बेकायदा झोपडी हटाव कारवाई निव्वळ फार्स

एपीएमसी आवारातील अतिक्रमित भूखंडावर ‘सिडको'द्वारे कारवाईचा फुसका बार

वाशी ः वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) परिसरातील मोकळ्या भूखंडावर वसलेल्या अनधिकृत झोपड्यांवर सिडको मार्फत कारवाई करण्याची मोहीम हाती घ्ोण्यात आली होती. मात्र, एकंदर ‘सिडको'ची बेकायदा झोपडी हटाव कारवाई निव्वळ फार्स ठरल्याचे समोर आले आहे. २३ मे रोजी ‘सिडको'ने बेकायदा झोपड्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला होता. मात्र, प्रत्यक्षात कारवाईचा बार फुसका ठरल्याचे बोलले जात आहे. सदर भूखंडावर असलेल्या अनधिकृत झोपड्यांचा २० मे रोजी आढावा घ्ोवून प्रत्यक्षात कारवाईचा मोठा गाजावाजा करण्यात आला होता. मात्र, नावाला समोरील काही झोपड्यांवर कारवाई करुन बाकी झोपड्यांना संरक्षण देण्यात आले. सदर जागेवर करण्यात आलेल्या अतिक्रमित वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. याकडे पोलिसांनी डोळेझाक करणेच पसंत केले आहे. कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता.


एपीएमसी मधील अनधिकृत झोपडी परिसरातील महिला नेहमीच रस्त्यावर फ्री स्टाईल हाणामारी करत असल्याने चित्र दिसते. तसेच सदर परिसरात मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ विक्री आणि खुलेआम देह विक्रीचा व्यवसाय सुरु असतो. याच जागेवर वाहनतळ उभारला आहे. त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणावर गदर्ुल्यांचा अड्डा बनत आहे. या विरोधात वाशी सेक्टर-२६ मधील रहिवाशांनी नवी मुंबई महापालिका, सिडको तसेच मुख्यमंत्री दालनापर्यंत पाठपुरावा करुन कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार सदर कारवाईची मोहीम हाती घ्ोण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात तीन-चार बेकायदा झोपड्या तोडून ‘सिडको'ने फार्स राबवला. त्यामुळे ‘सिडको'चा कारवाईचा फुसका बार भविष्यात आणखी डोकेदुखी ठरणार आहे.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

वाहन चालकांचे प्रबोधन करण्याचे तसेच बेशिस्त वाहन चालकांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश