एफ जी नाईक महाविद्यालयात भूगोल दिनाचे आयोजन

नवी मुंबई -: कोपरखैरणे येथील श्रमिक शिक्षण मंडळाच्या एफ.जी नाईक महाविद्यालय भूगोल विभागाअंतर्गत भूगोल दिनाचे आयोजन करण्यात आले होते.  १४ जानेवारी भूगोल दिन या निमित्ताने  गेली तीन दशके पूर्ण महाराष्ट्रातील विविध संस्था महाविद्यालय भूगोल दिन साजरा केला जातो. निसर्ग आणि माणूस यांचा पूरक आणि प्रेरक संबंध मांडताना या दिवसाचे महत्व आणि तत्व जाणावे म्हणून सुरुवात १४ जानेवारी १९८८  या रोजी केली. भूगोल महर्षी  डॉ. सी.डी देशपांडे यांचा जन्मदिन ही या दिवशी असतो

या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून पूर्व प्राचार्य मिराज आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज तसेच फार्मर असोसिएट डिन नीट वर्ड सीनियर युनिव्हर्सिटी ,पुणे डॉ. माधुरी कुलकर्णी, एफ.जी नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य  प्रताप महाडिक,वरिष्ठ प्राध्यापक डॉ. दत्तात्रय घोडके, भूगोल विषय शिक्षक प्राध्यापिका डॉ. कविता पवार तसेच शिक्षक वृंद, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.

 प्रास्ताविक भाषणामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य प्रताप महाडिक यांनी भूगोल विषय प्राध्यापक या नात्याने विद्यार्थ्यांचे संवाद साधला व पर्यावरण स्नेह म्हणून सामाजिक बांधिलकी जपण्याचे सर्व विद्यार्थ्यांना आवाहन केले त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी  भूगोल दिनानिमित्त प्रश्नमंजुषा प्रतियोगिता आयोजित केली होती.

 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिना निमित्त चर्चासत्र संपन्न