काय नाही त्यापेक्षा काय आहे यावर लक्ष केंद्रित करणारा निक वुजिसिक

जर निक वुजिसिक हात-पाय नसतानाही एक यशस्वी लेखक, वक्ता आणि प्रेरणेचा स्त्रोत बनू शकतात, तर मग आपल्या छोट्या-छोट्या अडचणींमुळे हार मानण्याचा आपल्याला काहीच अधिकार नाही. सदर लेख  त्यांच्यासाठी एक जागरूकतेची घंटा असू शकते, जे छोटे-छोट्या समस्यांमुळे जीवनाबद्दल निराश होतात.

माणसाला अवयव नाही चालवत; तर मन त्याला चालवतं. अवयव शरीरांचे असतात.. पण मन त्यांना नियंत्रित करतं. शरीराचे अवयव थकतात; पण मनाचे अवयव ज्याचे मजबूत असतात तो थकत नाही, इतिहास घडवतो.

 जीवनात अनेक निराशेचे प्रसंग तुम्हाला निराश करतात, थांबवतात, पुढे जाण्यापासून परावृत्त करतात. खूप निराशेने भरलेल्या जगात खूप आशावादी लोक आहेत म्हणूनच यशोगाथा आहेत.

काही कहाण्या तुम्हाला अस्वस्थ करतात. काही कहाण्या तुम्हाला स्वस्थ होण्यास मदत करतात अशीच एक कहाणी खरोखरच प्रेरणादायक आहे. त्यांनी आपल्या मर्यादांना कमजोरी बनू दिले नाही, उलट त्यांना आपल्या ताकदीत रूपांतरित केले. त्यांचे जीवन हे सिद्ध करते की खऱ्या अडचणी शारीरिक नसतात, तर मानसिक असतात.
त्यांची कहाणी आपल्याला शिकवते की कोणतीही परिस्थिती आपल्याला रोखू शकत नाही, जोपर्यंत आपण स्वतः हार मानण्याचा निर्णय घ्ोत नाही. जर निक वुजिसिक हात-पाय नसतानाही एक यशस्वी लेखक, वक्ता आणि प्रेरणेचा स्त्रोत बनू शकतात, तर मग आपल्या छोट्या-छोट्या अडचणींमुळे हार मानण्याचा आपल्याला काहीच अधिकार नाही.
ही पोस्ट त्यांच्यासाठी एक जागरूकतेची घंटा असू शकते, जे छोटे-छोट्या समस्यांमुळे जीवनाबद्दल निराश होतात. तुम्हालाही कधी असे वाटले आहे का, की एखाद्या कठीण प्रसंगाने तुम्हाला रोखले आहे?

जेव्हा तो जन्मला तेव्हा त्याची आई त्याला पाहून वळून गेली, कारण तो केवळ दोन्ही हात आणि पायांशिवाय नव्हता, तर त्याच्या संपूर्ण टाचा आणि बाहूदेखील अस्तित्वात नव्हत्या.

सध्या त्याचे वय ४१ वर्षे आहे. विचार करा, त्याने गेली ४१ वर्षे बिना हात-पायांच्या कशी घालवली असतील...? आणि तो आज कोणत्या स्थितीत असेल? जर तुम्ही ऑस्ट्रेलियात जन्मलेल्या या व्यक्तीचे जीवन वाचले, तर तुमच्या सर्व तक्रारी, बहाणे आणि गाऱ्हाणे नाहीशी होतील आणि माझ्यासारखेच तुमचेही डोके लज्जेने झुकले, कारण तो आपल्या अपूर्ण शरीरासह संपूर्ण आणि समृद्ध जीवन जगतोय. उलट, तो कोट्यवधी निराश डोळ्यांमध्ये आशेचा प्रकाश निर्माण करतो आणि खचलेल्या हृदयांमध्ये नवचैतन्य निर्माण आणतो.

तो सात पुस्तकांचा लेखक आहे आणि त्याची बहुतांश पुस्तके न्यूयॉर्क बेस्टसेलर यादीत समाविष्ट झाली आहेत.त्याच्या पुस्तकांच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरून लावता येतो की त्याची पुस्तके जगभरातील ४० हून अधिक भाषांमध्ये भाषांतरित झाली आहेत.तो एक मोटिवेशनल स्पीकर देखील आहे आणि ऊिं सह प्रत्येक नामांकित व्यासपीठावर आपल्या भाषणांद्वारे लाखो लोकांचे जीवन बदलत आहे.

त्याच्या तोंडून निघणारे प्रत्येक शब्द आशा आणि जीवनाने भरलेले असतात. आपल्या मोटिवेशनल स्पीचच्या निमित्ताने तो अर्ध्याहून अधिक जग फिरून आलेला आहे.
त्याने २००५ मध्ये Life Without Limbs आणि २००७ मध्ये Altitude is Altitude या नावाने प्रशिक्षण केंद्रे स्थापन केली, जिथे तो व्यावसायिक आणि विविध देशांच्या अधिकाऱ्यांना यशस्वी होण्याचे तंत्र शिकवतो. त्याचे माध्यम जगताशीही घनिष्ठ संबंध आहेत. प्रत्येक मोठ्या मीडिया हाऊस आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याचे लाखो अनुयायी आहेत, ज्यांना तो आपल्या भाषणांद्वारे, व्हिडिओंमधून आणि लेखनाद्वारे चांगले आणि आनंदी जीवन जगण्यासाठी प्रेरित करतो.  CNN, BBC, CNBC यांसारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील वृत्तवाहिन्या त्याचे मुलाखती सातत्याने प्रसारित करतात. त्याने प्रेमही केले आणि विवाहही...

 त्याची पत्नी एक सुंदर ऑस्ट्रेलियन मॉडेल आहे. या दोघांना चार गोंडस मुले आहेत. तो सध्या आपल्या सुंदर पत्नी आणि मुलांसह कॅलिफोर्निया, अमेरिका येथे आपल्या आलिशान घरात मनासारखे जीवन जगतो.जेव्हा तुम्ही तुमच्या संपूर्ण शरीरासह अपूर्ण जीवनाबद्दल तक्रार करू लागाल, तेव्हा ही पोस्ट तीन वेळा वाचा.त्याच्या अपूर्ण शरीरासह ”संपूर्ण जीवन तुम्हाला जगण्याचे कौशल्य आणि धैर्य शिकवेल.

काय नाही त्यापेक्षा काय आहे यावर लक्ष केंद्रित करून जर आपण आयुष्य फुलवलं तर आयुष्य सुगंधित होईल. - डॉ. अनिल कुलकर्णी 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

गळाची मासेमारी