वाशीत एसआरपीएफच्या बसची बेस्ट बससह तीन वाहनांना धडक  

राज्य राखीव पोलीस बलाच्या (एसआरपीएफ) बसने दोन बेस्ट बससह बीएमडब्ल्यु कारला धडक

नवी मुंबई : वाशीतील कोपरी गाव येथून पामबीच मार्गावरुन मुंबईच्या दिशेने जाणा-या राज्य राखीव पोलीस बलाच्या (एसआरपीएफ)बसने दोन बेस्ट बससह बीएमडब्ल्यु कारला धडक दिल्याची घटना शुक्रवारी सकाळी वाशीतील अरेंजा सर्कल चौकात घडली. सैदैवाने या अपघातात कुणीही गंभीर जखमी झाले नसले तरी चारही वाहनातील 4 ते 5 जण किरकोळ जखमी झाले आहेत. एपीएमसी पोलिसांनी या अपघाताला जबाबदार असलेल्या एसआरपीएफच्या बस चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एसआरपीएफ जवानांची बस शुक्रवारी सकाळी मुंबईत अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी जात असताना हा अपघात घडला.  

या अपघातातील एसआरपीएफची बस शुक्रवारी सकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास वाशीतील कोपरगाव येथून पामबीच मार्गावरुन मुंबईत राज्य अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी जात होती. वाशीतील अरेंजा सर्कल येथील सिग्नल सकाळच्या सुमारास बंद असल्याने एसआरपीएफच्या बस चालकाने आपल्या ताब्यातील बस भरधाव वेगात चालवुन नेली. त्यामुळे अरेंजा सर्कल चौकातून एपीएमसी मार्केटमध्ये जाणाऱया 517 क्रमांकाच्या बेस्ट बसला एसआरपीएफच्या बसची जोरदार धडक बसली. त्यानंतर एसआरपीएफची बस डाव्या बाजूला घुसून एमपीएससी मार्केटकडुन वाशीच्या दिशेने जाण्यासाठी सिग्नलवर उभ्या असलेल्या बीएमडब्ल्यू कारवर धडकली. त्यानंतर सदर बस बेस्टच्या 512 क्रमांच्या बसवर धडकली.  

सुदैवाने या अपघातात कुणीही गंभीर जखमी झाले नसले तरी चारही वाहनातील 4 ते 5 जण किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघातानंतर ऐन सकाळच्या वेळी अरेंजा सर्कल चौकात वाहतूक कोंडी झाली. या घटनेची माहिती मिळताच एपीएमसी पोलिसांनी, तसेच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चारही अपघातग्रस्त वाहने बाजुला काढुन या चौकातील वाहतुक सुरळीत केली. या अपघातात एसआरपीएफच्या बससह दोन्ही बेस्ट बस व बीएमडब्ल्यु कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एसआरपीएफच्या बस चालकाने निष्काळजीपणे भरधाव वेगात बस चालवुन नेल्याने हा अपघात घडल्याचे आढळून आल्याने एसआरपीएफच्या बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक तन्वीर शेख यांनी दिली.  

 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

सीबीडीमध्ये एकाच रात्रीत चार घरे फोडली