एका रक्तरंजित हत्याकांडाची आठवण .... अर्थातच जालियांवाला बाग ...

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील जालियनवाला बाग हत्याकांड हा एक रक्तरंजित इतिहास आहे.  १०५ वर्षांपूर्वी हे हत्याकांड घडले होते. या हत्याकांडानंतर भारतीय राष्ट्रवादाने वळण घेतले व राष्ट्रीय भावना अधिक उफाळली व स्वातंत्र्याची भावना अधिकच जागृत झाली. १४ आक्टोबर १९९७ रोजी ब्रिटिश साम्राज्याच्या राणी एलिझाबेथ यांनी द्वितीय पुत्र राजपुत्र फिलिप यांच्यासह येऊन संवेदना प्रकट केली व ब्रिटिशांची चूक कबुल केली.

  या अमृतसरमधील जालियनवाला बाग हत्याकांडाला १३ रोजी १०६ वर्षे  झाली. याच दिवशी जनरल डायरने वीस हजार लोकांच्या समुदायावर बेछूट गोळीबार केला होता.जालियनवाला बाग ही तीन बाजूनी बंद असलेली एका बखळ होती. या बखळीत जाण्यासाठी एकाच अरुंद वाट होती. ब्रिटिश जनरल डायरने एकूण १६०० हुन अधिक फैरी झाडल्या. या बेछूट गोळीबारात अनेक नागरिक, लहान मुले, वृद्ध मृत्युमुखी पडले. या घटनेनंतर ब्रिटिश सरकारने ३७९ माणसे मृत्युमुखी पडल्याचे अधिकृत  घोषित  केले तरीही एक हजार लोकांपेक्षाही जास्त लोक मरण पावले. देशभर या घटनेनंतर संतापाची लाट उसळली. डायरच्या शोधात काही युवक होते. त्यातील उधमसिंग नावाचा युवक जो या हत्याकांडात जखमी झाला होता, त्यांने १३ मार्च १९४० रोजी पंजाबचा गव्हर्नर असलेल्या मायकेल अडवायरला ठार मारले. ३१ जुलै १९४०रोजी तो फाशीच्या शिक्षेला सामोरे गेला.

जालियनवाला बाग हे पंजाबमधील अमृतसरमधील एक ठिकाण... ब्रिटिश सरकारने १९१८ साली म्यांटेंगू गू चेम्सफर्ड सुधारणा जाहीर केल्या. या सुधारणा जाहीर होताच देशभर संताप झाला. या नंतर रौलेट कायदा अमलात आणला गेला. या कायद्याबाबत रहिवाशांना पूर्ण माहिती नव्हती. या नंतर श्रीनिवास शास्त्री व महात्मा गांधी यांनी कठोर टीका केली. यानंतर आंदोलनाचा भडका उडाला. लोकमान्य टिळक व महात्मा गांधी यांना पंजाबात येण्यास ब्रिटिश सरकारने बंदी घातली  या बंदी मुळे आगीत तेल ओतल्याची भावना निर्माण झाली. अमृतसर येथे ६ एप्रिल १९१९ रोजी हरताळ पाळण्यात आला. सरकारने पंजाबमधील नेते किंचलू व सत्यपाल यांच्यावर भाषण बंदीचा आदेश बजाविला याच्यावर कहर म्हणजे ११ एप्रिल १९१९ रोजी संपूर्ण अमृतसर शहर लष्कराच्या ताब्यात देण्यात आले. पण या आदेशाला या दोन्ही नेत्यांनी जुमानले नाही.

 नेमका हा दिवस प्रतिपदेचा होता व या दिवशी रविवार होता. याच दिवशी शिखांचा बैसाखी सण  होता. जालियनवाला बाग हे ६ ते ७ एकर एवढे होते. लष्करी सत्तेला न जुमानता लाला हंसराज व किचलू यांनी जालियनबाग येथे १३ एप्रिल या दिवशी जाहीर सभा होईल असे जाहीर केले. याच दिवशी ब्रिटिश सरकारने बैठका किंवा मीटिंग्ज घेण्यावर बंदी घातली होती. विशेष म्हणजे नोटीस सर्व ठिकाणावर नव्हती. अशा परिस्थितीत सभा जालियनवाला बाग येथे  सुरु  झाली. अन सभा सुरु होताच या ठिकाणी अमानुष गोळीबार सुरु केला. या गोळीबारात अनेक वृद्ध, मुले नागरिक सापडले. केवळ पहिल्या दहा मिनिटातच १६५० हुन अधिक फैरी झाडण्यात आल्या. अनेकांनी आपला जीव वाचविण्यासाठी शेजारील असलेल्या विहिरीत उद्या टाकल्या. त्यात अनेकजण मृत्युमुखी पडले. त्या विहिरीतून १२० मृतदेह नंतर बाहेर काढण्यात आले. गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्ती ३७९ असल्याचे ब्रिटिश सरकारने नंतर जाहीर केले. अनधिकृत अंदाजानुसार १५०० पेक्षाही अधिक माणसे मृत्युमुखी पडली होती. आजही जालियनवाला बाग येथील फलकावर २००० पेक्षा अधिक मृत्युमुखी पडल्याची नोंद आहे. जखमींची संख्यासुद्धा काही हजारात होती. यावर कळस म्हणजे ब्रिटिश सरकारने वीज व पाणी याचा पुरवठा बंद केला. यानंतर देशात राष्ट्रीय भावना उफाळली.

या हत्याकांडाचे पडसाद ब्रिटिश संसदेतसुद्धा उमटले. ब्रिटिश संसदेने २४७ विरुद्ध ५३७ मताधिक्क्याने डायरच्या विरोधी मतदान केले. चर्चिल यांनी ही इतिहासातील काळीकुट्ट घटना असल्याचा उल्लेख केला. या घटनेनंतर कवी रवींद्रनाथ टागोर यांनी ब्रिटिश सरकारच्या सर्व पदव्यांचा त्याग केला. या जालियनवाला बाग घटनेनंतर १९२० ते १९२२ मध्ये घडलेल्या असहकार चळवळीची बीजे रोवली गेली. जालियनवाला बाग हत्याकांडानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने १९२०नंतर राष्टीय स्मारक करण्याचे ठरविले. या स्मारकासाठी एका ट्रस्टची स्थापना १९२३ साली करण्यात आली. बेंजामिन पोल्क या अमेरिकन व्यक्तीकडे या स्मारकाचे डिझाईन करण्याचे काम होते. स्मारक पूर्ण होऊन त्याचे उद्‌घाटन प्रथम राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांचे हस्ते व पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत १३ एप्रिल १९६१ रोजी पार  पडले.  आजही या स्मारकात गोळीबाराच्या खुणा आहेत. तसेच ज्या विहीरीत त्यांनी उड्या मारल्या ती विहीरसुद्धा संरक्षित स्मारक म्हणून घोषित केली आहे. १४ आक्टोबर १९९७ रोजी ब्रिटिश साम्राज्याच्या राणी एलिझाबेथ यांनी द्वितीय पुत्र राजपुत्र फिलिप यांच्यासह येऊन संवेदना प्रकट केली व ब्रिटिशांची चूक कबुल केली. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील जालियनवाला बाग हत्याकांड हा एक रक्तरंजित इतिहास आहे.

 १०५ वर्षांपूर्वी हे हत्याकांड घडले होते. या हत्याकांडानंतर भारतीय राष्ट्रवादाने वळण घेतले व राष्ट्रीय भावना अधिक उफाळली व स्वातंत्र्याची भावना अधिकच जागृत झाली. या हत्याकांडातील शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली. - शांताराम वाघ 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

प्रेमाचे झाड