जागतिक अंमली पदार्थ दिनानिमित्त नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातर्फे जनजागृती

डी.वाय.पाटील मेडीकल कॉलेजमध्ये अंमली पदार्थ विरोधी जनजागृती
 

नवी मुंबई : जागतिक अंमली पदार्थ दिनानिमित्त नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातर्फे अंमली पदार्थ विरोधी कक्ष आणि डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नेरुळ येथील डॉ. डी. वाय.पाटील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक बी. एस. सय्यद, उपनिरीक्षक विजय शिंगे, कुलदिप मोरे, उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे निरीक्षक अनुप सानप, सहाय्यक निरीक्षक अजित शिर्वेÀ, तुषार कदम, डी.वाय.पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.राजीव राव, डॉ. प्रकाश रोपलेकर, आदि उपस्थित होते.

डी.वाय.पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित सदर कार्यक्रमात अंमली पदार्थ विरोधी कक्षातर्फे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ सेवनाच्या दुष्पपरिणामाबाबत आणि त्यामुळे होणाऱ्या हानीची माहिती देण्यात आली. तसेच उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत रस्ता सुरक्षा संदर्भात चित्रफीत दाखवून वाहन चालवताना कशाप्रकारे काळजी घ्यावी आणि नियम पाळावेत या संदर्भात वाहतूक निरीक्षक अनुप सानप यांनी माहिती दिली.

यावेळी डी.वाय.पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजीव राव यांनी अंमली पदार्थ सेवनाचे आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने कुटुंबावर होणारे परिणाम यावर मार्गदर्शन केले. रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत रस्त्यावर होणारे अपघात टाळण्यासाठी विद्यार्थी आणि कर्मचारी यांना यावेळी उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत मोफत हेल्मेट वाटण्यात आले. सदर कार्यक्रमास विद्यार्थी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

शिरढोण येथे एसटी-खाजगी बसची समोरासमोर धडक