हल्याचा प्रतिशोध घ्यावा !

देशात आतंकवादी हल्याच्या धमक्या केवळ हिंदूंच्या सण उत्सवांना आणि कुंभपर्वांना येतात. आजतागायत भारतात जे काही आतंकवादी हल्ले झाले ते करणारेही बहुतांश एकाच पंथांचे होते. एव्हढे सर्व घडूनही आपण आजही हेच म्हणायचे का की आतंकवादाला धर्म नसतो? आतंकवादी हल्ल्यानंतर तीव्र निषेध करणे, मेणबत्या पेटवणे, मोर्चे काढणे, सोशल मीडियावर चिड व्यक्त करणे आता पुरे झाले. भारतीयांना या हल्याचा प्रतिशोध हवा आहे तोही इस्त्रायल सारखा.

पहेलगाममध्ये झालेला आतंकवादी हल्ला देशाच्या अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे काढणारा आहे. भारताचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या काश्मीरमध्ये उन्हाळ्याच्या दिवसात पर्यटक येथील सौंदर्य आणि गारवा अनुभवण्यासाठी येत असतात. यातून राज्यासह देशाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. आतंकवाद्यांनी पर्यटकांना लक्ष करून काश्मीरविषयी भय निर्माण केले आहे. यातून भविष्यात काश्मीरमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या नक्कीच रोडावणार आहे ज्याच्या परिणाम देशाच्या महसूलावर होणार आहे.
 काश्मीरमधून ३७० कलम काढल्यानंतर काही काळातच तेथील परिस्थिती भयमुक्त केल्याच्या वल्गना केंद्र सरकारकडून केल्या जात होत्या; मात्र या हल्याने त्या सपशेल फोल ठरवल्या. आतंकवादाला धर्म नसतो हे लहानपणापासून आम्हाला शिकवले गेले, मात्र काश्मीरमध्ये झालेल्या हल्यात आतंकवाद्यांनी पर्यटकांना त्यांचे धर्म विचारून केवळ हिंदूंना लक्ष केले हेही आता स्पष्ट झाले आहे. देशात आतंकवादी हल्याच्या धमक्या केवळ हिंदूंच्या सण उत्सवांना आणि कुंभपर्वांना येतात. आजतागायत भारतात जे काही आतंकवादी हल्ले झाले ते करणारेही बहुतांश एकाच पंथांचे होते. एव्हढे सर्व घडूनही आपण आजही हेच म्हणायचे का की आतंकवादाला धर्म नसतो? देशाच्या स्वातंत्र्यानंतर आतंकवादी हल्याचा जो अनुभव भारतीयांनी घेतला आहे तो अनुभव खचितच कोणत्या देशाने घेतला असेल.

आतंकवाद्यांनी आजतागायत देशभरात हजारो निरपराध नागरिकांची हत्या केली आहे. स्त्रिया आणि बालकांनाही त्यांनी सोडलेले नाही. हजाराेंचे संसार उध्वस्त केले आहेत. देशाच्या संपत्तीची अपरिमित हानी केली आहे. स्वातंत्र्यानंतर आजतागायत अनेक सरकारे आली आणि गेली मात्र आतंकवादाचा बिमोड करणे कोणालाही शक्य झालेले नाही. पहेलगाम हल्यानंतरही समस्त राजकीय मंडळींनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केले आहेत. विरोधी पक्षांनी सत्तास्थानी असलेल्या भाजपला लक्ष केले आहे. माननीय पंतप्रधानांनीही आतंकवाद्यांना सोडणार नसल्याचे विधान केले आहे. देशाचे गृहमंत्री हल्ल्यानंतर तात्काळ श्रीनगरमध्ये दाखल झाले. आतंकवादी हल्ल्यानंतर तीव्र निषेध करणे, मेणबत्या पेटवणे, मोर्चे काढणे, सोशल मीडियावर चिड व्यक्त करणे आता पुरे झाले. भारतीयांना या हल्याचा प्रतिशोध हवा आहे तोही इस्त्रायल सारखा. इस्त्रायलवर ज्या आतंकवादी तळावरून हल्ला होतो तो तळच इस्त्रायल उध्वस्त करते.

ज्यू नागरिक जगाच्या पाठीवर कुठेही रहात असला तरी तो स्वतःला सुरक्षित समजतो. कारण त्याच्या पाठीशी त्याचा देश उभा असतो. चोहोबाजूनी बलाढ्य शत्रूराष्ट्रानी वेढला असूनही इस्त्रायलने या देशांवर आपला दरारा कायम ठेवला आले. त्या तुलनेत भारत बलशाली असतानाही भारतात अधूनमधून कुठेना कुठे आतंकवादी हल्ले होतच असतात. भारतानेही आता इस्त्रायलप्रमाणे बाणेदारपणा अंगीकारला पाहिजे.  देशात राहून शत्रूराष्ट्राशी इमान राखणाऱ्या, आतंकवाद्यांना आश्रय देणाऱ्या स्थानिक देशद्रोह्यांनाही जन्माची अद्दल घडवायला हवी. आतंकवाद्यांच्या आश्रयस्थानांवर हल्ला करून त्याचे समूळ उच्चाटन करणे आणि आतंकवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला कायमची अद्दल घडवणे हाच या हल्याचा प्रतिशोध असून भारताने त्यादृष्टीने सिद्धता करायला हवी! - जगन घाणेकर 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

शौर्य-श्रीमंत सैनिक!