आस अमृताची - वाट मिळाली मोक्षाची

देवाच्या कार्यात व्यापार, राजकारण याचे मिश्रण झाले की, भवितवादी मंडळीत असलेल्या हवशे-नवशे-गवसे यांनाही चेव येतो. त्यातच चालु काळातील धनवादी ‘व्ही.आय.पी.' मंडळीसाठी विशेष योजना होत असल्याने गोंधळात गोंधळ होतो आणि खरे भक्त श्रध्दाळू अंतिम झालेल्या गोंधळात मुंगीसारखे चिरडले जातात. तेव्हा त्यांना वाचविण्यासाठी ना देव पुढे येतो, ना राज्यकर्ते मंडळी ना तथाकथीत साधू संत मंडळी पुढे येतात.

आपल्या देशात पुराणकाळापासून धार्मिकतेला प्राधान्य राहिलेले आहे. या देशातील प्रत्येक धर्मातील व्यवितवादी समाज ईश्वराप्रती आपली भक्ती व्यक्त करण्यासाठी, गावाकडील जत्रेपासून ते प्रमुख धर्मस्थळातील मेळाव्यात सहकुंटूंब सहपरिवार हजेरी लावत असतो. अशा या धर्म मेळाव्यात भक्ती कमी आणि धंदा अधिक असतो. धर्म वजा पण राजकारणाची बेरीज असते; म्हणूनच संत सज्जनांनी ‘तिर्थी धोंडापाणी। देव रोकडा सज्जनी' असे सांगून सावध केलेय, पण ‘तिर्थी भाव फळे, मोक्ष मिळे कायमचा' यावर श्रध्दा ठेवणाऱ्यांना थांबवणार तरी कोण? अशामुळेच कुठल्या ना कुठल्या तिर्थक्षेत्री गर्दीच्या चेंगराचेंगरीत त्यांची भक्ती नको त्यांच्या पायाखाली चिरडली जाते आणि त्यांच्या या ‘मोक्षमुवती' मृत्यूची कथा बनते. असाच प्रकार यंदा प्रयागराज येथे कुंभ मेळ्याच्या रुपात घडला आहे.

दर बारा वर्षानी या कुंभ मेळ्याचे आयोजन होते. त्यातच हा कुंभमेळा खासच आहे, कारण असा योग फार कमी वेळा येतो. धर्मशास्त्रज्ञानुसार हा योग १४४ वर्षानंतर आलेला आहे. म्हणजेच १२ तपानंतरचा हा योग सर्वांसाठीच पुण्याचा योग म्हणून उत्तर प्रदेश सरकारने सर्व देश वासीयासह जगातील अस्तीकांना आवाहन करुन प्रयागराज येथे आमंत्रित केले. या पर्वणीचा लाभ घेण्यासाठी जगभरातील लोकांचा लोंढा प्रयागराजकडे सुटला. त्यानुसार सरकारच्या अपेक्षेत ४० कोटी लोकसंख्या होती. पण ती ४५ दिवसाची होती. त्यातही ‘मौनी आमावस्येचा मुहूर्त' खास असल्याने त्या दिवशीची गर्दी होण्याची शवयताही वर्तवली जात होती.

योगी आदित्यनाथ जे उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या मतानुसार गर्दी भलेही कितीही मोठी असो, त्यांनी १०० कोटी लोकांना पुरेल एवढी व्यवस्था केली आहे. प्रत्यक्षात १ ते दीड कोटी लोकांनाही सांभाळू शकली नाही. असा अनेकांचा दावा आहे. जे प्रत्यक्षात कुंभ मेळ्यात जाऊन आलेलेच सांगतात. त्याचबरोबर टीव्ही चॅनेल्सवाले, युट्यूबवाले पत्रकारही सांगताना दिसतात. त्याचबरोबर हेही सांगितले जाते की, जी व्यवस्था आहे ती खास व्यवितसाठी, धर्माचार्यांसाठी, साधू-संताच्या आखाड्यांसाठीची होती. सामान्य माणसांना कडावयाच्या थंडीत कुडकुडण्याशिवाय पर्याय नाही, तीच बोंब खाण्यापिण्याची, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शौचालयाची कमतरता व महिला-मुलींना कपडे बदलण्यासाठी आडोशाची कमतरता भासल्याचे भाविक सांगतात.

तसे पाहता कोणत्याही मोठ्या व गर्दीच्या सोहळ्यात वा मेळ्यात अशा थोड्याफार उणिवा असणारच. पण त्या भासू न देण्याची जबाबदारी ही आयोजकावरच येते. जगातील कुठलेही धर्म असोत, धर्म म्हटला की त्याच्या आश्रयाखाली ईश्वरी शक्ती भक्तीच्या नावाने श्रध्दा ते अंधश्रध्दा कर्मटपणा ते कट्टरवादी कडवटपणा अशा मानवी भावभावनांचा एकच मेळावा भरलेला असतो. बहुतेकदा धर्म मेळाव्यात धर्माचे सत्यवादी स्वरुप आणि ईश्वराचा खरा भक्तीभाव हरविण्याची जास्त शवयता असते. म्हणूनच ‘लोक विसरले खऱ्या देवा' असे होऊ नये म्हणून त्रषिमुनींपासून ते संत गुरु परंपरेपर्यंत धर्म प्रबोधनाची परंपरा चालत आलेली आहे.

धर्म आणि देव याबाबत दोन व्यवितच्या मनात कधीच एक वावयता किंवा विचार सारखा नसतो. कुणाला संत महंतांचे किर्तन भावते तर कुणाला प्रबोधक संताचे विचार भावतात. तर कुणाला सुधारक संतच धर्मद्रोही वाटू लागतात. जसे गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज, यांचे विचार बहुतेक कर्मठवाद्यांना कधी पटलेच नाहीत. कर्मठवाद्यांनी यांना कधी संतच मानले नाही. किमान त्यांच्या हयातीत तरी, पण त्यांच्या पश्चात त्यांच्या विचारांची गहनता अनेकांना कळली. धर्म मतामध्ये तसेच ईश्वरी भावभवितच्या स्वरुपात वैदिक धर्मात, कुणा भक्ताला एकांतात ईश्वराची भवती करावीशी वाटते, तर कुणाला रोज मंदिरात जाऊन देवदर्शन घेतल्याशिवाय चैन पडत नाही. काही खात्यापित्या सुखी घरालाच मंदिराचे स्वरुप देतात. तर काही देव्हाऱ्यातील मुर्तीमध्येच आपलं जग पाहतात. तर काही समाज समुहाला तर प्रचंड गर्दीचा रेटा असतानाही तिर्थाटन करणे, धर्म मेळाव्यात सहभागी होणे म्हणजेच मोक्षप्राप्ती होणे असेही वाटते. म्हणूनच विविध तथाकथित संताच्या प्रवचनासाठी दूरदूरहून लोक हजेरी लावतात. तेथील सोयीची पर्वा न करता प्रवचनाला बसतात व भूक-तहानेने व्याकूळ होऊन तडफडतात. असाच प्रकार खुद्द नव्या मुंबईत घडलेला आहे.

महाराष्ट्रातील पंढरपूरात, दरवर्षी लाखोने लोक येतात पण तिथे कधीच ना चेंगराचेंगरी होते, ना लोक भुकेने मरतात. तिथे ‘स्व' शिस्तीचा पडताळा येतो, पण जिथे लोकांना बोलावले जाते तिथे शिस्तीचा अभाव हमखास जाणवतो.

आपल्या देशात तिर्थयात्रेची फार मोठी परंपरा आहे. यात्राच नव्हे तर धार्मिक मेळाव्याचीही परंपरा आहे. त्याची लाखो करोडो भक्त मंडळीही आहेत. अशा मेळाव्यात भक्तीचा व्यापार होणे आलेच. त्यासोबत ज्या राज्यात असे धर्म मेळावे भरतात, त्या राज्याचे सत्ताधारी अशा मेळाव्याकडे आपल्या राजकीय मताची सोय म्हणून पाहतात या भवितवादाचे मार्गदर्शक बनून सत्तेचा खुंटा मजबूत करतात. देवाच्या कार्यात व्यापार, राजकारण याचे मिश्रण झाले की, भवितवादी मंडळीत असलेल्या हवशे-नवशे-गवसे यांनाही चेव येतो. त्यातच चालुकाळातील धनवादी ‘व्ही.आय.पी.' मंडळीसाठी विशेष योजना होत असल्याने गोंधळात गोंधळ होतो आणि खरे भवत श्रध्दाळू अंतिम झालेल्या गोंधळात मुंगीसारखे चिरडले जातात. तेव्हा त्यांना वाचविण्यासाठी ना देव पुढे येतो, ना राज्यकर्ते मंडळी ना तथाकथीत साधू संत मंडळी पुढे येते. याला तेथील परिस्थिती जबाबदार असते हे विसरुन चालणार नाही. या वेळी उत्तर प्रदेशात लवकरच राज्याच्या विधानसभेच्या निवडणूका येऊ घातल्या आहेत. त्यामुळे संधीचा फायदा घेत आदित्यनाथानी या कुंभ मेळ्याला एका मोठ्या ‘ईव्हेंट'चे स्वरुप देत जगभरात त्याचा प्रचार केला, मात्र शाही स्नानासाठी येणाऱ्या लाखो भक्तांच्या व्यवस्थेचे काय, याची काळजीच घेतली नाही. भारतीय वैदिक, धार्मिक परंपरेत कुंभमेळ्याला वेगळेच महत्त्व आहे. हरिद्वार प्रयागराज, उज्जैन आणि नाशिकमधील नदीच्या काठावर, समुद्र मंथनातून देवांना प्राप्त झालेल्या ‘अमृत कलशां'तून पवित्र अशा अमृताचे काही थेंब पडले. त्या अमृताच्या थेंबांची दिव्यता या चार ठिकाणच्या पवित्र नद्यांमध्ये वास करत असल्याने या ठिकाणी कुंभमेळा आयोजित करण्यात येतो. पापाचा नाश होऊन मोक्षप्राप्ती होते असा श्रध्दाभाव असल्याने योगी, साधू, संत, महंत विविध मठांचे मठाधिश, मंडलेश्वर, महामंडलेश्वर ते भाविक भक्तगण,  कुंभमेळ्यात स्नानासाठी येतात. यात ही कुंभ, अर्धकुंभ आणि महाकुंभ असे प्रकार असतात. त्यातच हा विशेष पूर्ण कुंभमेळा असल्याने तिथे प्रचंड गर्दी होणे अपेक्षितच होते. त्यातही मौनी अमावस्येच्या पहाटे अमृतस्नान करण्यासाठी प्रयागराज त्रिवेणी संगमावर झुंबड उडणार हे गृहीत धरुन त्याचे नियोजन करणे सरकारी व्यवस्थापनाचे प्रथम कर्तव्य होते

 सरकारने फवत वातावरण निर्माण करुन प्रसिध्दी करत धंदा व धार्मिक राजकारणाची बेगमी केली. आणि लाखो भाविकांना वाऱ्यावर सोडले. ‘व्ही.आय.पी.' भवतासाठी २८ हून अधिक पूल राखीव ठेवल्याने सामान्य भाविकांना संगम घाटावर जाण्यासाठी अरुंद रस्ते राहिले. त्यामुळे संगमाकडे जाणाऱ्या भाविकांच्या लोंढाच्या रेट्याने घात केला व चेंगरा-चेंगरीत मृत्यूने आपले काम तमाम केले.

सरकारची सारी यंत्रणा  कॅमेऱ्याच्या व व्ही.आय.पी.च्या मागे लागली व जगाला दाखवू लागले की, या मेळाव्यात ५ कोटी लोकांनी सहभाग घेतला आहे. म्हणजेच सरकार व यंत्रणा आपले कर्तव्य विसरली. त्यामुळे हजारो कोटी रुपये खर्च करुन काय फायदा? या पापाचे निराकरण कसे होणार? आणि कोण करणार? हे थोडे की काय, त्यावर मात म्हणजे झालेली घटना दाबण्याचा प्रकार वा सर्वांना अंधारात ठेवण्याचा खेळ खुद्द मुख्यमंत्र्यानी केला. त्यावरुनही विविध साधू, महंतात मतभेदाचे वातावरण तयार झाले आहे. ते एक दुसऱ्यांविरुद्ध ‘दुगाण्या' झाडत आहेत. स्वतःला जगत्‌गुरु मानणारे रामभद्राचार्य हे या घटनेला विशेष महत्त्व देताना दिसत नाहीत किंवा यंत्रणेला जबाबदारही धरत नाहीत. एवढच कशाला, एका पिठाचे शंकराचार्य अविमुवतेश्वरानंद सरस्वती यांना शंकराचार्य मानायलाही तयार नाहीत. एवढ्या मोठ्या कार्यात अशा छोट्या मोठ्या घटना घडणारच, त्यात विशेष ते काय? असे त्यांचे म्हणणे त्यातही एका तथाकथित योग्याच्या मतानुसार चेंगरा-चेंगरीत जे मेले ते मेले नसून त्यांना ‘मोक्ष' प्राप्त झाला आहे. जर मरणाऱ्यांना मोक्ष मिळाला आहे तर जगलेले सर्व पापी आहेत? असे म्हणणाऱ्या लोकांना उत्तर काय देणार?

ही सर्व साधू संत, महंत मंडळीना अलिशान ‘टैन्ट' ची सोय आहे. खाणे-पिणे व्यवस्था कडेकोट आहे. सोबतीला व रक्षणाला ‘बॉडी गार्ड' व्यवस्था आहे. अशा लोकांना लोकांच्या दुःखाचे काय. ‘पर दुःख शितल' म्हणतात ते यालाच.

जर कुंभमेळ्यात अशी घटना घडली नाही तर तो कुंभमेळा कसला? पूर्वीच्या अनेक चित्रपटात अशा घटना दाखवल्या जात. मेळ्यात, भावा-भावाची ताटातूट, बहिणभावाची ताटातूट, अपघातातून आई-बाबा पैकी एकाचे मरण किंवा दोघांचेही मरण. मुले एकमेकांपासून दूर. मेळा आणि भगदड, चेंगराचेंगरी हे समीकरण जुळलेले आहे.

 आतापर्यंतच्या सर्वच कुंभमेळ्यात अशा घटना घडलेल्या आहेत. आणि त्या व्यवस्थापनाने मान्यही केल्या आहेत. फरक एवढाच आहे की, हे सरकार सत्य मानायला तयार नाही. लपवा-लपवीचा खेळ सुरु आहे. खरं सत्य कधी तरी बाहेर येईलच; त्याची वाट पाहणे एवढेच आपल्या हाती आहे. - भिमराव गांधले 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

‘व्हॅलेंटाईन वीक' की स्वैराचाराला मोकळीक?