विवेकानंद संकुल  शाळा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण

नवी मुंबई ः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून परीक्षा पे चर्चा कार्यक्रमांतर्गत ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या सौजन्याने सानपाडा येथील विवेकानंद संकुल  शाळा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. याप्रसंगी ‘भाजपा'चे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, महामंत्री विजय घाटे, आयटी सेल अध्यक्ष सतीश निकम, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे, सुहासिनी नायडू, उपाध्यक्ष जगन्नाथ जगताप, पांडुरंग आमले, शशी नायर, ‘छत्रपती शिक्षण मंडळ'चे अध्यक्ष डॉ.नंदकिशोर जोशी, मुख्याध्यापक सुधीर जोशी, रश्मी विघ्ने तसेच शेकडो विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग उपस्थित होते.

आज आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विद्यार्थ्यांसह थेट संवाद कार्यक्रमात आपल्या मनातील भावना, मनातले दुःख, आपल्याला सतवणारे प्रश्न यावर पंतप्रधान मोदी यांनी अतिशय मिश्कीलपणे आणि सहज उत्तरे दिली. विद्यार्थ्यांसोबत सदर कार्यक्रम पाहता पाहता तसेच पंतप्रधानांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे मीही अजुनही एक विद्यार्थिनी असल्याचे जाणवले,
असे आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले. परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील करोडो विद्यार्थी पंतप्रधानांसोबत जोडत आहेत. विद्यार्थ्यांनी कॉपी करुन एकवेळा पास व्हाल, दोन वेळा पास व्हाल; परंतु आयुष्याच्या अभ्यासात तुम्ही पास होऊ शकत नाही. विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार घडविण्याचे काम त्यांच्या माध्यमातून होत आहे. बेलापूर मतदारसंघातील अनेक शाळांमध्ये आम्ही कार्यक्रम राबवित आहोत, असेही आमदार सौ. मंदाताई म्हात्रे म्हणाल्या.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

 शैक्षणिक शिष्यवृत्ती अर्ज करण्यास १५ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ