मराठी सुविचार आणि म्हणी या विषयावर आधारित राज्यस्तरीय मराठी कॅलिग्राफी शब्द-चित्र रेखाटन स्पर्धा

मराठी भाषा दिनानिमित्त राज्यस्तरीय कॅलिग्राफी शब्द-चित्र रेखाटन स्पर्धा

मुंबई : कुसुमाग्रज जन्मदिन तथा मराठी भाषा दिनानिमित्त मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई आणि दादर सार्वजनिक वाचनालय धुरू हॉल ट्रस्टच्याच्या वतीने 'मराठी विचारधारा प्रतिष्ठान' पुरस्कृत कामगार नेते वसंतराव होशिंग स्मृती मराठी सुविचार आणि म्हणी या विषयावर आधारित राज्यस्तरीय मराठी कॅलिग्राफी शब्द-चित्र रेखाटन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

विद्यार्थी, कलाशिक्षक, चित्रकार, हौशी चित्रकार या स्पर्धेत भाग घेऊ शकतील. पहिल्या पाच क्रमांकाना सन्मानचिन्हासह रोख पारितोषिक तर इतरांना सहभाग प्रमाणपत्र २७ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या मराठी भाषा दिवस कार्यक्रमात देण्यात येईल. स्पर्धेची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी आहे. स्पर्धेचे नियम व अधिक माहितीसाठी कार्याध्यक्ष रमेश सांगळे ९८२१५७४८९१ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगांवकर, ऍड देवदत्त लाड यांनी केले आहे. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

एफ.जी.नाईक कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुरबाड येथे श्रमदान