आ. प्रशांत ठाकूर यांच्यावर वाढदिवस निमित्त शुभेच्छांचा वर्षाव

 

पनवेल ः विकासकामांचा डोंगर, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, राजकारण, या क्षेत्रातील लोकप्रिय नेतृत्व असलेले आमदार प्रशांत ठाकूर यांचे वाढदिवस निमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, हितचिंतकांनी शुभेच्छा देऊन अभिष्टचिंतन केले. तत्पूर्वी आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांचे वडील  रामशेठ ठाकूर आणि आई सौ. शकुंतला ठाकूर यांचे आशीर्वाद घेतले.


संघटन कौशल्य आणि सामाजिक जबाबदारीची जाणिव असलेले आमदार प्रशांत ठाकूर यांचा ५ ऑगस्ट रोजी ४८वा वाढदिवस होता. लहानग्यांपासून वृध्दांपर्यंत आणि युवकांमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांची क्रेझ कायम पहायला मिळते. अफाट लोकप्रियता त्यांनी आपल्या विधायक कार्यातून प्राप्त केली आहे. सलग तीनवेळा आमदार होऊनही त्यांच्या वर्तनात कधीही बडेजाव न दिसल्याने त्यांचे लाखोंच्या संख्येने हितचिंतक आहेत. त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, राजकीय, कला, सांस्कृतिक, वैद्यकीय, विधितज्ज्ञ, पत्रकारिता, विविध संस्था, संघटना, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी त्यांचे अभिष्टचिंतन केले.

 
पक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणे, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संघटन कौशल्यातून नेहमीच अधोरेखित झाली आहे. पनवेल त्याचबरोबर रायगड जिल्हा किंवा जिल्ह्याबाहेर आलेल्या नैसर्गिक आपत्ती, आपत्कालीन परिस्थितीत रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर यांनी नागरिकांना सढळ हस्ते मदत आणि धीर देण्याचे काम केले असल्याचे संपूर्ण महाराष्ट्राने पहिले आहे. मात्र, सदर समाजकार्य त्यांनी कधीही सवंग लोकप्रियता किंवा प्रसिध्दीसाठी केले नाही. माणूस आणि माणुसकी म्हणूनच त्यांच्याकडून विधायक कार्य घडत आले आहे. सर्व क्षेत्रात आमदार प्रशांत ठाकूर यांचे भरीव योगदान आहे.  रामशेठ ठाकूर यांचा ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करण्याचा वसा त्यांनी सांभाळला आहे. सतत सर्व समाजाच्या विकासाचा ध्यास घ्ोऊन समाजाला कोणती गरज आहे, इतेक लक्षात घेऊन ऊन पावसाची तमा न बाळगता दिवसातील १८-१८ तास आमदार प्रशांत ठाकूर काम करीत असतात. त्यामुळे वाढदिवसदिनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शुभेच्छांचा वर्षाव झाला.

अभ्यासू, कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांचे वाढदिवसानिमित्त राज्यभरातील अनेक मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शुभेच्छा देऊन, त्यांनी टि्‌वटरवर टि्‌वट करुनही अभिष्टचिंतन केले. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये विविध विकासकामांचा शुभारंभ