकांनी पोलिसांचे कौतुक करुन त्यांचे आभारही मानले.  


नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत असलेल्या सर्व पोलीस ठाण्यांतर्गत मागील वर्षभरामध्ये दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांचा पोलिसांनी उत्कृष्टरित्या तपास करुन चोरीस गेलेला आणि फसवणूक केलेली मालमत्ता हस्तगत केली आहे. गत वर्षभरामध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यांनी तसेच गुन्हे शाखेने सुमारे ५ कोटी ४१ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल परत मिळविला आहे. हाच मुद्देमाल फिर्यादींना परत करण्यासाठी १४ ऑगस्ट रोजी वाशीतील सिडको एविझबिशन सेंटर मधील ऑडीटोरियममध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते १७४ फिर्यादींना त्यांचा मुद्देमाल परत करण्यात आला. या कार्यक्रमात सोने चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोटार वाहने, मोबाईल आणि इतर वस्तु फिर्यादिंना परत करण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने चेन स्नॅचिंग, घरफोडी, चोरी तसेच फसवणूक या सारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. दरम्यान, फिर्यादींना त्यांच्या मौल्यवान वस्तू परत मिळाल्याने त्यांनी पोलिसांचे आभार मानून समाधान व्यक्त केले. 

 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

अंमली पदार्थ विरोधी कक्षाची खारघर आणि तळोजामध्ये धडक कारवाई