डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिना निमित्त चर्चासत्र संपन्न

खारघर येथील सत्याग्रह कॉलेजमध्ये विचारमंथन

नवी मुंबई ः खारघर येथील सत्याग्रह महाविद्यालयाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाचे औचित्य साधून नव शिक्षण धोरण २०२० आणि आर्थिक गरीबांचे शैक्षणिक भवितव्य याविषयावर चर्चासत्राचे १४
जानेवारी रोजी आयोजन केले होते. चर्चासत्र कॉलेजचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. जी. के. डोंगरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.. प्रारंभी पाली आणि बुध्दीझम विभागाच्या प्रमुख प्रा. सुनिता वानखेडे यांनी चर्चासत्राचे उद्‌घाटन केले. चर्चासत्रात प्रा. नेहा राणे, डॉ. निधी अग्रवाल, प्रा. ललिता यशवंते,  प्रा. संदीप पांडे, प्रा. प्रणित जाधव, प्रा. काव्या पाल, प्रा. निशा भक्त, प्रा. एलोरा मित्रा, प्रा.संगीता जोगदंड यांनी सहभाग घेतला .
भारतात १२ व्या शतकापासून १९ व्या शतकापर्यंत उच्च शिक्षणाची सोय नव्हती.

त्यामुळे विकसित देशाच्या रांगेत भारत आजही नाही. नवीन शैक्षणिक धोरणात गरीबाला उच्च शिक्षण मिळण्याची हमी नाही. त्यामुळे सरकारने अर्थिक धोरणाची निती बदलण्याची गरज असल्याचे डॉ. डोंगरगावकर यांनी सांगितले.
प्रा. वनिता सुर्यवंशी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

उरण मीनाताई ठाकरे वाचनालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न