एसटी चे एकूण अर्थ तंत्र सुधारण्यासाठी ......
शासनाच्या एसटी संबंधीच्या घोषणा व संकल्प केव्हाही स्तुत्य असले तरी सध्याचे वास्तव मात्र भयंकर दिसत आहे . एकंदरीत स्थिती पाहताना एसटीचे अर्थतंत्र फारच बिघडलेले दिसते आहे. त्यासंबंधी व काही सूचना नक्कीच कराव्याश्या वाटतात. त्यासाठी शासनाला काही कठोर निर्णय त्वरित घेणे आवश्यक वाटते.
एसटी कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन देताना प्रशासनाची हतबलता स्पष्टपणे प्रसार माध्यमातून समजते. एसटीचे कर्मचारी आपली सेवा बजावीत असताना जर ते आपल्या प्रापंचिक अडचणीत व दु;खी असले तर त्यांच्या परिवहन सेवेत गडबडी होऊ शकतात त्याचे काय? त्यामुळे वाहक/चालक/एसटीची मोटार सदैव सुस्थितीतच असायला हव्यात. त्यातच तर एसटीच्या तापयात नवीन बसेस व कर्मचारी भरती होऊ घातली आहे.
अपेक्षित उपाय योजना १़) ६५ व ७५वर्षे पूर्ण वयाच्या वयस्कर मंडळीना मिळणारी सवलत पुर्णाशाने काही काळासाठी तरी शासनाने मागे घ्यावी. विद्यार्थी व अपंग यांच्या असलेल्या सवलती वगळून सर्व उपलब्ध सवलती बंद कराव्यात. २़) बसमधील आकारात - ticket सुसूत्रता आणून चाललेल्या स्पर्धाशी जुळवून घ्यावे लागेल..उदा, बोरीवली पुणे खाजगी वातानुकुलीत बसला ४००.०० रुपये घेत असताना एसटीच्या शिवनेरीस ६५०.०० आकारले जातात. नाही म्हटले तरी प्रवासी वाढीस त्याचा नक्कीच उपयोग होईल. ३) बस्थानकाच्या १०० मी .परिसरात अन्य कोणतीही खाजगी बस /वाहन उभी करण्याचे कायदेशीर असताना खाजगी बसवाले स्थानकातील प्रवासी चतुराईने पळवतात. हे कसे घडते? की घडवले जाते?. ह्यावर शासनाचे पूर्ण नियंत्रण हवे. ज्यायोगे प्रवासी एसटीतूनच प्रवास करतील. ४) ब-याचदा बस स्थानके साफसुथरी नसतात. त्यांची स्थिती चांगली नसते. कदाचित त्याची अनेक कारणे असतील, त्याकडे लक्ष देणे योग्य आहे. ५) पूर्वी खाजगी बस सेवा राज्याबाहेरच होती. तेव्हा एसटी पूर्णत्वाने चालत होती. आता राज्यात प्रवासाची परवानगी दिल्याने एसटीवर वाईट परिणाम झाला आहे त्याचे काय ? ६़) एसटी स्थानकाच्या जागेचा पूर्णत्वाने उपयोग करून घ्यावा. ते बहुमजली करून ते व्यापारी तत्वावर (commercial complex स्वरुपात ) द्यावेत. जमिनीवर एसटीचा वावर पूर्णत्वाने चालू ठेवावा. असे केल्याने एसटीला दीर्घ स्वरूपी मिळकत होऊ शकेल. हे व असे अनेक मुद्दे सुचविता येतील. ज्यायोगे एसटीची अर्थव्यवस्था नक्कीच सुधारेल; अर्थात त्यासाठी हवेत सर्वस्तरीय योग्य प्रयत्न व सचोटी! - रामकृष्ण विनायक अभ्यंकर