प्रियंका पॅलेस (जागर रेस्टारँट आणि बार) लेडीज बारवर सोमवारी रात्री कळंबोली पाेलिसांचा छापा

कळंबोलीतील प्रियंका पॅलेस बारवर छापा, 10 बारबालासह 13 जणांवर कारवाई        

नवी मुंबई : कळंबोली पोलिसांनी ट्रक टर्मिनल मधील प्रियंका पॅलेस (जागर रेस्टारँट आणि बार) या लेडीज बारवर गत सोमवारी रात्री छापा मारुन सदर बारमध्ये काम करणाऱया 10 बारबाला व बारचा चालक, मॅनेजर व साऊंड सिस्टीम ऑपरेटर अशा एकूण 13 जणांना ताब्यात घेतले आहे. सदर बार मधील महिला वेटर या  तोकडे कपडे घालुन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अश्लील हावभाव व अंगविक्षेप करत असताना आढळुन आल्याने तसेच सदर बार मधील चालक व मॅनेजर हे त्यांना प्रोत्साहन देताना आढळून आले. त्यामुळे सदरची कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.      

कळंबोलीतील ट्रक टर्मिनल मधील प्रियंका पॅलेस या लेडीज बारमध्ये काम करणा-या महिला तोकडे कपडे घालुन अश्लिल हावभाव व अंगविक्षेप करुन बिभत्स वर्तन करत असल्याची माहिती मिळाल्याने वरिष्ठ अधिकाऱयांनी या बारवर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार कळंबोली पोलिसांनी सोमवारी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास सदर बारवर छापा मारला. यावेळी  सदर बारमध्ये काम करणाऱया महिला अश्लिल हावभाव व अंगविक्षेप करुन बिभत्स वर्तन करत डान्स कारताना आढळुन आल्या. तसेच बारचा मालक चालक प्रितेश गुफ्ता (32), मॅनेजर शकीळ अहमद शेख (42) व साऊंड सिस्टीम ऑपरेटर शमीम अहमद अब्दुल सत्तार शेख (40) हे तिघे बारमध्ये काम करणाऱया महिलांना प्रोत्साहित करताना आढळुन आले. त्यामुळे पोलिसांनी सदर बारमध्ये काम करणा-या 10 महिलांसह बारचा चालक, मॅनेजर आणि साऊंड ऑपरेटर अशा एकुण 13 जणांविरोधात 294,34 नुसार गुन्हा दाखल करुन सगळ्यांना ताब्यात घेतले.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

कोपरखैरणे, घणसोली रेल्वे स्थानकाजवळील वाहतूक समस्या झाली कमी