आई तुझ देऊळ फेम डान्सर सचिन ठाकूर यांची कार पुन्हा एकदा अज्ञात व्यक्तीने जाळली

वारंवार वाहने जाळण्याची घटना घडत असल्याने जसखार गावच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

उरण : आई तुझ देऊळ हे गीत संपूर्ण देशभरात गाजत आहे या गीताचे प्रसिद्ध कलाकार, डान्सर / नृत्य दिर्ग्दर्शक , श्री रत्नेश्वरी कलामंच चे संचालक , रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील जसखार गावचे सुपुत्र राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त  सचिन लहू  ठाकूर यांची दिनांक 5 जानेवारी 2023 रोजी जसखार गावात रूम नंबर 493,रोड जवळ, जसखार  येथे उभी असलेले फोर व्हीलर वाहन मारुती सुझूकी सिलेरियो, कार नंबर MH46 BV 2266 हे वाहन अज्ञात व्यक्तीने जाळून टाकले होते. त्यावेळी या वाहनाचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते तेव्हा सचिन ठाकर यांनी त्वरित न्हावा शेवा पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदविला होता. मात्र पोलिस प्रशासनाला तो आरोपी पकडण्यात त्यावेळी अपयश आले. त्यानंतर जवळ जवळ 7 महिन्यांनी परत तशीच सेम घटना जसखार गावातील सचिन ठाकूर यांच्या सोबत घडली असून दि 7  ऑगस्ट 2023 रोजी रात्री 1 वाजून 20 मिनिटांनी सचिन ठाकूर यांची रूम 493, जसखार गाव येथे असलेले मारुती सुझुकी सेलेरियो कार नंबर MH46BV 2266 मागच्या वेळी ज्या पद्धतीने  जाळली त्याच पद्धतीने पुन्हा जाळली. सचिन ठाकूर यांचे हे दुसऱ्यांदा वाहन जळाल्याने जसखार गावातील वाहनाच्या व नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.वाहनाला लागलेली आग सचिन ठाकूर व त्यांच्या कुटुंबियांनी तसेच मित्रांनी लगेच विझविली. व पुढे होणारा मोठा अनर्थ टळला.जवळच सीएनजी टॅंक होता. आणि आजूबाजूला रिक्षा व इतर वाहने होती. मोठा स्फोट हाऊन इतर वाहनांना आग लागल्याची शक्यता होती. मात्र आग विझविण्यात आली. यात सुदैवाने कोणतेही जीवितहानी झाली नाही.

अज्ञात व्यक्तीने वाहनाला आग लावल्याने या वेळीही सचिन ठाकूर यांना प्रचंड आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. पहिली घटना घडली तेव्हाही सचिन ठाकूर यांनी न्हावा शेवा पोलीस ठाण्यात जाऊन अज्ञात व्यक्तीवर गुन्हा नोंदवून पाठपुरावा केला होता. मात्र पोलिस प्रशासना कडुन योग्य ते सहकार्य मिळाले नाही व आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. 5  जानेवारी 2023 रोजी व 7 ऑगस्ट 20213 रोजी सचिन ठाकूर यांचे वाहन अज्ञात व्यक्तीने जाळले. सदर अज्ञात व्यक्तीने अगोदर 5 जानेवारी 2023  रोजी व आता 7 ऑगस्ट  2023 रोजी वाहन जाळले. दोन्ही तारखेला वाहन जाळणारी अज्ञात व्यक्ती ही  एकच असण्याची दाट शक्यता आहे. मात्र सुरवातीपासूनच पोलिसांनी योग्य ते आरोपीचा शोध न घेतल्याने अशा घटना वारंवार घडत असल्याचे सचिन ठाकूर यांनी सांगितले.सुरवातीलाच पहिल्यांदा जेव्हा घटना घडली तेव्हा पोलीस प्रशासनाने योग्य ते शोध घेत आरोपीचा शोध घेतला असता तर आज ही वेळ आली नसती असे सचिन ठाकूर यांनी सांगितले

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

मराठी वृत्त वाहिनीच्या नावाने बार चालकांकडुन खंडणी उकळणारी बोगस पत्रकारांची टोळी नवी मुंबईत सक्रीय