कोपरखैरणे, घणसोली रेल्वे स्थानकाजवळील वाहतूक समस्या झाली कमी

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन; कोपरखैरणे वाहतूक पोलिसांची २२५० वाहनांवर कारवाई  

नवी मुंबई ः कोपरखैरणे वाहतूक पोलिसांनी १ ते २५ मे या कालावधीत आपल्या हद्दीत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एकूण २२५० वाहनांवर कारवाई करुन त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दंड वसूल केला आहे. या कारवाईत विशेष म्हणजे दारु पिऊन वाहन चालविणे आणि स्पोर्टस्‌ बाईक तसेच आवाजाचे सायलेन्सर असलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात आली.  

कोपरखैरणे वाहतूक शाखेकडून नियमांचे पालन करण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचबरोबर विशेष मोहीम राबवून वाहतुकीचे नियम भंग करणाऱ्या व्यक्तींविरोधात विशेष कारवाई देखील केली जात आहे. त्यानुसार १ ते २५ मे या कालावधीत नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत कोपरखैरणे वाहतूक शाखेचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भिंगारदिवे आणि त्यांच्या अधिनस्त पोलीस अमंलदारांनी विना हेल्मेट प्रवास, सिग्नल जम्पिंग, दारु पिऊन वाहन चालविणे, नो-पाकर्िंग, कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर, बेशिस्त रिक्षा चालक आ़ढो इतर वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या एवूÀण २२५० वाहनांवर प्रभावी कारवाई केली. तसेच त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दंड भरुन घेण्यात आला.

कोपरखैरणे वाहतूक पोलिसांनी कोपरखैरणे आणि घणसोली रेल्वे स्टेशन येथील वाहतुकीची समस्या कमी केल्याने नागरिकांनी टि्‌वटद्वारे तसेच समक्ष भेटून वाहतूक पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच काही नागरिकांनी कोंडीची समस्या मिटवल्यामुळे कोपरखैरणे वाहतूक पोलीस चौकीत जाऊन वाहतूक पोलिसांचे आभार मानले. दरम्यान, वाहतुकीचे नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांवर यापुढील काळात देखील अशाच प्रकारे कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भिंगारदिवे यांनी दिली. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

बेकायदा झोपडी हटाव कारवाई निव्वळ फार्स