तूर्भेत शाखा ताब्यात घेण्यावरून शिंदे - ठाकरे गट भिडले

नवी मुंबई -  राज्यातील सत्तेत उलथापालथ झाल्यानंतर शिवसेनेवर एकनाथ शिंदे गटाने दावा सांगितला आहे.आणि त्यानंतर ठाणे,डोंबिवली येथे शिवसेनेच्या शाखा ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाल्यानंतर आता नवी मुंबईत ही असाच प्रकार घडला असून तुर्भे भागातील तीन शाखा ताब्यात घेण्याचा प्रयत्न  शिंदे गटाचे माजी नगरसेवक सुरेश यांच्या उपस्थितीत केल्याने  शाखा ताब्यात घेण्यावरून दोन्ही गट आमने सामने आले होते.

मागच्या तीन महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदारांनी शिवसेनेतून बंडखोरी केली. यानंतर भाजपसोबत हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली. या दरम्यान शिंदे गटाकडून शिवसेनेच्या चिन्हावर दावा करण्यात आला. या सगळ्या प्रक्रियेत शिवसेनेचे चिन्ह गोठवण्यात आलं. मागच्या तीन महिन्यांपासून शिंदे गट आणि ठाकरे गटातील कार्यकर्ते कोणत्या ना कोणत्या कारणावरून आमनेसामने येत आहेत. मागच्या काही दिवसांपूर्वी डोंबिवली व ठाण्यात शाखा ताब्यात घेण्यावरून वाद झाला होता. ही घटना ताजी असतानाच नवी मुंबईतही असाच प्रकार घडला आहे. यामुळे ठाकरे गट आणि शिंदे गट आमनेसामने आले यावरून काही काळ वातावरण तणावाचे बनले होते.

नवी मुंबईतील तुर्भे भागात शिवसेनेच्या  शाखा आहेत. या कार्यालयावर शिंदे गटाकडून ताबा घेण्याचे काम बुधवार दिनांक १९ ऑक्टोबर रोजी   शिंदे गटाचे माजी नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांच्या  उपस्थितीत करण्यात आले. यावरून ठाकरे गटातील उपशहर प्रमुख प्रकाश पाटील, महेश कोटीवले  यांच्या शह कार्यकर्ते एकत्र येत शिंदे गटाचे आव्हान परतवून  लावले. दरम्यान यावरून काही काळ  तणावाचे वातावरण बनले होते. तर मागील आठवड्यात शिंदे गटाकडून विजय चौगुले यांची जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्या नंतर शाखा ताब्यात घेण्यावरून छेडले असता आमच्या पदाधिकाऱ्यांकडे स्वतः ची कार्यालये आहेत. त्यामुळे आम्हाला असला प्रकार करण्याची गरज काय? मात्र जिल्हाध्यक्षांनी असे वक्तव्य करून आठ दिवस उलटत नाही तोवर  शिंदे गटाचे माजी नगरसेवक सुरेश यांच्या उपस्थितीत शाखा ताब्यात घेण्याचा प्रयत्न  केल्याने जिल्हाध्यक्ष विजय चौगुले तोंडघशी पडले आहे. तर या प्रकरणी माजी नगरसेवक सुरेश यांच्या  सोबत संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

शेतकऱ्यांसाठीच्या वचनपूर्ती बद्दल शिंदे फडणवीस सरकारचे अभिनंदन