राष्ट्रीय संमेलनात संपूर्ण भारतातील द्वितीय क्रमांकाचा उत्कृष्ट सेंटर

‘इंडियन इन्स्टिट्युट ऑफ आर्कटिेक्टस्‌'ला द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार

नवी मुंबई: नवी मुंबईच्या इंडियन इन्स्टिट्युट ऑफ आर्कटिेक्टस्‌ या सेंटरला रायपूर (छत्तीसगड) येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय संमेलनात संपूर्ण भारतातील द्वितीय क्रमांकाचा उत्कृष्ट सेंटर असा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष सी.आर.राजू यांच्याहस्ते सदर पुरस्कार ‘इंडियन इन्स्टिट्युट ऑफ आर्कटिेक्टस्‌ असोसिएशन'चे नवी मुंबई अध्यक्ष कौशल जाडिया यांनी स्विकारला. या संमेलनाला देशभरातील वास्तुविशारदांनी हजेरी लावली होती.

गृहनिर्माण आणि रिअल इस्टेट क्षेत्रात होत असलेल्या मुलभूत बदलांचा अवलंब करुन नवीन परिपूर्ण भारताच्या उभारणीत आणि विकासात वास्तुविशारदांचा सहभाग सुनिश्चित करणे असा इंडियन इन्स्टिट्युट ऑफ आर्कटिेक्टस्‌ या
राष्ट्रीय संस्थेचा मूळ उद्देश आहे. सदर संमेलनात वास्तूकला क्षेत्रातील निमंत्रित दिग्गजांनी आपआपले अनुभव कथन करुन त्यांच्या उत्कृष्ट वास्तुनिर्मितीचे उपस्थितांसमोर सादकीरण केले. संमेलनाची सांगता विजेत्यांना पुरस्कार प्रदान करुन करण्यात आली. यावेळी नवी मुंबई सेंटरला देण्यात आलेला द्वितीय क्रमांकाचा उत्कृष्ट सेंटरचा पुरस्कार संस्थेच्या नवी मुंबईतील पदाधिकाऱयांनी स्विकारला. सदर पुरस्कार आय.आय.ए. नवी मुंबई सेंटरच्या शिरपेचातील मानाचा तुरा असल्याची प्रतिक्रिया नवी मुंबईतील ‘इंडियन इन्स्टिट्युट ऑफ आर्कटिेक्टस्‌'च्या पदाधिकऱ्यांनी व्यक्त केली.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

एफ जी नाईक महाविद्यालयात भूगोल दिनाचे आयोजन