सोन्याचा मोह

लोकं सोन्यासारखा संसार मोडतात.आपण दसऱ्याला सोनं घ्या, सोन्यासारखा रहा म्हणतो. पण सोन्यासारखं म्हणजे किमती वस्तूसारखं हा एकमेकांशी किंमत देऊन बोला सांगतो तर आपण ते सगळं पायदळी  तुडवतो. सोन्याचे पान देतो, सोन्यासारखा मान देत नाही. खरं तर सोने ही गुंतवणूक मानतात. समजतात की संकटकाळी सोनं मोडता येईल. पण सोनं मोडायला फार मोठी हिम्मत लागते.

मृग सोन्याचा जगी असंभव,
तरीही तयाला भुलले राघव,
श्रीरामाला फसवूनी गेली, शक्ती मायाविनी!
 दैव जाणिले कुणी !

असं असतं. आयुष्यात माणसाला सोन्याचा मोह नेहमी पडत असतो किंवा समोर येणारा मोह हा सोनेरी रूप धारण करून येतो.ईतका की ते घर, कि तो संसार या सोनेरी मोहामुळे मोडतो.किती तरी घर या मोहाने विस्कटलेले असतात.

सीता मातेला सोनेरी हरीण दिसलं आणि रामायण घडलं. सोने सोन्याच्या साखळीचा, सोनपक्षीचा मोह पडून राजकन्या त्या सोनेरी माळेच्या मोहानी, पुढे गेली आणि पुढे बंदीवान ठरली. म्हणजे सोन्याचा मोह माणसाला कायमच धोका देत असतो.

मला आज हे आठवायचं कारण म्हणजे आम्ही जेव्हा नोकरीला लागलो, तेव्हा दर महिन्याला पगारातून एकेक ग्रॅम सोनं घ्यायची पद्धत होती. त्यामुळे मग आम्ही तरुणी, पोटाला चिमटा घ्ोत, कधी बसने जाणं टाळून, चालत जात बचत करायचो. कधी काही खावंसं वाटलं तरी मन मारणं, असं करून करून ते दर महिन्याला एक ग्रॅम सोनं घ्यायचो. तो सोन्याचा मोह बरीच वर्ष चालू राहिला.

तसं दिवाळीला सुद्धा, एकदा माझ्या मामींना मामांनी विचारलं,
"तुला घर घ्यायचं, का सोन्याचा हार घ्यायचा?
 तर मामी म्हणाल्या,
"घराची तातडीने निकड नाही. मला सोन्याचा हार घ्यायचा.
 त्या सोन्याच्या हाराची किंमत खूप वाढली नाही. पण ती हातातून गेलेली, घर घेण्याची निसटलेल्या संधी, तिची किंमत मात्र करोडोत गेली.

तसं सोन्याचा मोह बाईला नेहमीच होत असतो. मला चांगलेला आठवतंय की एकदा कपडे खरेदीच्या वेळी आम्हाला वडिलांनी पैसे दिले होते आणि आईला जुनी माळ मोडून नवीन माळ करायची होती. त्या सोनं आवाजात, वजनाच्यात भर म्हणून घालायला ते पैसे सगळे वापरले गेले. पूर्वीचा काळ काही आत्तासारखा नव्हता. तेव्हा भरपूर पैसा काही घरी नसायचा. बँंकेत नसायचा. महिनाभर जो पगार येईल त्याच्यात भागवलं जायचं. पण त्या सोन्याच्या मोहामुळे, आईला मुलांना कपडे घेणे, आईला लुगडे घेणे आणि काही विशेष चंगळ दिवाळीतली करता आली नाही. दिवाळीच्या साठी फटाके घ्यायचे ते घेता आलं नाही. आईने सोन्याची माळ घेतल्यामुळे घरात फटाके फुटले. असा सोन्याचा मोह माणसाला असतो.

देवा,  तू माझा सोनार असं म्हणताना, आपले संत म्हणतात, की देवा, मला असा दागिना दे की मला फक्त चांगल ऐकायला येऊ दे.असा सोनेरी चष्मा दे, मला चांगलं दिसू दे. मला चांगलं बोलायची शक्ती दे , पण ते सोने कोणाला नकोय. सगळ्यांना सोनं या निर्जीव धातूचा मोह आहे.

लग्नातसुद्धा वीस तोळे सोन्याचे वळे, दागिने देणे असे मुद्दे घेवून अशा अटी घातल्या जातात. पण संसार सुखाचा होणे आणि त्या सोन्याचा नंतर उपयोग कधीही संबंध नसतो. मागे एका झालेल्या सर्वेनुसार कित्येक घरी जे सोनं नाणं आहे, जी माणसांनी जपून ठेवलेली दागिनेची पेटी आहे ती मौल्यवान नाही. सोने ठेवतो, हेतू हा  की अडीअडचणीला उपयोगी पडेल. ते सोनं नाणं खरं आहेच असं नाही. त्या पारंपरिक सोन्याची शुद्धता कधी तपासलीच केली नाही. त्याच्यात कित्येक प्रकारे भेसळ असू शकते. अर्ध पितळ असू शकतं. त्यात किंवा काही काही गळसरी, सोन्याचे हार आणि दागिने पूर्ण खोटे देखील असू शकतात. केवळ त्यावेळी पोटाला चिमटा काढून आणि सोनारांनी जे लिहिलं त्याच्यावर विश्वास ठेवून आपण केलेली बचत त्या सोनाराला देतो. गुंतवणूक म्हणून ते सोनं खरेदी करतो. सोन जपतो. सोन्याचे भाव वाढतात त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करा असं सांगितलं जातं. पण पूढे मोडायला गेल्यावर त्याच्यात घट काढली जाते आणि जागांच्या भावाएवढे तर, सोन्याचे भाव कधीच वाढत नाही.

 एक लेख मी वाचला होता. त्यात नायक असलेल्या पुरुषाला घर घ्यायचं असतं. म्हणून तो बायकोला म्हणतो तुझे सगळे दागिने दे. बायको म्हणते, मी देणार नाही. शेवटी बरीच वादावादी झाल्यावर, अर्धे दागिने ती त्यांना देते. तो नायक दागिने विकून अर्धे पैसे भरतो. पण पुढचे पैसे भरायच्या वेळी पत्नी दागिने देण्यास नकार देते.त्यामुळे पूर्णपणे त्या सोन्याचा उपयोग होतच नाही. ते घरसुद्धा दिलेले पैसे परत घेऊन बुकिंग रद्द करायची वेळ येते. थोडक्यात काय सोन्याचा मोह हा सोनं धरवत नाही आणि सोनं सोडवत नाही, असाच होतो.

लोकं सोन्यासारखा संसार मोडतात.आपण दसऱ्याला सोनं घ्या, सोन्यासारखा रहा म्हणतो. पण सोन्यासारखं म्हणजे किमती वस्तूसारखं हा एकमेकांशी किंमत देऊन बोला सांगतो तर आपण ते सगळं पायदळी  तुडवतो. सोन्याचे पान देतो, सोन्यासारखा मान देत नाही. खरं तर सोने ही गुंतवणूक मानतात. समजतात की संकटकाळी सोनं मोडता येईल. पण सोनं मोडायला फार मोठी हिम्मत लागते. वाईट परिस्थिती आली तरी माणूस पटकन सोनं मोडून पैसे उभा करायला तयार होत नाही. आमच्या एका परिचिताकडे पुण्याला हार्ट सर्जरी करायला म्हणून ॲडमिट केल्यावर, रोज सकाळी नाश्त्याबरोबर बिल द्यायचे. ते बिल भरण्यासाठी त्यांची पत्नी एक एक बांगडी मोडायची. असा जीवन मरणाचा प्रश्न आला तरच माणूस ते दाग दागिने मोडतो.

सोन्याची भिशी असते. दर महिन्याला एक ठराविक रक्कम देऊन सणाला दिवाळीला किंवा दसऱ्याला त्या ११ महिन्याच्या रकमेतून सोन्याची वस्तू घेण्यात येते. पण मी सोन्याची वस्तू त्याच सोनाराकडून घेण्यात येते त्याच्याकडे पैसे ठेवले. त्या वस्तूच्या गुणवत्तेबद्दलची खात्री नसते किंवा तो सोनार ते पैसे घेऊन गायब पण होऊ शकतो. म्हणजे सोन्यासाठी केलेली मेहनत ही सोनेरी गुंतवणूक ठरतेच असं नाही.

बाकी मला गाडी घ्यायची, तू तुझी दागिने दे म्हणाल तर अजिबात पत्नी देणार नाही. उलट व्याजात डबल पैसे वाया जातील, पण बाईला आपल्या सोन्याच्या दागिन्यांबद्दल खूप मोह असतो. रस्त्यांनी जाणारे सोनसाखळी चोर, बाकीच्या वस्तू चोरत नाहीत पण मोबाईल आणि सोनसाखळ्या या महाग वस्तूंवर त्यांची बरोबर नजर असते.

 हल्लीच्या दिवसात मोबाईल चोरीपण सोपी नाही. कारण ट्रॅक केला जातो. चोरी पकडली जाते. पण सोने चोरी, विक्री मात्र एकदम सोप्पी असावी. परक्या गावी जाऊन चोर सोनं मोडतात. काही मोडीत दागिने घेणारे सोनारपण ठरलेले असतात. त्यामुळे सोनं मोडणं सोपं जातं. म्हणून चोरणारे चोर देखील सोनं चोरतात.

 शिवाय त्यात सोनं साखळी चोरणारा ढकलून देतो. त्याच्या हिसक्याने माणूस खाली पडतो आणि जीवालाही हानी होते, पण सोन्याचा मोह काही बाईला/पुरुषाला सोडवत नाही. सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या बायकांच्या पाठोपाठ पोलिसांची गाडी फिरवावी लागते. ती सांगते की आपल्या गळ्यातले दागिने झाकून घ्या. बेसावध झाला तर, अन्यथा चोरांनी तुमच्या सोनसाखळीसाठी लक्ष्य करून तुम्हाला ढकललं तर तुम्हाला इजा होऊ शकते. सगळं चकाकतं तर ते सोनं नसतं हे खरं आहे. तसं असलं तरी  सोनेरी रंगाचे, त्या सोन्याचं आकर्षण आणि सोन्याचा मोह हा चिरंतन आहे. सोने, भाव खात, भाव वाढत लाखावर गेले आहे. - शुभांगी पासेबंद 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

जीवनानंद